स्वतःचा अधिकार गाजविणारे पालक; बाल संस्कार या पुस्तकातील लेख

स्वतःचा अधिकार गाजविणारे पालक :

अशा प्रकारचे पालक मुलांना काय हवे याकडे लक्ष न देता आपल्याला काय व कसे हवे याकडे लक्ष देतात. अशा पालकांना स्वतःच्या मनात असलेले नियम व शिस्त मुलांमध्ये जशीच्या तशी आलीच पाहीजे असा अट्टहास असतो. या पालकांमध्ये मुलांकडून अपेक्षा असतात परंतु स्वतःच्या कर्तव्याकडे व जबाबदारीकडे दुर्लक्ष करण्याची सवय असते. अशा व्यक्ती मुलांवरच नव्हे तर घरातील इतर सर्व सदस्यावर हुकूमत करत असतात.
'मला जसे हवे तसेच पाहीजे' असा या पालकांचा नियम असतो आणि त्यासाठी फार कठोरपणे शारीरीक वा मानसिक शिक्षा करू शकतात.
मुलांनी प्रतिप्रश्न किंवा चर्चा न करता आपले म्हणने एकावे अशी त्यांची इच्छा असते. थोडक्यात सांगायचे म्हणजे जगप्रसिध्द हिटलर यांच्यामध्ये संचारलेली असते.
Remember- Strict parenting creates a barrier between the kids & their parents.
🔸 परिणाम : या प्रकारच्या पालकत्वाचा परिणाम मुलांवर फार वाईट होत असतो. या पालकांची मुले आक्रमक, क्रूर अशा वर्तणुकीची होतात. बाह्य दिखाव्यात जरी आक्रमकता असेल तरी अंतरंगात ही मुले भित्र्या स्वभावाची व स्वतःला असुरक्षीत समजणारी असतात.
Remember- 'If child lives with hostility, he learn to fight'
🔸 आपण काय करावे :
i) अशा प्रकारच्या पालकांनी आपला स्वभाव बदलायचा पूर्ण प्रयत्न करावा. स्वभाव एकदम बदलणे कठीण जरी असले तरी हळूहळू सरावाने बदलता येतो.
ii) आपल्या मुलांना भरपूर प्रेम द्यावे.
iii) प्रेम देताना मुल जिथे चुकेल त्याठिकाणी कडक रहावे.
iv) आपल्या मुलांना शिस्त लावतांना काय योग्य आहे व काय अयोग्य आहे याबद्दल सकारण चर्चा करण्याची सवय लावावी.
Remember- Parenting is about nurturing, not controlling the child

🙏🏻🙏🏻🙏🏻 Please write your comment on your comment box and share with your near & dear.

 *If you wish to receive such articles or videos, send Hi message on WhatsApp number 8888126037* 
Join us on 
*Youtube- Dr Ashish Agrawal* 
*Instagram- drgunjan12* 
*Facebook- Ishwar multispecality* 

👍 Dr Ashish Agrawal, Child specialist & expert in parenting, education & behaviour problems.
👍 Dr Gunjan Agrawal, Dental surgeon.

Comments

Popular posts from this blog

मैंने खूब पढ़ाई की लेकिन रिजल्ट नहीं मिला (छात्रों के लिए उपयोगी)

हसत-खेळत बालविकास; पालकांची भूमिका

Life lesson; Stop comparing yourself with others