वाचन व लेखनासाठी प्रोत्साहन, मुलाला पूर्व प्राथमिक शाळेत तयार करणे {हसत खेल बाल विकास मधील लेख}
🔴 वाचन व लेखनासाठी प्रोत्साहन, मुलाला पूर्व प्राथमिक शाळेत तयार करणे
१. वाचन व लेखन याबद्दल याच वयामध्ये आवड व कौशल्य संपादन करणे आवश्यक असते.
२. मुलांना वाचन व लेखन कशाप्रकारे आवश्यक आहे हे दाखवावे. जसे,
अ. लिखान क्षमता असल्यास आपल्याला आपले नाव लिहता येते.
ब. गोष्टींचे पुस्तके वाचुन गोष्टी सांगता येतात.
क. कुठेही गेलो तर त्या ठिकाणी लिहलेल्या सुचना, नावे, किंमत इ. वाचता आले तर आपल्याला त्याचा फायदा होतो उदा - बसची पाटी, हॉटेलमधला मेनु, आईस्कीमचे बोर्डस, जाहिरात इ.
३. आपल्या मुलाला काहीवेळा एकाच ठिकाणी बसुन एकाग्र होण्यास शिकवावे त्यासाठी काही खेळ जसे ठोकळे जुळवणे, चित्र काढणे, खेळातील पत्यांच्या जोड्या करणे इ.
४. रेखाटन करताना मुलाला लिहता आलेच पाहिजे असा आग्रह करु नये, फक्त सवय व आवड करावी.
▪️जसे A लिहताना मुले- अशा प्रकारे लिहित-लिहित शिकतात.
६. मुलांसोबत डॉक्टर, शिक्षक, ऑफीस ऑफीस, टेलीफोन आपरेटर, असे खेळ खेळावेत. ज्यामध्ये काही लिहण्याचे प्रसंग असतात. मुलांना • त्याची भुमिका द्यावी. जसे मुलाला डॉक्टरांची भुमिका देऊन, औषधी लिहुन घ्यावीत, या खेळामध्ये मुलाला जे वाटेल ते कागदावर लिहू द्यावे.
Remember- Praise your child more than you correct in this age.
🔹 कसे करावे ?
१. सर्वप्रथम कागद, वही, पेन्सील, पेन्सील कलर्स, वॅक्स कलर्स, पाटी इ. एकत्र करून संच तयार करावा. त्या संचाला एका कपाटामध्ये किंवा बॅगमध्ये ठेवुन एक नाव द्यावे जसे 'बंटीस लायब्ररी', ' 'प्रेरणा 'लेखन संग्रह' इ.
२. मुलांना पेन्सील व वही हातामध्ये धरायला शिकवावे.
३. दोन ते अडीच वर्षाचे मुल धरायला शिकेल व फक्त गोल गोल किंवा वेडेवाकडे रेखाटन करेल.
४. अडीच ते तीन वर्षाचे मुल रेखाटनावर नियंत्रण करु शकेल व पहिले पेक्षा चांगल्या रेषा काढेल.
५. पुढे पुढे त्यांना रेषा काढायला सांगावे.
६. मुलाने लिहलेले काही विशेष लिखान घरामध्ये दर्शनीय भागात लावावे. इतरांसमोर भिंतीवर लावलेले कटींग दाखवुन प्रशंसा करावी.
७. मुलांचा उत्साह वाढविण्यासाठी त्यांनी केलेले सर्व रेखाटन, कागदावर काढलेली चित्रे, रंगभरलेली चित्रे, मुळाक्षरे, विविध प्रकारचा सराव केलेल्या सर्व कागदाचा एक गड्ढा करुन त्याचे पुस्तक तयार करावे. हे पुस्तक पाहून मुलाला खुप आनंद मिळेल. त्यातुन त्याला सुधारणा करण्यासाटी प्रोत्साहन मिळेल.
# अंतः मनाचे समाधान लाभेल.
# पुढे या उत्तेजनेतुन पुस्तक लिहण्याची प्रेरणाही त्याला मिळेल.
# मोठा झाल्यावर हे पुस्तक पाहून आई बाबांनी आपल्यासाठी केलेल्या मेहनतीची आठवण राहील.
Remember- "praise the children, they will blossom"
🙏🏻🙏🏻 तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता.
Dr Gunjan Ashish Agrawal
8888126037, 8483905330
Comments
Post a Comment