शाळेत पाठविण्यापुर्वीची मुलाची मानसिक तयारी; हसत खेल बाल विकास या पुस्तकातील लेख

शाळेत पाठविण्यापुर्वीची मुलाची मानसिक तयारी

सर्व पालकांना आपला मुलगा स्वच्छ, सुंदर असा शाळेचा गणवेश, स्कूल बॅग, शुज, सॉक्स परिधान केलेला पहावा वाटतो. तसेच त्याने शाळेत व घरी आनंदी मनाने व प्रसन्नपणे आभ्यास करावा असे ही वाटते. पालकांना मुल अभ्यासात सर्वात हुशार असावे अशीही अपेक्षा असतेच. वरिल सर्व अपेक्षा असाव्यात पण त्याला लिहीता व वाचता यावे असे दडपण कधीही असु नये. या तयारी मध्ये आपला मुख्य उद्देश असावा की......
1. आपले मुल शाळेत जाण्यासाठी उत्साही असावे
२. त्याचा शब्द संग्रह चांगला असावा.
३. तो लिहणे व वाचणे शिकण्यासाठी तयार असावा.

ही तयारी मुलांसोबत अगदी सहजपणे व खेळता खेळता करता येते. या पूर्ण चर्चेत आपण काय व कसे करावे हे स्पष्ट केले आहे. आपण जी तयारी मुलांकडून करुन घेणार आहोत ती सर्व तयारी Playgroup, Nursery, LKG, UKG मध्ये केली जाते पण जर हे सर्व शाळेत व घरी केल्यास घरचे प्रयोग मुलांसाठी खेळाप्रमाणे वाटतील व मुलांना चांगल्या प्रकारे आत्मसात होतील.
त्याचा फायदा मुलांना पहिल्या वर्गात शिक्षण घेताना खुप चांगल्याप्रकारे होईल. 
Remember- *A child educated at school only is an uneducated child* 

१. स्वतःच्या भावना स्थिर ठेवणे :
आपले मुल शाळेत जायचे असले की आपल्याला चिंता सरु होते. जसे- आपले मुल जाईल की नाही? प्रश्न आपल्या मनात फिरु लागतात. एवढेच नव्हे तर याप्रश्नांची चर्चा आपण घरामध्ये, इतरांसोबत विषेश म्हणजे मुलांसमोरच करतो. जरी आपण चर्चा केली नाही तरी आपल्या देहबोलीतुन आपली चिंता मुले समजु शकतात. आपण जर मुलांसमोर अशी चर्चा टाळली तर मुले कोणतीही भीती मनात ठेवणार नाहीत. उलट त्यांच्यासमोर काही सकारात्मक गोष्टींची चर्चा केल्यास
जसे - “आपले मुल शाळेत खुप मजा करेल, खुप मस्ती करेल."
▪️'तुला तेथे सर्व नविन मित्र भेटतील. "
▪️'तुझ्यासाठी मस्त नविन बॅग, टिफिन बॉक्स, कपडे घेऊ या. "
▪️"शाळेमध्ये जेवणे, खेळणे यामध्ये खुप आनंद होतो. आम्ही लहान आसताना खुप खेळत होतो.”
अशाप्रकारचे वाक्य मुलांसमोर इतरांशी व मुलांसोबत वारंवार बोलल्यास मुलांचा उत्साह वाढेल.
Remember- The key to success is emotional stability 

२. शाळेमध्ये भेट देणे :
मुलाला जेव्हा शाळेमध्ये पाठवायचे असते, त्यावेळी शाळा सुरु होण्याआधी मुलाला ती शाळा कमीत कमी ४-६ वेळेस दाखवुन आणावी.
Remember- Preparation is everything 
३. शिक्षकांची भेट :
जर शक्य झाले तर तेथील शिक्षकांची ओळख मुलाला करुन द्यावी.. तसेच शाळेत सामान्यपणे चालणारे काही खेळ व इतर गोष्टी माहित करुन घ्याव्यात.
Remember- The best preperation for tomorrow is doing your best today 
४. घरामध्ये सराव :
सामान्यपणे शाळेत होणाऱ्या सर्व गोष्टी जसे- राष्ट्रगीत, खेळ, पिटी, एकत्रीत डबा खाणे, कविता, गोष्टी, इ. आपल्या घरी मुलांकडून खेळता खेळतासराव करून घ्याव्यात.
अ. घरामध्ये आपल्या सभोवतालचे, आजुबाजुचे ४ - ५ मुले बोलवुन त्यांच्यासोबत शाळा - शाळा असा खेळ खेळावा. यामध्ये आपण शिक्षक होऊन मुलांना त्याप्रमाणे सुचना देणे, शिकवणे, खेळ घेणे इ. करावे.
ब. शाळेची पुस्तके आणुन त्या पुस्तकांसोबत खेळावे. आपण स्वतः वाचुन दाखवावे.
क. मुलांची झोपेची वेळ शाळेच्या अपेक्षीत वेळेप्रमाणे ठरवून दहा तास पूर्ण करावी. म्हणजे मुलाला शाळेत जाण्यासाठी सहा वाजता उठणे गरजेचे असेल तर त्याला पुर्वीपासूनच नऊ वाजता झोपण्याची व सहा वाजता उठण्याची सवय लावावी.
Remember- Before anything else, preperation is key to success 

🙏🏻🙏🏻 माझ्या हसत खेल बाल विकास या पुस्तकातून घेतलेला लेख 

तुम्ही या विषयावर आमच्या व्हॉट्सअॅप नंबर 8888126037/9403217653 वर प्रश्न विचारू शकता.

Dr Ashish Agrawal 
Dr Gunjan Agrawal

Comments

Popular posts from this blog

मैंने खूब पढ़ाई की लेकिन रिजल्ट नहीं मिला (छात्रों के लिए उपयोगी)

हसत-खेळत बालविकास; पालकांची भूमिका

Life lesson; Stop comparing yourself with others