अतिजास्त संरक्षण {Overprotective parenting}; बाल संस्कार या पुस्तकातील लेख
अतिजास्त संरक्षण {Overprotective parenting}
------------------------------------------------------------------
मुलाना पालकांकडून संरक्षण आवश्यक असते परंतु हेच सरक्षण जे मयदिपेक्षा जास्त होते तेव्हा त्याचे वाईट परिणाम सुरू होतात. मुलांची स्वःप्रतिमा उंचावण्यास बाधा ठरते.
अ) अति-संरक्षण खालील गोष्टीतुन पाहवयास मिळते.
i) शारीरीक सुरक्षा.
ii) लहान समजुन वागणे.
iii) परिपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करणे.
🔸 शारीरीक सुरक्षा : सौ. निकीता जाधव आपल्या आठ वर्षाच्या अभिषेकला शाळेच्या बसमधुन पाठवत नव्हत्या. विचारल्यावर त्याचे म्हणने होते की आजकाल स्कुलबसचे ड्रायव्हर गाडी खुप वेगात चालवतात व अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या उदाहरणाप्रमाणे असे भरपुर पालक आहेत ज्यांना वाटते की आपल्या मुलांच्या लहान लहान धोक्याला सुध्दा संरक्षण द्यावे. पण मला असे वाटते की मुलांच्या वाढत्या वयानुसार थोडा थोडा धोका पत्करून पुढे वाटचाल करायला हवी. पालकांकडून दिली जाणारी कोणतीही सुरक्षीतता सहजपणे स्पष्ट करता येते, कारण कोणत्याही कृतीमध्ये कोणासोबत तरी विपरीत घडलेल असतंच. त्या उदाहरणाला डोळयासमोर ठेवून आपल्या मुलाचा शारीरीक व बौध्दीक विकास आपण स्वहस्ते थांबवणे चुकीचे आहे. आपण आपल्या मुलांना संरक्षण द्यायला हवे पण विशिष्ट वेळी द्यावे. जसे-रस्ता ओलांडताना काळजी घ्यावी.
🔸 लहान समजुन वागणे: एकदा मी माझ्या बाहयरूग्ण विभागात चार दिवसांमध्ये एकुण ३०० पालकांना एक प्रश्न विचारला होता. तो प्रश्न म्हणजे एक कहाणी होती. प्रश्न: एक मुलगा आठ वर्षाचा विवेक जोशी पोहण्यासाठी अतिशय उत्साही आहे. तो छोटया तलावामध्ये थोडेसे पोहण्यास शिकला होता. त्याने आज आपल्या वडिलांसोबत मोठया तलावामध्ये पोहण्याचा हट्ट केला. तुम्ही जर विवेकचे वडील असता तर काय निर्णय घेतला असता? या कहानीचा निर्णय प्रत्येक पालकांनी अगदी सहजपणे दिला. त्यातील ९०% पालकांनी, 'मुलगा खुप लहान आहे आताच शक्य होणार नाही' अशी प्रतिक्रिया दिली. फक्त १०% पालकांनी 'आपण स्वतः सोबत उभे राहून परवानगी देऊ' असे उत्तर दिले.
वरील पालकांच्या प्रतिक्रिया पाहून असे सहज लक्षात येते की ९०% पालक आपल्या मुलांना लहानच समजतात. एवढेच नव्हे तर पालक स्वतः आपल्या मुलांची सर्व कामे करतात जसे सकाळी शाळेची तयारी, जेवणासाठी मदत, ग्रहपाठ, परिक्षेची तयारी इ.
Remember-'Don't handicap Children by making their life easy
🔸 परिपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करणे: काही पालकांची इच्छा असते की आपले मुल सर्वांच्या पुढे व अव्वल नंबर असावे. प्रत्येक स्पर्धेत व परिक्षेत त्याने प्रथम क्रमांक आणुन दाखवावा. आपली ही इच्छा पूर्ण करण्यासाठी व इतरांना आपल्या मुलाची परिपूर्णता दाखवण्यासाठी पालक मुलांच्या सर्व कर्तव्यांमध्ये हस्तक्षेप करतात किंवा वेळप्रसंगी स्वतः पूर्ण करून देतात. त्याच्या प्रत्येक स्पर्धेसाठी प्रोजक्टसाठी, गृहपाठासाठी तसेच परिक्षेसाठी होईल ती पूर्ण कामे स्वतः करून देतात. ऐवढेच नव्हे तर त्याने काय खेळावे, मित्र कोण असावेत, काय खावे, कोणत्या स्पर्धेत भाग घ्यावा, कोणते कपडे घालावेत यासारख्या सर्व गोष्टीचे निर्णय पालक घेत असतात. अशा प्रकारच्या पालकांच्या वागणुकीमुळे सुरुवातीला मुले यशस्वी होऊ शकतात पण वाढल्यावयानुसार शाळेतील इतर स्पर्धेमध्ये कमी पडतात. पालक त्यावेळी पुर्वीसारखी मदत करण्यास असमर्थ ठरतात तेव्हा मुले एकाकी पडून परावलंबी होतात.
Remember- Real protection means training them to learn to protect themselves in every problems
🔸 अतिसंरक्षणाचे परिणाम :
i) परावलंबी व्यक्तीमत्व : लहानपणी अतिसंरक्षण लाभलेली मुले मोठया वयामध्ये इतरांच्या मदती शिवाय काहीही करू शकत नाहीत. पुढे ही मुले परावलंबी होऊन इतरांच्या मदतीअभावी मागे राहतात.
▪️उदा. याबद्दलचे उदाहरण द्यायचे म्हटले की माझा मित्र राजेश जाजु याची आठवण येते. घरात सत्यनारायण कथा जरी आयोजीत करावयाची असल्यास तो त्याच्या काकांचा व एक-दोन मित्रांचा कसे करावे यासाठी सल्ला घेतो.
ii) नशिबाला दोष देणारे विचार : लहानपणी स्वतः काही केलेले नसल्यामुळे स्वतः धडपड करण्याची किंवा प्रयत्न करण्याची मानसिकता या व्यक्तीमध्ये नसते. अखेरिस अपयश आल्यास इतरांना चुक ठरविणे किंवा नशिबाला दोष देणे अशाप्रकारचे विचार करणारे हे व्यक्तीमत्व तयार होते.
▪️उदा. कोमावार सावकारची आमच्या कॉलनीमध्ये पहिले एकच दुकान होती. त्यावेळी ते फार चालायचे. पण या दिवसात आणखी एका त्यापेक्षा मोठ्या दुकानाची भर तेथे पडली. दुकान मोठे असल्यामुळे सहाजीकच त्याचा परिणाम सावकारला जाणवला परंतु काहीही धडपड किंवा इतर मार्ग शोधण्याशिवाय तो नेहमी आपल्या भाग्यावर विश्वास ठेवायचा. नशीबात असेल तर मिळेल है। त्याचे ठरलेले वाक्य होते.
Remember- Over protective parents raise low confident adults.
🔸 पालकांनी काय करावे ?
i) स्वतःचा आदर्श समोर ठेवावा : आपण स्वतः आपल्याकडे कोणत्या दृष्टीने पाहतो हे अतिशय महत्वाचे आहे. आपला स्वतः बद्दलचा दृष्टीकोण मुलांच्या स्वतःबद्दलच्या दृष्टीवर परिणाम करतो. जर आपल्यामध्ये स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव, कोणत्याही परिस्थितीला समोर जाण्याची हिंमत. नविन आव्हाण स्वीकारण्याची क्षमता, अपयश पचविण्याची क्षमता तसेच धोका पत्करण्याची तयारी अशा प्रकारचे गुणधर्म असतील तर मुलेही त्याचप्रमाणे त्या गुणांना अंगीकृत करतील.
ii) घरकामामध्ये सहभाग द्यावा एकदा घरामध्ये दिड वर्षे वयाची फरहान स्वतःचे ताट घेऊन धुण्याचा प्रयत्न करू लागली. परंतु त्याचवेळी तिची आई रेहाना तिला म्हणाली, "तुम बहोत छोटे हो अभी रख दो, मैं साफ कर दुंगी!” रेहानाचा उद्देश तीला न करू देता स्वतः करण्याचा होता, परंतु लहान मुलांना घरातील कामांमध्ये सहभागी होऊन मदत करावयाला खुप आवडते. त्यांना अशा आवडीच्या कामात सहभागी करून अनुभव द्यावेत व निराशा आणणारे वाक्य बोलू नयेत. अशाप्रकारच्या सहभागामुळे मुलांची मनामध्ये स्व-प्रतिमा उंचावते.
ii) मुलांचा परिचय करून द्यावा : एकदा माझ्या मेडीकल कॉलेज नायर हॉस्पीटल, मुंबईचा एक जुना मित्र नांदेडला आला होता. मुळचा तो
अमृतसर येथील होता, दोघे पतिपत्नी डॉ. गगनसिंप व सी. मनजीत आपल्या मुलासोबत गुरूद्वारा येथील दर्शन झाल्यावर आमच्या परी आले. गगने आपल्या पत्निचा परिचय मनजीत म्हणून केला तर आपल्या जुळ्या मुलांचा परिचय अगदी वेगात म्हणजे फक्त माझा मुलगा एवढेच बोलून इतर विषयांवर चर्चा करू लागला. माझे लक्ष मुलांकडे गेले तेव्हा लक्षात आले की दोघेही मुले लाजाळू होते. याचे कारण असे असू शकते की गगनसिंध नेहमी मुलांना अशाप्रकारेच वागवत होता. मुलांना आपण जर त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली नाही तर ते केव्हाही स्वतःची किंमत स्वतः समजु शकणार नाहीत.
समाजामध्ये प्रत्येकाला असे वाटते की आपली एक ओळख असावी व इतरांनी ती मान्य करावी. तसेच आपल्या मुलाला देखील वाटत असते, त्यामुळे त्याचा नेहमी त्याच्या नावाने परिचय करून द्यावा. असे केल्यामुळे त्याला स्वतःची ओळख असल्याची जाणीव होईल.
iv) मुलांना स्वतःबद्दल बोलू द्यावे आपल्याकडे बऱ्याचवेळा असे पाहण्यात येते की मुलांबद्दल सर्वकाही माहिती पालकच सांगत असतात. काही ठिकाणी तर १८-२० वर्षांच्या मुलामुलींची उत्तरेही पालकच देतात. समजा एका कॉलेज मधल्या १८ वर्षाच्या मुलीला विचारले, काय ? कसा चालु आहे तुझा आभ्यास? तर आई मध्येच बोलते, "very fine यावेळी टॉप आली आहे."
पालक असे का करत असतील कारण मुलांना स्वतःचे प्रतिनिधीत्व करता येणार नाही अशी भावना असते. पालक अशाप्रकारे मध्ये बोलुन मुलांची स्व-प्रतिमा खालावतात. आपण मुलांना इतरांसोबत बोलू द्यावे. काहीवेळा मुले हस्यास्पद जरी बोलत असतील तरी थांबवू नये. असे केल्यामुळे मुलांमध्ये सुधारणा होऊन स्वप्रतीमा उंचावण्यास हळूहळू मदत होईल.
Remember- 'Allow your child to explore the nature both Physically & emotionally without much interference.'
v) मुलांना स्वावलंबी करावे : आपल्या मुलाच्या जन्मानंतर त्याला त्याच्या पूर्ण आयुष्यात स्वतःच्या बळावर म्हणजे स्वावलंबनाने जगावे लागते. मुलांच्या वाढत्या वयानुसार त्यांना स्वावलंबी करणे हे पालकांचे कर्तव्य असते. मुल जसे जसे स्वावलंबी होईल तसे तसे स्वप्रतिमा मनात उंचावुन त्याचे अस्तित्व त्याला जाणवु लागते. त्यामुळे पालकांनी आपल्या
🔸 मुलांना हळूहळू स्वावलंबी करावे.
प्रथम त्यांना स्वतः खाणे, स्नान करणे शिकवावे. मुल थोडे मोठे होऊ लागले की वरिल चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे स्वतः तयार होणे, शाळेची तैयारी करणे, स्वतः मनाने अभ्यास करणे इ. प्रकारची कामे मुलांवर सोपवावी. काही मुले अगदी चपळ व वेगवान असतात तर काही मुलांना हे शिकायला वेळ लागतो. आपल्या मुलांच्या क्षमतेनुसार घाई न करता स्वावलंबी करावे. तसेच जीवनाच्या प्रत्येक वळणावर स्वतः निर्णय घेण्यासाठी सक्षम बनवावे..
Remember- 'Good self esteem begins early & lasts forerver'
पालकांच्या माहितीसाठी मुलांना कोणत्या वयात कोण-कोणत्या वृतीबद्दल स्वावलंबन दयावे याबद्दल विस्तृत माहिती आपल्याच प्रकाशनाच्या 'हसत खेळत बालविकास' या पुस्तकात दिली आहे.
(vi) निर्णय घेण्यासाठी मदत करणे: छोटे छोटे स्वतः बद्दलचे निर्णय मुलांना घेण्यास सुरुवातीला मदत करावी. वाढत्या वयानुसार स्वतः निर्णय घेऊ द्यावेत. चुकीच्या निर्णयास ठामपणे विरोध करावा
▪️उदा. जर एखादया विशेष ठिकाणी किंवा कार्यक्रमामध्ये जाताना मुलांना कोणता ड्रेस घालायचा ते विचारावे. त्याला लक्षात येत नसेल तर तिन ड्रेस दाखवून एक निवडण्यास सांगावे. अशा प्रकारे त्याच्या स्वतःबद्दलचे निर्णय त्याला घेऊ द्यावेत. आवश्यक त्या ठिकाणी मार्गदर्शन करावे. जसे : एकदा घातलेला ड्रेस दुसऱ्यावेळेस परत निवडत असेल तर समजवावे की नेहमी एकच ड्रेस घालण्यापेक्षा बदलून निवड करावी यामुळे एकच ड्रेस खराब होणार नाही. आपल्या मुलांचे व्यक्तीमत्व निर्णय घेण्याच्या सरावाने विकसीत होत असते. त्यामुळे मुलाना शक्य होईल तेव्हा निर्णय घेण्याची संधी द्यावी. काही निर्णय पालकांनीच घ्यावयाचे असतात ते पालकांनीच घ्यावेत. परंतु काही निर्णय जे मुलाच्या व कुटुंबाच्या मुळ जीवनामध्ये फारसा परिणाम करीत नाहीत असे निर्णय मुलांवर सोडावेत. स्वतः निर्णय घेऊन झालेल्या परिणामाच्या आभ्यासातून मुले खुप काही शिकत असतात..
Remember- "The price of greatness is responsibility."
vii) आपल्या मुलांवर विश्वास दाखवावा : काही दिवसांपुर्वी डॉ कर्णिक शाह यांची त्यांच्या पत्निसोबत एका सेमिनारमध्ये मुंबई येथे भेट झाली. मी त्यांना विचारले “तुमचा मुलगा अंदाजे दहा वर्षाचा असेल पण तो कुठे आहे?" त्यांनी सहजपणे उत्तर दिले “त्याला आम्ही घरी सोडले आहे. कॉलनीमध्ये खेळ आणि स्टोरी बुक्स वाच असे सांगुन आलो आहोत" त्यांचे उत्तर ऐकुण मी थक्क झालो. आपल्या मुलाला घरी एकटे सोडून है सहजपणे कसे राहु शकतात ? पण सोबतच वाटत होते त्या मुलाला वाटत असेल की आपले मम्मी पप्पा आपल्यावर किती विश्वास दाखवतात आपले एक स्वतंत्र अस्तित्व आहे, या विचाराने त्याची स्व-प्रतिमा किती उंचावत असेल. मुलांना आपण दाखवलेल्या विश्वासानेच जबाबदारी व प परिपूर्ण व्यक्तीमत्वाचा अनुभव होत असतो. यातुनच त्यांची स्वप्रतीमा उंचावते, जी यशस्वी व्यक्तीमत्वाचे मुळ आहे. इतके किती छान
viii) अपयश स्वीकारून पुढे जायला शिकवणे जीवनातील मुख्य घटक आहे. विविध प्रसंगी म्हणजे खेळ, अभ्यास, चर्चा, : अपयश हा स्पर्धा किंवा मित्र संबंधामध्ये मुलांना अपयशाला समोर जावे लागते. यामुळे मुलांवर दोन्ही प्रकारे परिणाम होतात. काही मुले अपयशामुळे खचुन भित्रे, लाजाळू किंवा कमी आत्मविश्वासाची होतात तर काही मुलांमध्ये यामुळे जिद्द तयार होऊन यशस्वी होण्याची लक्षणे दिसतात. हे दोन्ही परिणाम फक्त सुरुवातीला आलेल्या अपयशाला कशाप्रकारे मुलगा हाताळतो यावर अवलबून असतात. यावेळी त्याठिकाणी पालकांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. पाहण्यात येते की जेव्हा मुलाला मार्क्स कमी पडतात त्यावेळी पालक फक्त रागवतात, इतरांसमोर तुच्छ बोलून अपमानित करतात, दुसऱ्यामुलांसोबत तुलना करतात तर काही महाशय फार मोठा अपराध केल्याप्रमाणे मारतात. अशामुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होऊन स्वतःला काही जमेल याबद्दल साशंक असतात. ही मुले पुढील जीवनातही मागे मागे राहणारी ठरतात. कोणत्याही प्रकारच्या स्पर्धेची त्या मुलांना भीती वाटते.. आपल्या काही पालकांमध्ये आलेल्या अपयशाचे योग्य चिंतन व चर्चा करून कारण शोधण्याची वृत्ती असते. त्याप्रमाणे ते मुलाशी संभाषण करून मार्ग दाखवतात. मुले जेव्हा फार मेहनत करतात तरी अपयश येतं तेव्हां त्यांनी केलेल्या मेहनतीची प्रशंसा करावी. त्यासोबतच अपयशाची कारणे शोधून सुधारणा करण्यसाठी शिकवावे. असे केल्याने मुले वारंवार प्रयत्न करण्यासाठी तयार होतात. त्यांना अपयश पचवणे सोपे होते. महत्वाचे म्हणजे मूल स्वतःला कमी न लेखता आपली प्रतीमा उच्च ठेऊ शकतात.
Remember- Children will learn from their mistake if appropriate guidence is given"
ix) न्युनगंड ओळखुन प्रोत्साहन देणे : मुले जेव्हा सामान्यपणे वागतात तेव्हा त्यांच्यासोबत होणाऱ्या छोटया मोठ्या घटना त्यांच्या मनावर परिणाम करत असतात. त्यांचा आत्मविश्वासही कमी होऊन न्युनगंड निर्माण होऊ शकतो. यावेळी पालकच त्याठिकाणी चांगल्याप्रकारे उपयोगी पडतात.
▪️उदा. काही मुलांमध्ये शक्ती कमी असल्याचा, काही मुलांमध्ये बुध्यांक कमी असल्याचा, काहीना आकर्षकता कमी असण्याचा तर काहींना इतर कोणत्यातरी प्रकारचा न्यूनगंड असतो. पालकांनी आपल्या मुलांमध्ये असलेला न्युनगंड कोणत्या प्रकारचा आहे हे ओळखावे व त्यानुसार त्याला वारंवार सकारात्मक बोलावे. जसे एखाद्या मुलामध्ये व्यासपीठावर बोलण्याचे धाडस कमी असेल तर तुला बोलता छान येतं तू भाषणं आवश्य करावेत. अशी चर्चा नियमीत केल्याने त्याची स्वतःची प्रतिमा उंचावून न्युनगंड दूर होईल.
वरीलप्रकारे प्रयत्न करून सुध्दा मुलांमध्ये न्युनगंड कमी होत नसेल तर मुलांच्या मानसिक विकासासाठी आपल्या शहरातील कौन्सेलिंग सेंटर येथे Child psychologist कडे संपर्क साधुन सल्ला घ्यावा. नांदेड मध्ये एकमेव असे सेंटर आम्ही स्वतः ईश्वर कॉन्सेलींग सेंटर या नावाने चालवतो. या ठिकाणी मी स्वतः वैयक्तीकरित्या आई-वडिलांची मुलाखत घेऊन उपदेशन करीत आहे
Remember- A lot of parents will do anything for their kids except let them be themselves.
🙏🏻🙏🏻🙏🏻 Please write your comment on your comment box and share with your near & dear.
*If you wish to receive such articles or videos, send Hi message on WhatsApp number 8888126037*
Join us on
*Youtube- Dr Ashish Agrawal*
*Instagram- drgunjan12*
*Facebook- Ishwar multispecality*
👍 Dr Ashish Agrawal, Child specialist & expert in parenting, education & behaviour problems.
👍 Dr Gunjan Agrawal, Dental surgeon.
Comments
Post a Comment