मुलांकडून जास्त प्रमाणात अपेक्षा (Over ambitious parents); बाल संस्कार या पुस्तकातील लेख
मुलांकडून जास्त प्रमाणात अपेक्षा (Over ambitious parents )
प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असते की आपला मुलगा सगळ्यात पुढे, सर्व क्षेत्रात हुशार असा असावा. आपल्याकडे तर पालक खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे मुलाचा जन्म होण्याआधीच विचार करतात की माझा मुलगा / मुलगी अभ्यासात पहिला, स्पोर्टस मध्ये अव्वल आणि चित्रकला डान्स या सारख्या कलेमध्येही अग्रेसर असावा.
Remember- Every parents dream "My child should be supermodel".
अशा अपेक्षा ठेवणारे पालक वारंवार मुलांसमोर त्याप्रमाणे बोलून दाखवतात. यश मिळविण्यासाठी दडपण टाकतात परंतु आपल्या मुलाची कुवत किती आहे? याचा विचार थोडासुद्धा करीत नाहीत. अशा पालकांची मुले नेहमी दडपणाखाली वावरतात. यातून भीतीने स्वतःला नेहमी अस्वीकृत समजू लागतात. अशी मुले आई-वडिलांपासून दुरावतात.
Remember- 'We worry about a child's future, but we forget that he is some one today'
(अ) मुलांसमोर नेहमी बोलली जाणारी वाक्ये -
▪️'माझी इच्छा आहे की तुझा पहिला नंबर आलाच पाहिजे'
▪️'माझी इच्छा आहे की यावेळी तुझे जिल्हास्तरीय टीममध्ये सिलेक्शन झालेच पाहिजे'
▪️'कोणत्याही परिस्थितीत माणूस यशस्वी होऊ शकतो, मी एक उदाहरण आहे'.
स्वतः यशस्वी असण्याचा दिखावा केला जातो. स्वतः शाळेमध्ये पहिला असण्याची खोटी माहिती दिली जाते पण नोकरी मिळविण्यासाठी ३०-४० मुलाखतीमध्ये अपयश आल्यानंतर ही नोकरी मिळाली हे लपवले जाते.
ब) अपेक्षा ठेवण्याची कारणे :
i) स्वतःचे अपयश : प्रत्येक मनुष्याचे स्वतःच्या जीवन व करीअर बद्दल एक स्वप्न असते. काही जणांचे हे स्वप्न पूर्ण होते तर काहीजण याबाबतीत अपयशी असतात. हे स्वतः अपयशी असलेले आई-वडिल आपल्या मुलाला त्या ठिकाणी पाहु इच्छितात व नेहमी तसे बोलूनही दाखवतात. या स्वप्नाचे रुपांतर मुलांवरील अपेक्षा व दडपणामध्ये होते.
▪️जसे “माझी आय.ए.एस. ची फार इच्छा होती मी माझ्या मुलाला कलेक्टर नक्की बनवीन"
▪️"मी जरी डॉक्टर असलो तरी माझा मुलगा सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर असेल!"
▪️"मी माझ्या मुलासाठी एवढं करतोय तर तो का क्लासमध्ये पहिला राहणार नाही ?"
अशाप्रकारच्या वारंवारच्या ऐकण्याने मुलांवरील दडपण वाढत जातं आणि मुले स्वतःला अस्वीकृत समजू लागतात.
Remember- Parents who cannot succeed want their children to be successful.
ii) स्पर्धा : सध्याच्या या युगाला स्पर्धेचे युग म्हणुन ओळखले जाते. जो तो इतरांकडे पाहून स्वतःला व आपल्या मुलांना त्या स्पर्धेमध्ये टिकविण्यासाठी धडपडत असतो.
जसे : आपल्या मित्राचा मुलगा स्केटिंग फार चांगले करत असेल तर आपल्याही मुलाने स्केटिंग शिकावे अशी इच्छा असते. आपल्या मुलाला स्केटींग शिवाय पोहणे आवडत असेल व तो चांगला करीतही असेल तरी आपले समाधान होत नाही. स्केटींग शिकावी असा आपला त्याच्यामागे आग्रह असतो.
एकदा माझ्या सेमीनार मध्ये याच विषयावर व्याख्यान दिल्याबद्दल एका साठ वर्षीय वृध्द आजीने माझे अभिनंदन करून आभार मानले व सांगीतले की अशाप्रकारचे वातावरण आमच्या घरामध्ये आहे. तीच्या ३ वर्षाच्या नातवाने गणपती उत्सवाच्या वेळी झालेल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये त्याचे डायलॉग पूर्ण न केल्यामुळे त्याचा नंबर गेला व त्याच्या आईने त्याला खूप मारले. या घटनेला तीन दिवस झाले अजुनही तो मुलगा स्वतःला एकाकी समजत आहे..
अशा प्रकारच्या आपल्या वर्तणुकीमुळे मुले स्वतःला अस्वीकृत समजतात.
Remember- Life is not competition in
(iii) दिखावा करण्यासाठी धडपड
मी माझे नियमीतपणे पेशंट पाहत असतांना असे जाणवते की पालक उगीचच आपले मुल हुशार आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा हा प्रयत्न फक्त माझ्याकडेच नसतो तर इतर सर्व ठिकाणी ते हे करीत असतात.
जसे : त्या चिमुकल्याचे वय एक वर्ष असेल तर 'नाक कुठे आहे. दाखव'
▪️वय दोन वर्ष - 'ट्विंकल ट्विंकल कविता म्हणुन दाखव' वय तीन वर्ष - अंकलला ABCD म्हणून दाखवं,
▪️वय चार वर्ष - 'त्याला ९५% मार्क्स मिळालेत तो यावर्षी ९८% मार्क घेणारआहे' मुलांना ही जाणीव दिली जाते की आपल्या आई वडीलांची आपल्याकडून अशी अपेक्षा आहे व ती पूर्ण न झाल्यास नाराज होतील. अशा वागणुकीमुळे मुले स्वतःला अस्वीकृत समजुन पालकांपासून दुर जातात.
Remember-Showing off on social media is an art of insecurities.
क) परिणाम
1) पालकांकडून अशाप्रकारे अस्वीकृत असलेली मुले होऊन पुर्णपणे निराशावादी जीवन जगतात.
ii) काही मुलांमध्ये यश मिळवले जाते परंतु त्यांचा आत्मविश्वास कमी असतो. फक्त अभ्यासात हुशार असतात तर इतर बाबतीत खूप मागे राहतात.
Remember- Over-ambitious parenting will destroy your child
🔺 उपाय
i) आपण आपल्या मुलांकडून अपेक्षा देवती किंवा त्याप्रकारची मागणी करतो हे चुक नाही तर त्या अपेक्षा मर्यादित असाव्यात. आपल्या मुलाच्या कुवतीनुसार अपेक्षा असावी. काही मुले विज्ञान तर काही मुले कला किंवा खेळ किंवा इतर विषयात रुची असणारे किंवा विशेष प्राविण्य असलेली असतात. जसे आपल्या मुलाला कला क्षेत्रात प्राविण्य मिळविण्याची शक्ती आहे तर आपण त्याला विज्ञानमध्ये ९५% मार्क्स मिळवण्यासाठी दबाव टाकु नये. याचे उदाहरण म्हणजे लता मंगेशकरच्या आई-वडिलांनी जर डॉक्टर होण्यासाठी हट्ट केला असता तर त्यांनी 'भारतरत्न' सारखे यश मिळवले नसते. यामुळे आपल्या मुलांना आपण ओळखणे व त्यानुसार अपेक्षा करणे गरजेचे असते.
ii) जर आपल्या मुलाला परिक्षेमध्ये कमी मार्क्स म्हणजे ६५% मिळाले तर मुलाला दडपण टाकण्यापेक्षा त्यासोबत खालीलप्रकारे व्यवहार करावा.
iii) सर्वप्रथम पहावे की, त्याचा कोणता विषय चांगला आहे जसे त्याचा इंग्रजी विषय चांगला असेल तर भाषा विषयामुळे पुढे पत्रकारिता, लेखन, साहीत्य, प्राध्यापक अशा क्षेत्रामध्ये तो प्रगती करू शकतो, गणित चांगले असेल तर इंजिनियर होऊ शकतो. याचा अर्थ असा नाही की, आपण समाधान मानुन इतर विषयांसाठी प्रयत्न करु नये तर प्रयत्न करावे पण हळूहळू सुधारणा करावी. त्याच्या कमकुवत विषयांसाठी म्हणजे विज्ञान, मराठी व इतर विषयांसाठी अभ्यास घ्यावा. शिक्षकांचे मार्गदर्शन घेऊन विविध पध्दतीने त्याला शिकवत त्याची रुची वाढवावी.
iv) त्याचप्रमाणे मुलाला मार्क्स वाढविण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. त्याला ६५% वरून ९५% मिळविण्याचे प्रोत्साहन देण्याएवजी ६५% वरून ७०% व ७०% वरून ८०% व नंतर त्याचप्रमाणे थोडे थोडे करून मार्क्स वाढविण्यासाठी प्रेरीत करावे.
Remember- Set a realistic goal for your child so that he can achieve it'
मुलांनी आभ्यास कसा करावा? किंवा मुलांची अभ्यासाबद्दल आवड कशी वाढवावी? याबद्दलच्या विस्तृत माहितीसाठी आमच्या ईश्वर । प्रकाशनाच्या 'हसत खेळत बालविकास' या पुस्तकाचे वाचन पालकानी आवश्य करावे.
v) मुलांचे अपयश आपण स्वतः स्वीकारले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला अपयश येणे ही सामान्य बाब आहे. अपयश आल्यानंतर रागावण टाळून त्याला परत प्रयत्न करण्यासाठी प्रोत्साहन देणे हे पालकांचे कर्तव्य आहे. ज्या व्यक्तीला अपयश स्विकारणे शक्य होते त्या व्यक्तीला परत प्रयत्न करण्यासाठी तयार होता येते. अपयश हे कायमचे नसून काही वेळापुरते मर्यादित असते. उदा. क्रिकेटमध्ये आपल्याला माहित आहे कपिल देव या नामांकित क्रिकेटरला खुप मॅचेसमध्ये अपयश आले परंतु अपयश स्विकारून पुढे प्रयत्न करण्याची वारी असल्यामुळे खेळाडूने कप मिळवून दिला होता.
Remember- 'Children need love Especially when they do not deserve it'
vi) आपल्या मुलांना ज्याप्रमाणे अपयश स्विकारता येणे महत्वाचे असते त्याप्रमाणे त्याने केलेल्या मेहनतीला प्रोत्साहन देणे गरजेचे असते. प्रोत्साहन दिल्यामुळे प्रयत्न करण्याची सवय मुलांमध्ये लागते. आपल्याला। फक्त त्याने केलेली मेहनत कशाप्रकारे सकारात्मक आहे व पुढच्यावेळी यश कसे मिळवता येईल हे शांतपणे शिकवायचे असते. असे केल्याने आपल्या आई-वडिलांचे आपल्याला पुर्ण सहकार्य आहे अशी भावना तयार होते. मुले स्वतःला स्वीकृत समजू लागतात. यातून
Remember- Accept children's failure and teach them to learn new approch
🙏🏻🙏🏻🙏🏻 Please write your comment on your comment box and share with your near & dear.
*If you wish to receive such articles or videos, send Hi message on WhatsApp number 8888126037*
Join us on
*Youtube- Dr Ashish Agrawal*
*Instagram- drgunjan12*
*Facebook- Ishwar multispecality*
👍 Dr Ashish Agrawal, Child specialist & expert in parenting, education & behaviour problems.
👍 Dr Gunjan Agrawal, Dental surgeon.
Comments
Post a Comment