भाषा विकास{वयोगट २ ते ८ वर्षे}
*भाषा विकास*
भाषा व संभाषण शिकताना ऐकणे या क्रियेला फार महत्व आहे. मुल जे ऐकते तेच बोलण्यासाठी प्रयत्न करते. मुलगा जर मराठी कुटूंबात जन्मला तर तेथे मराठी भाषा त्याला आपोआप अवगत होते. त्याचप्रमाणे तामीळ, गुजराती, कन्नडी या भाषेचेही होते कारण घरामध्ये तो त्याचप्रमाणे ऐकत असतो. म्हणुन जेवढे आपण मुलांसमोर बोलतो तेवढे तो शिकेल. मातृभाषा, हिंदी भाषा सहज अवगत होते पण इंग्रजी भाषेचा सराव कमी: असल्यामुळे ती साध्य करण्यासाठी वारंवार इंग्रजी शब्दांचा वापर मुलांसमोर करीत रहावा. शिक्षण व भावी जीवनातील व्यवहारासाठी इंग्रजी भाषा महत्वाची आहे.
Remember- Learn a new language and get a new soul
🔷 भाषा शिकण्यासाठी खालील प्रक्रिया होणे आवश्यक आहेत.
🔸तुमच्या मुलाशी दोन किंवा तीन भाषांमध्ये बोला
मुलांना बोलण्याचा प्रयत्न करण्यासाठी पालकांनी कमीत कमी दोन भाषेचा वापर करावा, वय ६ वर्षे पर्यंत मातृभाषा व शाळेतील भाषेचा सराव करावा. घरामध्ये बोलताना मुलांसोबत आईने मातृभाषा बाबांनी इंग्रजी भाषेदा किंवा उलट प्रकारे वापर केल्यास मुलाला दोन्ही भाषांचे ज्ञान मिळत जाते... ज्यावेळी मूल शाळेतील भाषेला अवगत करेल तेंव्हा हा आपण ति तिसऱ्या भाषेविषयी विचार करू शकतो.
🔸 वारंवार बोलणे आणि सराव (संभाषण)
भाषा शिकतांना घरातील भाषा ही लवकर शिकता येते तर इंग्रजीसाठी प्रयत्न करावे लागतात. आपल्या बोलण्यात समिश्र भाषेतील शब्द असावेत.. उदा :-
# School मे जाना है !
# Ground पर जाकर Play करो!
# Hello म्हण Shake hand कर!
🔸 शब्दसंग्रह वाढवणे
▪️ सर्वप्रथम सामान्यपणे वापरण्यात येणारे शब्द सांगत रहावे. जसे- Fridge, Kitchen, T. V., Besin, Apple, Cot.
▪️ यानंतर दोन ते तीन शब्दांचे छोटे छोटे वाक्य म्हणून घ्यावेत. जसे Play Time
I Drink
Eat fruits
▪️ अशा वाक्यांचा काही दिवस सराव झाल्यानंतर चार-चार शब्दांचे वाक्य बोलायला लावावेत.
उदाहरण:
# I am brushing teeth
# I went to school
# I walked on the road
▪️ जर शक्य असेल तर दररोज कृती करत असताना म्हणुन दाखवावे व म्हणुन घ्यावे. उदा ब्रश करत असताना am brushing teeth असे म्हणावे व म्हणण्यास सांगावे.
▪️ भाषा सराव किंवा शब्द संग्रह वाढण्यासाठी चित्र असलेल्या काही पुस्तकांचा जसे Cartoons, Poems, Songs यांचा वापर करावा व कृती करुन अर्थ सांगावा. उदा. Twinkle Twinkle Little Star ही कविता शिकवताना कृती - करत प्रत्येक शब्दाचा अर्थ मुलांना आपल्या मातृभाषेत सांगावा.
🔸 बोलण्यासाठी प्रोत्साहन देणे
मुलांच्या हातात एक चित्र द्यावे. उदा. गाईचे चित्र आणि त्याला त्याबद्दल मातृभाषेत माहीती द्यायला सांगावे. तो ज्या शब्दात सांगेल, जसे सांगेल तसे ऐकावे व त्याचे बोलणे पूर्ण झाल्यावर इंग्रजी भाषेत काय म्हणतात ते विचारावे. प्रत्येक वाक्याचे भाषांतर ऐकावे. त्याला लक्षात न येणारे शब्द सांगावेत.
▪️एक सारखे वाटणारे शब्द (इंग्रजी) शिकवावेत.
हे शब्द लक्षात रहायला सोपे जातात.
जसे-
# Bat, Rat, Cat, Hat.
# Game, Name, Same
▪️एखाद्या जागेची माहिती व तेथील इतर वस्तुंची नावे विचारावीत
मुलाला अचानक एखादी जागा सांगावी. ती जागा डोळ्यासमोर आठवू त्या जागेबाबत व तेथील विविध वस्तूंची नावे मातृभाषेत व इंग्रजी भाषेत सांगायला लावावे. जसे
# रेल्वेस्टेशन: Platform, Railway Engine, Book Stall # गार्डन: Tree, Grass, Canteen, Meri-go-round, See-Saw.
▪️ शब्द कोडे
छोटे-छोटे व सोपे शब्द कोडे सांगावे व उत्तर विचारावे.
उदा. I am a Small animal drink milk I Speak mew-mew
Ans : Cat
▪️घरामधील कार्यक्रम
घरामध्ये इंग्रजी भाषेचे विविध कार्यक्रम मुलांना टिव्ही, सिडी, व्हिडीओद्वारे दाखवावेत. यामुळे इंग्रजी भाषेचे ज्ञान व शब्दसंग्रह वाढण्यास मदत होईल.
▪️मुलांना दिशा शिकवाव्यात
या वयात भाषेचे ज्ञान देतांना विविध भाषेमध्ये येणाऱ्या सर्व दिशा व निर्देशणे मुलांना स्पष्ट करावेत.
जसे -
# वर खाली (up-down)
~ Stand up
~ Sit down
~ Look up
# आत बाहेर (In Out)
~ Come In
~ Go out
# पुढे मागे (front-back)
~ Your friend live in front of your home
~ School is in back of garden
# च्या वर च्या खाली (Over-Under)
~ Sky is over the earth
~ Put this stool under the table
🔷 वेगवेगळ्या भाषा शिकण्याचे महत्त्व
प्रत्येक व्यक्तीला किमान तीन भाषेचे ज्ञान असावे. जेवढ्या भाषा जास्त शिकता येतील तेवढ्या भाषा शिकाव्यात. वेगवेगळ्या भाषांचे ज्ञान असल्यामुळे ....
▪️आपण विविधप्रकारच्या लोकांसोबत बोलू शकतो.
▪️आपल्याला विविध भागातील लोकांसोबत संबंध प्रस्थापीत करता येतात.
▪️-काहीही करणे कुठेही जाणे सोपे वाटते.
▪️तसेच आपला आत्मविश्वासही वाढलेला असतो.
Remember- Knowing different language is essential for high self esteem
Dr Ashish Agrawal
8888126037, 8483905330
Comments
Post a Comment