मित्रांचे अनुकरण(Peer pressure); बाल संस्कार या पुस्तकातील लेख

मित्रांचे अनुकरण(Peer pressure)
----------------------------------------------

आपले मुल जसे मोठे होत जाते तसे ते आपल्यापासून थोडे दुर व मित्रांच्या जवळ होत असते. लहानपणी आई-वडिलांचे तर मोठे होतांना आपल्या मित्रांचे पाहून अनुकरणाने अथवा दडपणाने शिकत असते. अशा या निसर्ग नियमामुळे मुलांवर दोन प्रकारे परिणाम होतात. एक तर चांगल्या गुणांचे अनुकरण किंवा मित्रांचे मन राखण्यासाठी वाईट गुणांचे अनुकरण होत असते.
Remember- Show me your friends & I will predict your future 
अ) चांगले परिणाम : मुलांचा आभ्यास, खेळ, जनरल नॉलेज, व्यक्तीमत्व विकास, सामाजीक विकास इ. गोष्टीमध्ये प्रगती होते.
ब) वाईट परिणाम : केशभुषा व वेशभुषा बदलणे, पालकांशी खोटे बोलणे, पैसे खर्च करणे, शाळा व क्लास मध्ये अनुपस्थित राहणे, पुढे मोठया वयामध्ये दारू, सिगारेट किंवा लैगींक गैरप्रकाराकडे वळणे इ. चा धोका असतो आपल्या मुलांमध्ये चांगले परिणाम दिसत असतील तर फार छान हालचालीकडे लक्ष ठेवून त्यांच्या मैत्रीला प्रोत्साहन द्यावे. या ठिकाणी लिहण्याचा उद्देश वाईट परिणामांसाठी आहे. वाईट परिणाम होऊ नयेत किंवा होत असतील तर पालकांची भुमिका मुख्य असते.
🔺 मित्रांचे अनुकरण व दडपणाची कारणे 
i) अनुकरण करण्याचे सर्वात मुख्य कारण म्हणजे, 'सर्वजण करतात मग आपण का करू नये ही भावना नैसर्गीकरित्या सर्व वयोगटामध्ये असते.
ii) आपण असे न केल्यास सर्व मित्रांसाठी आपण मस्करीचे कारण ठरू ही भीती मुलांमध्ये असते.
iii) आपण असे न केल्यास आपल्या व आपल्या मित्रामध्ये अंतर निर्माण होऊन त्यापासून दुर जाण्याची भीती मुलांना वाटत असते.
(iv) मुल जसे मोठे होते तसे त्याला स्वावलंबी होण्याचे म्हणजे काही निर्णय स्वतः घेण्याचे धाडस करावे वाटते.
v) स्वतःचे निर्णय घेण्याप्रमाणेच काहीतरी नविन करण्याची. या वयामध्ये मुलांना असते. उत्सुकता
Remember- Peer pressure are power influencer on behaviour.
🔺 आपण काय करावे 
(i) स्वतःचा आदर्श समोर ठेवावा आपण स्वतः वाईट गोष्टी मुलांसमोर करू नये जसे- सिगारेट, गुटखा, दारू किंवा असामाजिक कृत्य आपण आपला चांगला मित्र परिवार तयार करावा व मित्रांच्या चांगल्या गुणांची प्रशंसा मुलांसमोर नेहमी करावी. असे मुलांसमोर नेहमी केल्याने मुलांमध्ये आपल्या प्रमाणे चांगला मित्र परिवार तयार करण्यास प्रोत्साहन मिळेल.
(ii) अध्यात्मीक विकास : आपण स्वतः आध्यात्मावर विश्वास दाखवून त्यांनाही विश्वास द्यावा. आपल्यासोबत चांगले होईल ते आपल्या चांगल्या कर्मावर अवलंबून असते, अशाप्रकारची शिकवण देऊन मुलांचा आध्यात्मीक विकास घडवावा. तयार करण्यासाठी नेहमी प्रोत्साहन द्यावे.
iii) चांगले मित्र म्हणजे ते मित्र: आपल्या मुलाला चांगले मित्र
■ चांगले संभाषण कौशल्य असलेले.
■ चांगल्या व सुसंस्कृत कुंटूबातील असलेले.
■ चांगल्या विचारांचे अनुकरण करणारे अशाप्रकारचे असावेत. त्याचे मुख्य कारण म्हणजे चांगला मित्रपरिवार हा वाईट गुणांसाठी रक्षकांप्रमाणे कार्य करतो.
iv) मित्रांच्या संपर्कात राहणे : आपल्या मुलाच्या सर्व मित्रांचा परिचय आपल्याला असायला हवा. त्याचे मित्र कोणते आहेत हे माहित करण्यासाठी त्यांना आपल्या घरी वारंवार बोलवत रहावे. आलेल्या मित्रांसोबत परिचय व चर्चा करावी. त्यांच्या इतर मित्रांविषयी सुद्धा विचारावे. आपल्या मुलाच्या मित्रांचा परिचय झाल्याने आपल्याला त्यांच्याविषयी माहिती मिळते. त्यांच्यातील माहित असलेल्या गुण-दोषांवरुन आपल्या मुलाला मार्गदर्शन करणे सोपे जाते.
v) मित्रांच्या परिवाराशी संपर्कात रहावे : आपल्या मुलाचे जे जवळचे मित्र आहेत त्यांच्या आई-वडीलांशी नेहमी संपर्कात रहावे. त्यांच्या नियमीत भेटीमध्ये त्यांच्या मुलांची अभ्यासातील प्रगती, शाळा, इतर प्रगती व इतर मित्रांबाबतीत चर्चा करावी. अशाप्रकारच्या चर्चेतून त्यांची विचार प्रणाली, संस्कृती, विकासाबद्दलचे प्रयत्न तसेच काही दोष याबद्दल माहीती आपल्याला मिळते. आपले मुल वाईट गोष्टीकडे जात आहे का? किंवा काही गैरप्रकाराकडे वळत आहे का या बद्दलची माहिती आपल्याला होत असते. अशाप्रकारच्या संपर्कामुळे किंवा माहितीमुळे आपण मुलांना योग्य मार्गदर्शन करु शकतो.
vi) वाईट मित्रापासून दुर राहण्यास प्रोत्साहन द्यावे : समजा अपल्या लक्षात आले की आपले मुल काही वाईट मित्रांच्या संपर्कात येत आहे, त्यावेळी आपल्या मुलाला ती मुले कोणत्या वाईट गुणांची आहेत व त्यामध्ये असलेले गुण वाईट का आहेत तसेच त्याचे काय वाईट परिणाम होऊ शकतात, याबद्दल चर्चा करावी. वाईट मित्रांपासून आपली मैत्री व संपर्क कमी ठेवण्यास वारंवार सांगावे. विशेष म्हणजे यामुलांसोबत जास्त होणारा सहवास टाळावा जसे- शाळेत जाणे, आभ्यास करणे, सोबत जेवण करणे, नेहमी खेळणे, फिरणे इत्यादी. ज्या ठिकाणी सामाजिक किंवा टिम तयार करून काही करावयाचे असेल त्याठिकाणी कोणत्याही मित्रांना टाळू नये. जसे: क्रिकेट टिम, सांस्कृतीक कार्यक्रम, सहल इ. 
vii) निरीक्षकाप्रमाणे मुलांवर लक्ष ठेवावे आपल्या मुलाच्या बोलणे, कपडे किंवा केसभुषा यामध्ये काही बदल जाणवत असतील तर त्यामागचे कारण शोधावे. त्यांचे मित्र नविन तयार झाले का? किंवा कोणत्या वाईट मुलांचे तो अनुकरण करीत आहे का? हे माहीत करावे व त्यानुसार आपण मुलांना उपदेश द्यावेत. एकदा मी माझ्या मित्राच्या घरी सहज गेलो होतो. त्याच्या चौथ्या वर्गात शिकणाऱ्या मुलाने त्याला पाच रूपये मागीतले, त्या मित्राने त्याला सहजपणे दिले सुध्दा. मी त्या मित्राशी चर्चा केली की हा पैसे का व केव्हा पासून मागत आहे. तर मित्राने सांगीतले की या आठ पंधरा दिवसामध्येच मागीतले. तेव्हा मी त्याला कारण शोधायला सांगीतले व तीन चार दिवसानंतर खर्च करतात माझ्या मित्राला माहित झाले की मुलाचे मित्र पैसे आणुन त्यामुळे त्यालाही पैसे हवे असतात. म्हणजेच त्याचा मुलगा त्याच्या मित्राच्या दडपणाखाली पैसे खर्च करीत होता. याच प्रमाणे मुलांमध्ये कोणत्याही होणाऱ्या बदलांवर बारकाईने लक्ष दयावे त्यामागे मित्र कारणीभूत असु शकतात.
viii) मुलांना नाही म्हणायला शिकवावे : आपल्या मुलाने सहा वर्ष पूर्ण केल्यानंतर त्याला त्यांच्या मित्रांना नाही म्हणायला शिकवावे. काही गोष्टीसाठी नकार देणे आवश्यक असते परंतु मैत्रीच्या दडपणामुळे मुल प्रत्येक गोष्टीला होकार देत असते. जर तो मित्र योग्य नाही किंवा आपल्या मुलाचा उपयोग करत आहे असे जाणवत असल्यास त्याला नाही म्हणायला सांगावे.
उदा. समजा एक सात वर्षाचा मुलगा दररोज आपल्या मुलाच्या कॉम्प्युटरवर खेळत आहे व मुल काही म्हणत नाही. जर ही बाब आपल्या लक्षात आली तर आपल्या मुलाला त्याला नाही म्हणायला लावावे. आपण स्वतः नाही म्हणुन नये. मुलाला नाही म्हणायला शिकवताना या बद्दल विश्वास द्यावा की तुझ्या मैत्रीवर काहीही परिणाम होणार नाही. अशाप्रकारे लहान वयापासून नाही म्हणायला शिकविल्यास मोठेपणी मित्रांमुळे होणाऱ्या दारू, सिगारेट इ. गोष्टीच्या आग्रहास नाही म्हणणे सोपे जाईल.
ix) मुलासोबत चर्चा करणे आपल्या मुलांसोबत मित्रांमुळे तयार होणाऱ्या दडपणाबद्दल चर्चा करीत रहावे. मित्रांमुळे आपण कोणत्या चुका करू शकतो याबद्दल सविस्तर सांगावे. या गोष्टीपासून दूर राहण्यासाठी वारंवार सल्ला द्यावा.
उदा. लहान वयामध्ये शाळा व क्लासमध्ये अनुपस्थित राहणे, खोटे बोलणे (पालक/ शिक्षकांशी) तसेच मोठ्या वयामध्ये दारू, सिगारेट, ड्रग्स इ. वाईट सवयीबद्दल सविस्तर चर्चा करावी.
Remember- "Give Vaccination to your child like good family relationship, high moral value & faith in god to prevent contagious disease of peer pressure'
 *Article from my book "Bal Sanskar* "
🙏🏻🙏🏻🙏🏻 Please write your comment on your comment box and share with your near & dear.

 *If you wish to receive such articles or videos, send Hi message on WhatsApp number 8888126037* 
Join us on 
*Youtube- Dr Ashish Agrawal* 
*Instagram- drgunjan12* 
*Facebook- Ishwar multispecality* 

👍 Dr Ashish Agrawal, Child specialist & expert in parenting, education & behaviour problems.
👍 Dr Gunjan Agrawal, Dental surgeon.

Comments

Popular posts from this blog

मैंने खूब पढ़ाई की लेकिन रिजल्ट नहीं मिला (छात्रों के लिए उपयोगी)

हसत-खेळत बालविकास; पालकांची भूमिका

Life lesson; Stop comparing yourself with others