शाळेचा पहिला दिवस; हसत खेळत बाल विकास
🟢 *शाळेचा पहिला दिवस*
पहिल्या दिवशी शाळेत जाताना नविन स्कुल बॅग, टिफिन बॉक्स, पुस्तके घेऊन स्वतः नेऊन सोडावे. त्या वस्तु आकर्षक रंगाच्या असाव्यात म्हणजे मुलांना त्याबद्दल आकर्षण वाटेल.. जर शक्य झाले तर शिक्षकांचा परिचय करुन त्याला प्रेमाने वर्गामध्ये बसवावे, टाटा टाटा, बाय बाय आपण नियमीतपणे करतो त्याप्रमाणे करुन निघुण यावे. जर मुल रडत असेल तर मागे वळून पाहू नये.
Remember- The most important day of person's education is first day of school.
🔹 उत्साह निर्माण करणे
मुलांना फक्त शिकण्याबद्दल आवड निर्माण करणे, उत्साह वाढवणे अपेक्षीत आहे. लिहलेली अक्षरे जाणुन घेण्याची जिद्द व आवड निर्माण करावी म्हणजे तो वाचण्यासाठी किंवा लिहीण्यासाठी तयार होईल.
उपलब्धता - मुलांना या साठी गोष्टींची पुस्तके, पोस्टर्स, चित्र असलेल्या गोष्टी, कार्टून्स, मॅग्झीन्स, A ते Z पर्यंत चित्रासहीत कॅलेंडर्स इत्यादी
Remember- Success is the sum of small efforts repeated day in & day out
▪️ कसे करावे
१. आपल्या घरी शेल्फमध्ये किंवा टेबलवर त्याचे पुस्तके ठेवावीत. त्याला स्वतःला ती व्यवस्थीत ठेवायला सांगावे. ती पूस्तके त्याचीच आहेत अशी जाणीव त्याला होऊ द्यावी. त्यामुळे त्याला पुस्तकांबद्दल प्रेम निर्माण होईल.
२. गोष्टीची चित्र असलेली पुस्तके वाचून दाखवावी. जेणेकरुन लिहिलेले वाचता आले तर आपल्याला स्टोरी कळते असे मुलांच्या लक्षात येईल व त्याची वाचण्यासाठी उत्सुकता वाढेल.
३. आभ्यास करीत असलेली किंवा पुस्तक वाचत असलेली मुलांची चित्रे भिंतीवर लावावी.
४. सचित्र पुस्तकांचे वाचन करताना खरोखर असलेले दाखवावे व माहिती द्यावी.
# उदा. पुस्तके वाचत असताना सूर्य, चंद्र, झाडे यांचा उल्लेख असतो त्याप्रमाणे ते वास्तवात दाखवावे.
5. गोष्टींची पुस्तके वाचताना किंवा सांगताना खालील मुद्दे लक्षात घ्यावेत.
अ. गोष्ट सांगणे ही प्रक्रिया आनंदमय असावी. कोणतेही दडपण नसावे.
ब. गोष्ट निवडण्याचा पूर्ण अधिकार मुलांना द्यावा.
क. मुलाला पुस्तक त्याच्या हातात घेऊन घट्ट धरायला लावावे.
ड. गोष्ट फार मोठी किंवा फार लहान असु नये.
इ. दिलेल्या चित्रांवर चर्चा करत गोष्ट सांगावी.
६. प्रत्येक गोष्टीचे वाचणे किंवा सांगणे झाल्यावर त्या गोष्टीविषयी प्रश्न विचारावेत. यामध्ये प्रामुख्याने
अ. गोष्टी मधील मुख्य भुमिका कोणाची होती (पैद ) ?
ब. गोष्टीमधील कठीण प्रसंग किंवा कोणती समस्या मुख्य होती ?
क. समस्या सोडविण्यासाठी काय प्रयत्न केले किंवा कशाप्रकारे यश मिळाले?
ड. या गोष्टीपासून काय लाभ होतो किंवा काय शिकायला मिळते ? अशा स्वरुपात प्रश्न-उत्तर घेतले तर मुल त्याप्रमाणे खोल विचार करायला शिकेल.
आपण मुलांना वारंवार सर्वप्रकारची माहिती विविध प्रकारच्या संग्रहातुन द्यावी. जसे सिडी, व्हिसीडी, ऑडियो कॅसेट्स, इंटरनेट वरिल सर्व साईट्स, टिव्ही वरील कार्यक्रम, प्रदर्शणी इ. यामुळे मुलांचा उत्साह
वाढून विचार शक्ती वाढण्यास मदत होते.
Remember- The task of preschool education is not scoring marks only but preparing child to have hunger for knowladge."
🙏🏻🙏🏻 माझ्या पुस्तकातून घेतलेला लेख.
🙏🏻🙏🏻 तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता.
Dr Gunjan & Dr Ashish Agrawal
8888126937, 8483905330
Comments
Post a Comment