तुमच्या मुलाला शिकवा मुळाक्षरे (Alphabates); पूर्व प्राथमिक शाळेत शिकवण्याचे तंत्र
🟢 मुळाक्षरे (Alphabates); पूर्व प्राथमिक शाळेत शिकवण्याचे तंत्र
🔹 मुळाक्षरे
अ. एका कार्ड वर (Flash Card) ABCD यासारखी मुळाक्षरे गडद शाईने लिहावीत. ती वारंवार मुलांना दाखवून त्याबद्दल सांगावे. वारंवार दाखवणे व सांगत रहाणे केल्यास मुलांना त्या अक्षरांबद्दल आवड निर्माण होऊन लक्षात राहण्यासाठी सोपे होईल. या सरावानंतर योग्य क्रमाणे लाऊन शक शिकवावित.
A
B
C
ब. एकदा क्रम शिकवल्यावर अक्षरे लिहून ओळखण्यास सांगावे. 'पुढे मागे, चकवा देणारे
🔹 या नंतर मुलांना A- Apple या प्रमाणे जोडी ओळखण्यास लावावे.. क. जसे एका बाजुला अक्षरे व दुसऱ्या बाजुला चित्र.
A-Apple, B-Ball या प्रमाणे सराव करुन घ्यावा. यासाठी अक्षरांच्या कार्डस सोबत चित्रांचेही कार्डस् तयार करावेत. एका हातात चित्र व दुसऱ्या अक्षर दाखवून माहिती द्यावी व वदवुन घ्यावे. यानंतर मुलांना अक्षर हातात उचलून चित्र उचण्यास सांगावे. तसेच चित्र घेऊन अक्षर उचलणे असा उलट सुलट प्रकारे अभ्यास घ्यावा.
जसे तसेच अक्षरांच्या जोड्या जुळवणे शिकवावे.
A- Apple
B- Bat
C- Cat
D Dog
🔹 खेळता खेळता मुळाक्षरे शिकवावेत. जसे 'A' for Aeroplane असे शिकवताना त्याप्रकारे पंख उडण्याचा अभिनय व खेळ करुन शिकवावे. 'B' for Boxing असे शिकवताना बॉक्सींगचा अभिनय व खेळ करून शिकवावे. तसेच इतर अक्षरांबदलही मुलांना शिकवावे.
🔹 रंगभरून अक्षरे शिकवावे
जसे - A B या मध्ये रंग भरुन घ्यावेत, यामुळे मुलांना अक्षरे चांगल्याप्रकारे आत्मसात होतील..
🔹 मुलांसोबत बाहेर फिरताना विविध प्रकारच्या पाट्या, जाहिरातीमध्ये अक्षरे शोधण्याचा 'खेळ' आपण व मुलगा दोघांमध्ये खेळावा. जसे - 1- ISHWAR M - MULTISPECIALITY
🔹 अक्षरे असणारी गाणी मुलांना मुलांसोबत म्हणावीत, यासाठी काही सिडीस, कॅसेट्स बाजारात उपलब्ध असतात.
🔹 रोडवरुन मुलांसोबत फिरताना आजुबाजुच्या वस्तु सांगणे त्यातील मुळाक्षरे ओळखणे. जसे-
T. - Tree
R. - Road
Remember- Training is everything
🔹 दुसऱ्या लिपीतील अक्षरे ( Small letters )
एकदा मुलांना पहिल्या लिपीतील अक्षरे चांगल्याप्रकारे लिहीता आली की दुसऱ्या लिपी मधील अक्षरांचा सराव करावा. वरील प्रमाणे सराव व खेळ यासाठी सुद्धा करता येतील.
▪️ अक्षरे लिहण्याचा सराव करणे
अ. प्रथम बोटाच्या सहाय्याने सराव करावा.
ब. कागद किंवा वहिवर पेन्सीलने अक्षरे गिरविण्याचा सराव करावा.
क. टिंब टिंब काढून मुळाक्षर द्यावे व त्यांना ते टिंब रेषेने जोडून अक्षर पुर्ण करण्यास सांगावे.
ड. वरीलप्रमाणे सराव झाल्यावर A, B, C, D, Z असे व १, २, ३, १० पर्यंत लिहण्याचा सराव करावा.
इ. मुळाक्षरे शिकल्यानंतर स्वतःच्या नावातील अथवा सामान्यपणे येणाऱ्या शब्दातील अक्षरे ओळखण्याचा सराव करावा.
जसे:
आशीष - ASHSH
फ्रिज - Frz
. वारंवार मुलांना काहीतरी लिहण्यासाठी प्रेरीत करावे.
उदा - बाजारात जाण्यापूर्वी यादी तयार करताना मुलाला एका कागदावर फक्त त्याला लक्षात येणारे अक्षर लिहण्यास सांगावे.
जसे - Potato - P
Apple - APL
Tomato - TMT
.... खरेदी करताना त्याला कागदावर लिहलेले विचारावे व सांगत असताना खरेदी करावी म्हणजे यादी लिहता आली तर काय फायदा होतो हे त्याच्या लक्षात येईल.
ग. चित्रांमधुन उदाहरणे दाखवुन अक्षरे लिहण्यास सांगावे.
उदाहरण- R- Rose
एच. अक्षरांचे कोडे -
ज्याप्रमाणे-
1) रिकाम्या जागी येणारे अक्षर
A, B.. D.E.
(ii) पुढचे व मागचे अक्षर लिहणे
H
W
Remember- The duty of parents to motivate the child for learning
Dr Ashish Agrawal
8888126037, 8483905330
Comments
Post a Comment