अध्यात्मिक संस्कार (Spiritual Development); बाल संस्कार या पुस्तकातील लेख
अध्यात्मिक संस्कार (Spiritual Development)
------------------------------------------------------------
आजच्या युगामध्ये आपल्याला जिकडे-तिकडे क्रुरवृत्ती, आत्महत्या, गुन्हेगारी, तलाक इ. सारख्या घटना सतत ऐकायला मिळत आहेत. अशा घटना आपण भावनीक असंतुलनामुळे घडत आहेत किंवा मानसीक तणावाखाली घडत आहेत अशी चर्चा करून दुर्लक्षीत करतो. आपल्या भावनांवर नियंत्रण नसणे म्हणजे आपला भावनीक विकास कमी आहे असे म्हणता येईल. कोणत्याही व्यक्तीचा भावनीक विकास घडवायचा असल्यास आध्यात्मिक संस्कार करणे अत्यंत आवश्यक असते. नवीन विचारप्रणाली असलेले पालक आपल्या मुलांना कोणत्यातरी विशिष्ट धर्मामध्ये बांधून ठेवण्यास किंवा धार्मिक आचरण करण्यास मज्जाव करतात. पण अशा विचाराच्या पालकांचा मी विरोध करतो. धार्मिक, आध्यात्मीक शास्त्राचा सखोल अभ्यास केल्यास असे लक्षात येईल की अध्यात्मीक आचरणातून व्यक्तीला मानव म्हणून जगायला शिकवले जाते. त्यामुळे मी म्हणतो. 'ज्या धर्मामध्ये आपण जन्म घेतला आहे. त्या धर्माचे आचरण करुन आपला आध्यात्मीक विकास करुन घ्यावा. '
Remember- Believing & following the moral values is the essence of the life
🔸 अध्यात्मीक संस्कार कसे घडवावेत ?
अ) स्वतःचा आदर्श ठेवावा :
आपण स्वतः देव या शक्तीवर विश्वास ठेवून आपआपल्या धर्माप्रमाणे सेवा, पुजा, जप इ. करावेत. आपण स्वतः नियमितपणे आध्यात्मीक विचारांचे अनुकरण, धार्मिक नियमाप्रमाणे जसे-पुजा, नमाज, प्रार्थना इ. केल्याने मुलांमध्ये आध्यात्मिक वातावरणाचे आकर्षण निर्माण होते. त्यामुळे स्वतः घरातील वातावरण व आचरण तसेच विचारप्रणाली उच्च दर्जाची ठेवावी.
Remember- 'Don't tell anything to your child, Just do yourself and let him watch'
ब) प्रार्थनेचे महत्व शिकवावे :
आपल्या मुलांना प्रार्थना केल्यामुळे ात्मीक समाधान मिळते, आपला देवावरील विश्वास वाढतो, मन शांत ठेवण्यास मदत होते तसेच आपला आत्मविश्वास वाढतो याप्रकारे प्रार्थनेबद्दलचे महत्व सांगावे. जसे आपघात पाहिल्यावर त्या पिडीत व्यक्तीच्या आरोग्यासाठी प्रार्थना केल्यामुळे समाधान मिळते.
क) आध्यात्मिक ठिकाणी नियमित भेट :
आपण आपल्या मुलांसोबत नियमितपणे दररोज मंदिर, मज्जिद इ. ठिकाणी जावे. दररोज शक्य नसेल तर आठवड्यात एकदा किंवा दोनदा नियमितपणे भेट द्यावी. तेथील सेवा व अर्चना करावी.
ड) धर्मगुरुंच्या दर्शनस्थानी भेट :
आपआपल्या धर्मगुरुंच्या दर्शनासाठी त्यांच्या आध्यात्मिक केंद, आश्रम, मंदिर इ. ठिकाणी नियमित भेट द्यावी. धर्मगुरुंच्या विचारांचे ज्ञान मिळवून आचरणात आणण्यासाठी मुलांना त्यांच्या परीने मार्गदर्शन करावे.
इ) आध्यात्मिक सी.डी.ज् चा वापर करणे :
आपल्या घरामध्ये मनोरंजनासाठी सीडी ऐकताना किंवा पाहताना इतर प्रकारच्या सीडीज् ऐवजी धार्मिक सिडीचा वापर करावा. सकाळच्या वेळी धार्मिक संगीत किंवा आध्यात्मिक हितगुजाचे नियमित श्रवण केल्यास मन प्रसन्नता लाभते व मुलांना आध्यात्मिक विचाराचे आकर्षण निर्माण होते.
ई) आध्यात्मिक पुस्तकांचे वाचन :
घरामध्ये नियमितपणे किंवा फावल्या वेळेमध्ये आध्यात्मिक पुस्तकांचे वाचन करावे. आध्यात्मिक विचारांची देवाण-घेवाण मुलांसोबत वाचन करताना आवर्जुन करावी. रामायण, महाभारत या सारख्या ग्रंथातील गोष्टी मुलांना नियमित ऐकवाव्यात. यातून आध्यात्मिक विचारांची शिकवण मुलांना मिळते.
(उ) कामाची सुरुवात करताना प्रार्थना करणे :
कोणत्याही महत्वाच्या कामाची सुरुवात करताना देवाची आठवण करावी.. देवाची प्रार्थना करुनच घराबाहेर जावे. मुलांच्या बाबतीत शाळेत जातांना, परीक्षेला जाताना, स्पर्धेच्याआधी इ. वेळी देवाची प्रार्थना सवय मुलांना लावावी. करण्याची
ऊ) रात्री झोपतानाचे नियम :
करन रोज रात्री झोपण्यापूर्वी मुलांसोबत ईश्वरी शक्ती तसेच आध्यात्मिक विकासाबद्दल चर्चा करावी. झोपण्यापुर्वी आपल्या परमेश्वराची प्रार्थना दिवसभर घडलेल्या चांगल्या घटनांबद्दल ईश्वराचे आभार मानावेत.
ए) आभार व्यक्त करणे :
कोणतेही महत्वाचे काम पूर्ण झाल्यावर किंवा यशस्वीरित्या पार पाडल्यावर हे सर्व देवाच्या कृपेनेच होत आहे असा विश्वास ठेवावा. मुलांमध्ये या प्रकारची। श्रद्धा निर्माण करावी. मुलांच्या बाबतीत परीक्षेत पहिला रँक मिळाल्यावर, स्पर्धेसाठी निवड झाल्यावर, इतर परिक्षेत प्राविण्य मिळविल्यावर, कोणताही निकाल समाधानकारक लागल्यावर किंवा यासारखे कोणतेही काम पूर्ण झाल्याय देवाची प्रार्थना करुन आभार व्यक्त करण्याची सवय लावावी.
ऐ) चांगल्या गोष्टी शोधणे :
कोणत्याही व्यक्तीमधील दोष पाहण्यापेक्षा त्या व्यक्तीच्या चांगल्यागुणाचे अवलोकन करण्यास मुलांना शिकवावे. आपले मुल एखादेवेळी त्याच्या मित्राबद्दल वाईट बोलत असेल जसे : जय फार खोडकर मुलगा आहे तर त्यावेळी अजयच्या चांगल्या गुणांकडे पहावे व निंदा करु नये अशी शिकवण द्यावी. अजय खोडकर आहे पण इतरांना हसविण्याची कला त्याच्यामध्ये आहे अशा दृष्टीने त्याच्याकडे पहावे.
ओ) इतर धर्माबद्दल माहिती द्यावी :
आपल्या व्यतिरिक्त इतर धर्माबद्दलची माहिती मुलाला द्यावी. इतर धर्म कोणते? याबद्दल माहिती देऊन आपल्या व सर्वधर्माची मुळ शिकवण सारखी कशी आहे याबद्दल स्पष्ट करावे.
🙏🏻🙏🏻🙏🏻 Please write your comment on your comment box and share with your near & dear.
*If you wish to receive such articles or videos, send Hi message on WhatsApp number 8888126037*
Join us on
*Youtube- Dr Ashish Agrawal*
*Instagram- drgunjan12*
*Facebook- Ishwar multispecality*
👍 Dr Ashish Agrawal, Child specialist & expert in parenting, education & behaviour problems.
👍 Dr Gunjan Agrawal, Dental surgeon.
Comments
Post a Comment