तुमच्या मुलाला बिनशर्त स्वीकारा; बाल संस्कार या पुस्तकातील लेख

स्वीकृती (Concept of acceptance)

एका सर्वेक्षणातुन मिळालेल्या माहितीचा आभ्यास केल्यावर असे निदर्शणात आले की जे लोक आत्महत्या करतात त्यामागचे मुख्य कारण त्यांच्या भावनीकतेशी संबधीत असते. या लोकांच्या भावना अशा असतात की ते त्यांच्या जवळच्या व्यक्तींना स्वीकृत नसतात. म्हणजेच थोडक्यात स्पष्टीकरण असे की कोणत्याही व्यक्तीचा जेव्हा त्याच्या जवळच्या व्यक्तीकडून स्वीकार केला जात नाही तेव्हा तो आत्महत्या करण्यासारख्या विचारापर्यत जाऊ शकतो.
Remember- "A parent is one who accepts their children as they are'
समजा एका घरामधील पति-पत्नी दोघेही सुशिक्षीत व नोकरी करणारे आहेत. त्यांच्या मध्ये वाद झाला तर त्यापैकी पत्नी म्हणते, “मी तुमच्या सोबत राहील पण तुम्हाला आई-वडिलांपासून दुर रहावे लागेल.” पती म्हणतात की, “तुला माझ्यासोबत रहायचे असेल तर नोकरी सोडून घरी काम करावे लागेल" म्हणजे दोघेही एक दुसऱ्याला स्वीकार करण्यास तयार आहेत पण त्यासाठी काही अट घालण्यात येत आहे.
आपल्याला हे वाचताना वाईट वाटते. पण आपण स्वतः आपल्या मुलांसोबत तसे वागत असतो. त्याला चांगले मार्क्स मिळाले किंवा पहिला नंबर आला तर खुप प्रशंसा, लाड व प्रेम करतो. तेच जर कमी मार्क्स किंवा अयशस्वी झाला तर अपमानास्पद वागणुक, मार किंवा तुच्छ शब्दांनी सत्कार करतो. थोडा विचार करा आपल्या मुलांना काय वाटत असेल? आपल्याला स्वीकृतीसाठी अट घातली तर आवडत नाही आणि त्या चिमुकल्याने कसे सहन करावे बिनशर्त किंवा कोणतीही अट न घालता पालकांची स्वीकृती मुलांना हवी असते. मुलांच्या विकास व आत्मविश्वासासाठी आई वडिलांची स्वीकृती मुळ पायाची भुमिका पूर्ण करते. आपली प्रतीमा आई-वडिलांच्या डोळ्यामध्ये कशी आहे त्याप्रमाणे ते आपल्या जीवनाची वाटचाल करतात.
You may be one person in the world, For your child, you are the whole world Accept him unconditionally
मुलांना अस्वीकृती जाणवण्याची कारणे :
१. मुलांकडूनजास्त प्रमाणात अपेक्षा.
२. मुलांची इतरांसोबत केलेली तुलना.
Read my book Bal Sanskar for this topic in details.

🙏🏻🙏🏻🙏🏻 Please write your comment on your comment box and share with your near & dear.

 *If you wish to receive such articles or videos, send Hi message on WhatsApp number 8888126037* 
Join us on 
*Youtube- Dr Ashish Agrawal* 
*Instagram- drgunjan12* 
*Facebook- Ishwar multispecality* 

👍 Dr Ashish Agrawal, Child specialist & expert in parenting, education & behaviour problems.
👍 Dr Gunjan Agrawal, Dental surgeon.
8888126037, 8483905330

Comments

Popular posts from this blog

मैंने खूब पढ़ाई की लेकिन रिजल्ट नहीं मिला (छात्रों के लिए उपयोगी)

हसत-खेळत बालविकास; पालकांची भूमिका

Life lesson; Stop comparing yourself with others