भाषा विकास{वयोगट २ ते ८ वर्षे}
*भाषा विकास* भाषा व संभाषण शिकताना ऐकणे या क्रियेला फार महत्व आहे. मुल जे ऐकते तेच बोलण्यासाठी प्रयत्न करते. मुलगा जर मराठी कुटूंबात जन्मला तर तेथे मराठी भाषा त्याला आपोआप अवगत होते. त्याचप्रमाणे तामीळ, गुजराती, कन्नडी या भाषेचेही होते कारण घरामध्ये तो त्याचप्रमाणे ऐकत असतो. म्हणुन जेवढे आपण मुलांसमोर बोलतो तेवढे तो शिकेल. मातृभाषा, हिंदी भाषा सहज अवगत होते पण इंग्रजी भाषेचा सराव कमी: असल्यामुळे ती साध्य करण्यासाठी वारंवार इंग्रजी शब्दांचा वापर मुलांसमोर करीत रहावा. शिक्षण व भावी जीवनातील व्यवहारासाठी इंग्रजी भाषा महत्वाची आहे. Remember- Learn a new language and get a new soul 🔷 भाषा शिकण्यासाठी खालील प्रक्रिया होणे आवश्यक आहेत. 🔸तुमच्या मुलाशी दोन किंवा तीन भाषांमध्ये बोला मुलांना बोलण्याचा प्रयत्न करण्यासाठी पालकांनी कमीत कमी दोन भाषेचा वापर करावा, वय ६ वर्षे पर्यंत मातृभाषा व शाळेतील भाषेचा सराव करावा. घरामध्ये बोलताना मुलांसोबत आईने मातृभाषा बाबांनी इंग्रजी भाषेदा किंवा उलट प्रकारे वापर केल्यास मुलाला दोन्ही भाषांचे ज्ञान मिळत जाते... ज्यावेळी मूल शाळेतील भाषेला अवगत क...