स्वतःला असुरक्षित समजणारे पालक; बाल संस्कार या पुस्तकातील लेख
स्वतःला असुरक्षित समजणारे पालक :
एकदा मी रोजप्रमाणे माझे पेशंट तपासताना एक आठ वर्षे वयाची मुलगी तिच्या आई वडिलांसोबत माझ्या केबिनमध्ये आली. तीला जास्त काही नाही सामान्यपणे होणारा सर्दी, खोकला झाला होता. तिची तपासणी झाल्यावर आजाराचे स्पष्टीकरण करून मी औषधी लिहण्यास सुरूवात करताच त्या मुलीने मला विचारले, “अंकल दोन तीन दिवसामध्ये मी मरणार का?" अशा प्रकारच्या तिच्या विचारण्याने मी थक्क झालो. माझे लेटरपॅड व पेन बाजुला ठेऊन मी तीला व तिच्या पालकांना बसायला सांगीतले. अर्धा मिनीट शांतता झाल्यावर मी विचारले “बेटा तू असे का बोलत आहेस?" तेव्हा त्या मुलीने स्पष्ट केले की तिचे मम्मी पापा तिच्या आजाराबद्दल फार चिंतेत असून मेंदुमध्ये ताप गेला तर काय होईल? अशावेळी मृत्यूही होऊ शकतो, अशी चर्चा करताना तिने ऐकले
वरील प्रसंगावरून लक्षात येते की आपण स्वतः असुरक्षीत किंवा 'घाबरट असल्याचे प्रदर्शन मुलांसमोर केल्यास, मुले सुध्दा स्वतःला असुरक्षीत समजुन नेहमी अशाप्रकारची भावना ठेवतात.
Remember- The strongest emotions of mankind is fear
अ) आपण काय करावे ?
i) अशाप्रकारच्या पालकांनी मुलांसमोर याप्रकारे चर्चा करू नये. स्वतःच्या चेहऱ्यावर किंवा देहबोलीतही असे विचार आणु नयेत. ii) नेहमी मुलांसमोर सकारात्मक विचार करून सकारात्मक संभाषण करावे.
iii) एखादी मोठी समस्या समोर आली असताना धैर्याने व मोठ्या मनाने सोडविण्याचा प्रयत्न करावा. सकारात्मक व धाडसी कृत्य करीत रहावे कारण मुले आपले निरीक्षण करीत असतात..
Remember- Once you become fearless, life becomes limitless
🙏🏻🙏🏻🙏🏻 Article from book Bal Sanskar.
Please write your comment on your comment box and share with your near & dear.
*If you wish to receive such articles or videos, send Hi message on WhatsApp number 8888126037*
Join us on
*Youtube- Dr Ashish Agrawal*
*Instagram- drgunjan12*
*Facebook- Ishwar multispecality*
👍 Dr Ashish Agrawal, Child specialist & expert in parenting, education & behaviour problems.
👍 Dr Gunjan Agrawal, Dental surgeon.
Comments
Post a Comment