सामाजिक संस्कार (Social Development); बाल संस्कार पुस्तक से लेख

सामाजिक संस्कार (Social Development)
----------------------------------------------------------------

समाजामध्ये मित्र तयार करणे, आपल्या मनातील राग व भावना चांगल्याप्रकारे व्यक्त करता येणे, भांडणे व संबंधातील मतभेद शांतपणे मिटवता येणे, दुःखीताना सहानुभुती देणे, सामाजिक नियमांचे पालन करणे, मित्रपरिवारामध्ये आनंदाने रममान होणे इ. प्रकारच्या सर्व कृती योग्य रितीने पूर्ण करणाऱ्या व्यक्तीचे सामाजिक संबंध चांगले आहेत असे आपण म्हणतो. कोणत्याही व्यक्तीवर सामाजिक संस्कार चांगले होण्यासाठी लहान वयापासूनच चांगले संस्कार करण्याची। आवश्यकता असते. मुलांमध्ये असलेल्या सामाजिक संस्काराबद्दलची भिन्नता एका उदाहरणाद्वारे आपल्याला स्पष्ट करता येईल.
एका गार्डनमध्ये दोन सी-सॉ आहेत. त्या दोन सी-सॉ वर चार मुले खेळत आहेत. सी-सॉच्या आजुबाजूला काही मुले खेळत आहेत. त्यावेळी एका किरण नावाच्या मुलाने प्रवेश केला व त्याची सी-सॉ खेळण्याची इच्छा झाली. किरण त्यावेळी खालील पैकी एक प्रतिक्रिया देऊ शकतो त्यावरुन त्याच्यावर झालेले सामाजिक संस्कार अभ्यासता येतात.
■ पहिली प्रतिक्रिया तो त्या ठिकाणी आल्याबरोबर खेळत असणाऱ्या मुलाला, मला पहिले खेळू दे असे म्हणून सरकवण्याचा प्रयत्न करेल व ऐकले नाही तर मारुन स्वतः खेळेल.
■ दुसऱ्या प्रतिक्रियेमध्ये किरण वाट पाहणार नाही, काहीही बोलणार नाही. सरळ तिथून निघून जाईल व जी खेळणी कोणी खेळत नाही व गर्दी कमी आहे अशा ठिकाणी जाऊन खेळेल.
■ तिसऱ्या प्रतिक्रियेमध्ये किरण सी-साँच्या भोवती उभा राहून स्वतःची पाळी येण्याची वाट पाहिल.
■ चौथ्या प्रतिक्रियेतला किरण सी-सॉ खेळणाऱ्या मुलासोबत मैत्री करुन आळीपाळीने खेळण्याचे ठरवेल. गार्डनमध्ये इतर मुलांशीही मैत्री करुन आळीपाळीने खेळण्याचे तंत्र तयार करेल.
Remember- Social development like making new friends or participating in social activity is crucial for success 
▪️पहिल्या प्रतिक्रियेतल्या किरणला सामाजिक मुल्याची थोडी सुद्धा जाणीव नाही. इतरांच्या अधीकाराबद्दल व सार्वजनिक ठिकाणी कसे वागावे याबद्दलचे संस्कार अतिशय कमी आहेत.
▪️दुसऱ्या प्रतिक्रियेतला किरण सुद्धा सामाजिकरित्या थोड़ा अविकसीत आहे असे म्हणता येईल. चांगली गोष्ट या किरणमध्ये आहे की तो समाज उपद्रवी नाही.
▪️तिसऱ्या प्रतिक्रियेतल्या किरणवर सामाजिक संस्कार झालेले आहेत. कारण त्याने सार्वजनिक ठिकाणी कसे वागावे याचे नियम पाळलेले आहेत. इतरांच्या अधिकाराविषयी व भावनांविषयी त्याला आस्था आहे.
▪️चौथ्या प्रतिक्रियेतला किरण सामाजिकरित्या अतिशय चांगल्याप्रकारे संस्कारीत झालेला आहे. या किरणला सर्व सामाजिक नियम माहित असून इतरांना स्वतः सोबत खेळविणे, मैत्री करणे, सार्वजनिक ठिकाणाचा उपयोग खुप आनंदाने घेणे या सर्व गोष्टीची जाणीव आहे.
१) सामाजिक संस्कार घडवणे :
अ) सामाजिक संबंध :
आपल्या मुलांसोबत इतर चर्चा करीत असतांना आपण इतरांसोबत संबंध प्रस्थापित करण्याचे कोणते फायदे होतात याबद्दल माहिती द्यावी. सामाजिक संबंधामुळे आपली सर्व कामे योग्य रितीने पूर्ण होतात, आपला आत्मविश्वास वाढतो, आपल्याला विविध जागेची, भाषेची व क्षेत्रांची माहिती मिळते. यासासारख्या विविध गोष्टीसोबत आपले जीवन आनंदी जगु शकतो हे मुलाना पटवून द्यावे. समूह तयार करुन खेळण्यासाठी मुलांना प्रोत्साहन द्यावे, समुह दोन प्रकारे तयार करता येतो. एक म्हणजे एकाच प्रकारच्या विशिष्ट कलागुण असणान्या मुलांचा समुह जसे चित्रकलेची आवड असणाऱ्या, बॅटमिंटन खेळणाऱ्या, अभ्यासामध्ये रुची असणाऱ्या मुलाचा समुह तयार करणे. दुसरा समुह हा विशिष्ट नावाखाली नसून मिश्र प्रकारची मुले एकत्रित येऊन मैत्री करणे, खेळणे तसेच विचारांची देवाण-घेवाण करणे अशाप्रकारचा असावा. यासाठी मुलांना नेहमी प्रोत्साहन द्यावे.
Remember- Building relationships is long term investment 
ब) संभाषण कौशल्य
सामाजिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी योग्य संभाषण कौशल्य असण्याची आवश्यकता असते. योग्य संभाषण कौशल्य म्हणजे आपल्या समोरील व्यक्तीचे शांतपणे ऐकणे, समजुन घेणे व योग्य आवाजामध्ये प्रतिक्रिया देणे.
🔸 संभाषण कौशल्य दोन प्रकारचे असते.
i) स्वतः बोलून संभाषण
ii) देहबोलीतून केलेले संभाषण
स्वतः बोलून केलेले संभाषण म्हणजे ऐकणे, समजणे व बोलताना योग्य उच्चारांमध्ये, आवश्यक शब्दांमध्ये उत्तर देणे. हे सर्व होत असताना आपले शरीर एक विशिष्ट प्रकारचे हावभाव व्यक्त करत असते. आपले बोलणे व शरीर यांचे योग्य नियंत्रण असणे अत्यंत आवश्यक असते. या कौशल्याबद्दची माहिती मुलांना सांगणे व सरावातून शिकवणे सतत करीत रहावे. देहबोली शिकविण्यासंबंधी माहिती आपल्याच प्रकाशनाच्या हसत खेळत बालविकास व बालविकास -४ या पुस्तकामध्ये विस्तृतपणे दिली आहे.
क) स्वतः मुलांसोबत खेळणे :
आपल्या मुलासोबत आपण इतर मुल असल्याप्रमाणे खेळावे. खेळत असताना नियमबद्ध खेळणे, मध्येच चुकीचे खेळणे, चिडवणे, दादागिरी करणे इ. प्रकार करावेत. असे करत असताना आपले मुल काय प्रतिक्रिया देते याकडे बारकाईने पहावे. त्याच्या प्रतिक्रियेमध्ये सामाजिक नियम न पाळता समस्या सोडवत असलेले दिसले तर योग्य पद्धतीचा वापर करुन समस्या कशी सोडवता येते याचे ज्ञान द्यावे.
ड) इतर मुलांसोबत खेळणे :
आपल्या मुलाला इतर मुलांसोबत खेळण्यासाठी संधी उपलब्ध करुन द्याव्यात. जसे : बागेमध्ये नेऊन इतर मुलांसोबत खेळावावे, नातेवाईकांच्या मित्रांच्या मुलांना घरी बोलावून खेळवावे, आपल्या मुलाला इतरांच्या घरी पाठवावे. अशाप्रकारे प्रयत्न केल्यास मुलांचा सामाजिक विकास चांगल्याप्रकारे घडवता येईल.
इ) सहभाग घेणे :
आपल्या मुलांना विविध ठिकाणी सहभाग घेण्यासाठी सतत प्रोत्साहन द्यावे. असे केल्यामुळे विविध व्यक्तीशी संपर्क येतो, संभाषण होते, विचारांची व कलागुणांची देवाण-घेवाण होते तसेच सामाजिक मुल्य जपण्याचे फायदे व न जपण्याचे नुकसान याचा अनुभव येतो. सहभाग घेण्यासाठी मुलांना खालील प्रकारच्या संधी उपलब्ध करुन देता येतात.
i) घरामध्ये : आपल्या घरांमध्ये चालणाऱ्या छोट्या-मोठ्या कार्यक्रमांमध्ये मुलांना सहभाग घेऊ द्यावा. त्यावेळी आवश्यक असलेली छोटी- छोटी कामे करण्यासाठी मुलांना प्रोत्साहन द्यावे.
▪️जसे : पुजेनंतर प्रसाद वाटणे, पाणी देणे, सोप-सुपारीचे पानदान देणे इ.
ii) कॉलनीमध्ये : आपल्या कॉलनीमध्ये होत असलेल्या कार्यक्रमांच्या ठिकाणी जाणे, तेथील कामात मदत करणे, स्पर्धेमध्ये भाग घेणे इ. गोष्टीसाठी प्रोत्साहन द्यावे. शेजाऱ्यांच्या घरी काही वस्तु देणे किंवा आणणे यासारखी कामे लावावीत.
▪️उदा. दुर्गामहोत्सवामध्ये होणाऱ्या स्पर्धामध्ये तसे तेथील कामांमध्ये भाग घेणे.
iii) शाळेमध्ये : शाळेमध्ये होत असलेले सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा, अभ्यासक्रमाव्यतिरिक्त परीक्षा यामध्ये मुलांना भाग घेण्यासाठी प्रोत्साहन द्यावे.
▪️जसे सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नृत्य, नाटक, हास्य, या सारख्या स्पर्धामध्ये भाग घेणे. वक्तृत्व, वादविवाद
Remember- Encouraging child to participate in social activist is most important 
(ई) सामाजिक समस्या सोडविणे-
प्रसंग : अमित आपल्या घरी आईसोबत बसून टिव्ही पहात होता. त्याचा मित्र महेश तेथे आला व पाच-दहा मिनीटे टिव्ही पाहिल्यानंतर
महेश अचल बाहेर मुले खेळत त्यांच्यासोबत खेळू या.
अमित "नाही मी येणार नाही.'
महेश : 'चल ना, आज खुप मुलं आहेत, फार मजा येईल. '
अमित नाही म्हटलंना तेच तेच का बोलतोस ?
(असे म्हणत टिव्हीवरचे लक्ष विचलीत न करता हाताने
महेशला बाजूला ढकलतो)
नीट सांग ना, असं काय करतो? मी तुझं कधी ऐकत नाही. का? यानंतर काही तू माग तेव्हा मी सांगतो.... (असे म्हणून तो टिव्ही कडे पाहू लागताच अमित त्याला एक थापड मारतो)
अमित : दादागिरी करुन धमकी देतो का? जा आमची टिव्ही पाहू नको.....
महेश मलाही काही गरज नाही जा, मी रिंकुसोबत खेळतो (असे म्हणत नाराज होऊन निघून जातो.) वरील प्रसंग आपल्यासमोर घडला असेल किंवा आपल्या मुलाने त्याप्रमाणे आपल्याला सांगितले तर आपण आपल्या मुलाला सामाजिक शिकवण त्याचवेळी द्यायला हवी.
अमितला शिकविताना
i) अमितने टिव्हीकडे पाहत न बोलता महेशच्या चेहऱ्याकडे पाहून व्यवस्थितपणे स्वागत करायला हवे होते. जसे 'बेना महेश' 'महेश छान झालं तू आलास किती छान मालिका सुरु आहे' इ. प्रकारच्या वाक्यानी सुरुवातीला बोलणे आवश्यक होते.
ii) महेश शेजारी बसून टिव्ही पाहताना अमितने त्याच्याशी काहीतरी बोलायला हवे होते.
iii) महेशने खेळायला जाऊ या असे म्हटल्यावर त्याच्यासोबत डोळे मिळवून बोलणे आवश्यक होते..
(iv) अमितला खेळायला का जायचे नाही किंवा केव्हा जायचे याबद्दल सविस्तर चर्चा करायला हवी होती. जसे- 'मी आताच खेळून आलो आहे', 'ही मालिका परत मिळणार नाही म्हणून झाल्यावर जाऊ या', 'यानंतर माझी आभ्यासाची वेळ आहे', किंवा 'मला कंटाळा आला आहे' अशाप्रकारे योग्यरित्या कारण सांगून बोलू शकत होता.
v) महेशला टिव्ही पाहण्यासाठी प्रवृत्त करणारे वाक्य बोलायला हवे होते.
vi) छोट्याशा गोष्टीसाठी ढकलून देणे, मारणे इ. प्रकार करायला नको होते.
vii) महेश घरुन जात असला त्याला थांबवून 'सॉरी' म्हणायला हवे होते.
अशा प्रकारे चर्चा करुन मुलांवर संस्कार घडविण्याचे प्रयत्न नेहमी पालकांनी करीत रहावे.
Remember- The best way to escape from the problem is to solve it.

🙏🏻🙏🏻🙏🏻 Please write your comment on your comment box and share with your near & dear.

 *If you wish to receive such articles or videos, send Hi message on WhatsApp number 8888126037* 
Join us on 
*Youtube- Dr Ashish Agrawal* 
*Instagram- drgunjan12* 
*Facebook- Ishwar multispecality* 

👍 Dr Ashish Agrawal, Child specialist & expert in parenting, education & behaviour problems.
👍 Dr Gunjan Agrawal, Dental surgeon.

Comments

Popular posts from this blog

मैंने खूब पढ़ाई की लेकिन रिजल्ट नहीं मिला (छात्रों के लिए उपयोगी)

हसत-खेळत बालविकास; पालकांची भूमिका

Life lesson; Stop comparing yourself with others