आई-वडिलांची भिन्न मते; बाल संस्कार या पुस्तकातील लेख

आई-वडिलांची भिन्न मते 

आई व वडिल हे भिन्न विचार प्रणालीचे असणे फार सामान्य बाब आहे. जगामध्ये एकही विवाह असा नाही जेथे आई-वडिलांची मते एकसारखी आहेत कारण दोघेही वेगवेगळया घरामध्ये मोठे झालेले व वेगवेगळया संस्कृतीत वाढलेले असतात.
अ) आई-वडिलांची भिन्न मते खालील गोष्टीमध्ये पहावयास मिळतात.
i) शिस्त लावण्याच्या भिन्न पध्दती असणे.
ii) कोणत्या शिस्तीला प्राधान्य द्यावे याबद्दल दुमत असणे.
iii) मुलांमध्ये असलेली समस्या ही समस्याच आहे किंवा नाही याबद्दल दुमत असणे.
(iv) असलेली समस्या सोडविणे अत्यावश्यक आहे किंवा अनावश्यक आहे याबद्दल दुमत असणे. परिणाम जेव्हा अशाप्रकारचे वातावरण घरामध्ये असते व मुलांसमोर हे वारंवार घडते तेव्हा मुलांच्या चतुर बुध्दीतून हे लपत नाही व आपल्या या कमजोरीला पाहून दोघांच्या भांडणाचा फायदा घेतात. अशावातावरणाचा फायदा म्हणजे स्वतःला आवडेल तसे वागतात.
Remember- Most parents are consistently inconsistent
🔸 आपण काय करावे :
i) आपल्या मुलातील असलेल्या उणीवांबद्दल एक दुसऱ्याला दोष देऊ नये. मुलांमध्ये असलेले दोष फक्त एकट्यामुळेच नसतात.
ii) समजा एखादया गोष्टीसाठी पालकांची मते वेगवेगळी असतील, एक जण मुलाला त्या गोष्टीसाठी रागवत असेल व दुसऱ्याला है पटत नसेल तरी त्यावेळी त्याला विरोध करु नये म्हणजे मुलासमोरच भिन्न विचारांचे प्रदर्शन होणार नाही. सर्व काही संपल्यानंतर एकट्यामध्ये दोघांनी त्या विषयावर चर्चा करुन एक दुसऱ्याच्या चुका काढण्यापेक्षा पुढे कोणता नियम ठरवायचा हे निश्चित करावे.
(iii) आपल्या मुलामध्ये असलेले दोष दोघांनी वेगवेगळे बसून लिहावेत. दोघांच्या यादीतील सामान्य असलेल्या दोषांना प्राधान्य देऊन एक यादी तयार करावी. तयार यादीतील दोषांसाठी कोणती शिस्त लावावी हे ठरवावें व शिस्त लावण्यासाठी कोणत्या पध्दतीचा अवलंब करावा हे सुध्दा निश्चीत करावे.
iv) वरीलप्रकारे प्रयत्न करून सुध्दा मुलांमध्ये चांगल्या सवयी किंवा सुरक्षीततेची भावना जाणवत नसेल तर Child Psychology Centre मध्ये डॉक्टरांशी संपर्क साधावा.
Remember- Every parent argues with each other, but should avoid in front of the child.
🙏🏻🙏🏻🙏🏻 Article from the book "Bal Sanskar"

 Please write your comment on your comment box and share with your near & dear.

 *If you wish to receive such articles or videos, send Hi message on WhatsApp number 8888126037* 
Join us on 
*Youtube- Dr Ashish Agrawal* 
*Instagram- drgunjan12* 
*Facebook- Ishwar multispecality* 

👍 Dr Ashish Agrawal, Child specialist & expert in parenting, education & behaviour problems.
👍 Dr Gunjan Agrawal, Dental surgeon.

Comments

Popular posts from this blog

मैंने खूब पढ़ाई की लेकिन रिजल्ट नहीं मिला (छात्रों के लिए उपयोगी)

हसत-खेळत बालविकास; पालकांची भूमिका

Life lesson; Stop comparing yourself with others