अनुकरण (Lead by Example); बाल संस्कार या पुस्तकातील लेख

अनुकरण (Lead by Example)
-------------------------------------------

अनुकरण या शब्दाचा अर्थ आहे इतरांचे पाहून त्याप्रमाणे करणे. जगातील कोणतीही व्यक्ती इतरांचे पाहून अनुकरण करीत असते. अनुकरण करतांना आपल्या बुद्धीप्रमाणे व सोयीनुसार त्यामध्ये बदल घडवत असते. मुल जन्माला येते तेव्हा ते सर्वगोष्टी पासून अनभिज्ञ असते. प्रत्येक कला ते मुल या जगाकडे पाहून शिकत असते. मुलाला अनुकरणासाठी स्वतःचे आई-वडील हे पहिले आदर्श असतात. मुले आईवडीलांकडे पाहून शारीरिक, बौद्धीक, भावनिक व सामाजिक विकास करुन घेतात.
प्रत्येक व्यक्ती आयुष्यभर कोणाचे तरी अनुकरण करत असते. लहान मुल वय वर्षे आठ पर्यंत पूर्णपणे आई-वडिलांचे अनुकरण करते. आठ ते चौदा वर्षापर्यंत आई-वडील व मित्र या दोघांचे अनुकरण करते. वय वर्षे चौदानंतर मुले हळूहळू आई-वडिलांपासून दूर जातात व मित्रांचे अनुकरण करतात. या ठिकाणी जीवनामध्ये मुख्य अनुकरण पालक व मित्र याबद्दल विस्तृत माहिती दिली आहे.
Remember- The best parents teach their children by following the same guidelines.
१) पालकांचे अनुकरण :
एकदा एक सात वर्ष वयाचा मुलगा सचिन आपले मित्र दिनेश व मुकूंद यांच्यासोबत खेळत होता. क्रिकेट हा खेळ खेळतांना सर्वकाही व्यवस्थीत सुरू होते. सचिनला बॅटींग मिळाली व त्याने तीन-चार बॉल चांगली बॅटींग केली. पाचव्या बॉलवर अचानक तो क्लिन बोल्ड झाला. आपली विकेट लवकर गेली त्यामुळे तो रागातही आला. एवढेच नव्हे तर चिडलेल्या अवस्थेत तो दिनेश व मुकुंद सोबत भांडूही लागला. दादागीरी करून बॅटींग सोडायला तयारही नव्हता.
वरील प्रकरणातील सचिनची माहीती घेतल्यावर असे माहित झाले की सचिन सर्व बाबतीत नेहमी असेच वागतो. भांडणे, दादागीरी करणे, आपलेच म्हणणे खरे करणे असा त्याचा स्वभावच होता. त्याच्या घरातील वातावरणाचा पूर्ण आभ्यास केल्यास असे निदर्शणात आले की त्याची आई याप्रकारे घरामध्ये वर्तणुक करीत होती. इतरांवर स्वतःची सत्ता गाजविणे हा तिच्या स्वभावातील मुळ गुणधर्म सचिन ने आपल्या अनुकरणात घेतला होता. सचिनची आई ही एक उच्च विद्याविभुषीत प्राध्यापीका होती.
Remember- 'Your children will become what you are so be what you want them to be'
वरील प्रसंगावरून आपल्याला लक्षात आलेच असेल.
i) बहुताशी पालक हे समजण्यास असमर्थ असतात की आपल्या मुलांच्या संगोपणाच्यावेळी आपल्या वर्तणुकीचा त्यावर परिणाम होतो...
ii) मुलांमध्ये ही नैसर्गीक प्रवृती असते की आपल्या आई-वडिलांना आदर्श समजून त्यांच्या वर्तणुकीतील प्रत्येक गोष्टीला जसेच्या तसे आत्मसात करणे व आवश्यकतेनुसार जीवनामध्ये आमलात आणने.
iii) सर्व जगामध्ये एकच सिध्दांत मानला जातो की आई-वडीलच मुलांचे प्रथम व सर्वात महत्वाचे शिक्षक असतात.
Remember- Children are great imitators
🔺 पालकांची वर्तणूक व त्याचे परिणाम :
i) काही वेळा पालक स्वतः एका पध्दतीने वागतात व मुलांना वेगळा काहीतरी उपदेश देतात. एकाच गोष्टीसाठी उपदेश व स्वतःची वर्तणुक भिन्न असेल तर मुलांचा गोंधळ उडतो. चुक काय व बरोबर काय ? यामध्ये ते गोंधळून जातात. चांगली सवय तर लागत नाही परंतु पालकाच्या अनुकरणातून वाईट सवय अंगीकृत करतात. त्यासाठी आपण जे काही उपदेश करतो ते स्वतः पालन करावेत.
▪️उदा. आम्ही आमच्या लहान मुलाला नेहमी उपदेश देतो की सकाळी दात घासताना बेसीन जवळ उभे राहून दात घासावे. पण काहीवेळा घाईत असताना मी पेपरच्या हेडलाईन्स वाचत-वाचत किंवा घरामध्ये काही किरकोळ काम करत दात घासत असतो. एका दिवशी मला माझ्यामुलाने प्रश्न विचारला "पप्पा तुम्ही का बेसीनजवळ उभे राहून दात घासत नाही ?"
ii) काही पालकांमध्ये मुलांच्या समोर वेगळे वर्तन व मुले नसताना वेगळे वर्तन करण्याची सवय असते. आपल्याला वाटतं की मुलांना समजत नाही मुले फार चतुर असतात. त्यांना न समजता केलेल्या गोष्टीही ते चांगल्याप्रकारे समजु शकतात. असे केल्याने परत वरील मुद्याप्रमाणे चांगले काय व वाईट काय हे मुले समजु शकत नाहीत. त्यामुळे मुलाच्या समोर व मुलांच्या मागे आपली कृती एकसारखी असावी.
▪️उदा. काही पालकांमध्ये मुलांना टि. व्ही. पाहण्यास विरोध करण्यासाठी त्यांना अभ्यासाच्या खोलीत पाठवून किंवा झोपल्यानंतर टि.व्ही. पाहण्याची सवय असते. आपल्याला टि.व्ही. पाहणे चांगले नाही व स्वतः टि. व्ही. पाहणे चांगले कसे? असा विचार मुलांना येतो. यातुन आपण केलेल्या विरोधाचे महत्व कमी होते व मुले हट्टीपणा करू शकतात. त्यासाठी एकतर टि.व्ही. पूर्णपणे बंद करावा किंवा मुलांसोबत योग्य वेळापत्रकानुसार व मर्यादित वेळेमध्ये पहावा.
Remember- 'Dont worry that children never listen to you. worry that they are watching you'
(iii) काही वेळा एकाच प्रकारच्या चुकीसाठी वेगवेगळया प्रतिक्रिया पालक देत असतात. एकाच गोष्टीसाठी वेगवेगळे नियम व आपली प्रतिक्रिया पाहून मुलांना योग्य व अयोग्य याचे ज्ञान होत नाही.
▪️उदा. समजा एक काचेचा ग्लास बाबांचा पाय लागून फुटला तर बाबा, आईला, "मध्ये का ठेवला, उचलून ठेवता येत नाही का?" असे म्हणुन ओरडतात. तोच ग्लास जर आईच्या पायाने फूटला तर, "पाहून चालता येत नाही का?" म्हणुन आईवरच ओरडतात. समजा मुलाच्या पायाने फुटला तर एक चापट मारून ओरडतात व शेजाऱ्याच्या मुलाने जर का तो फोडला तर “असु दे बाळ, घाबरू नको" म्हणुन आईला उचलायला लावतात. याप्रकारे एकाच चुकीसाठी वेगवेगळया प्रतिक्रिया पाहून मुलांना चुक कोणाची व काय करायला हवे हे समजणे कठीण होते. त्यासाठी कोणत्याही गोष्टीसाठी एकच नियम व एकच प्रतिक्रिया द्यावी. ज्यामुळे मुलांना योग्य व अयोग्य काय हे लक्षात येईल.
iv) एकाच घरामध्ये आई व वडील दोन्ही वेगवेगळया विचारप्रणालीचे असल्यास मुलांचा त्याप्रमाणे गोंधळ उडून योग्य मार्ग निवडणे कठीण होते.
त्यामुळे आई व वडील या दोघांनी विचार करून एकाच विचार प्रणालीचे जीवन जगावे म्हणजे मुलांनाही योग्य मार्ग शिकायला मिळेल.
▪️उदा. समजा वडील हे काम, मेहनत, वेळ, पैसा अशा गोष्टींना देणारे व आई नशीबावर विश्वास ठेवणारी असेल तर अशावेळी मुल जेव्हा दोघांच्या गोष्टी वारंवार ऐकेल त्यावेळी योग्य जीवनप्रणाली कोणती हे तो अखेरपर्यंत समजु शकणार नाही. त्यासाठी दोघांनी विचार करून मुलासमोर एकच सिध्दांत ठेवावा. महत्व
Remember- 'Children are never good listener but they never fail to copy"
ब) आपण काय करावे सर्व प्रथम स्वतःची जीवन शैली, राहणीमान व दिनचर्या योग्यपणे नियोजीत करावी. आपल्याला ज्या चांगल्या गोष्टी मुलामध्ये रूजवायच्या आहेत त्या गोष्टीची एक यादी तयार करावी. त्याप्रकार आपण स्वतः नियमीतपणे पालन करावे. मुले आपोआप आपले पाहून त्याप्रमाणे करायला शिकतील.
▪️उदा. समजा आपल्याला मुलानी लवकर किंवा एक निश्चित वेळेला झोपावे असे वाटत असेल तर स्वतः घरामध्ये आपण निश्चित वेळेला झोपायला हवे. त्याप्रमाणे नियोजन करून पालन करावे. आपले पाहून मुलेही तसे करण्यास शिकतील. समजा फक्त आदेश देऊन आपण टिव्ही पाहत बसलो तर ते ऐकणार नाहीत.
Remember- The best parents are those who follow all guidelines set by themselves 
🔸आदर्श ठेवताना पाळावयाचे नियम 
■ खोटे बोलू नये.
■ इतरांचे दोष काढणे, चेष्ठा करणे, व्देष करणे इ. करू नये. ओरडणे, रागावणे, शिव्या देणे इ. करू नये.
■ पैशाला महत्व द्यावे. अतिरीक्त दिखावा करू नये.
■ गुटखा, तंबाखू, सिगारेट, मद्य यांचे सेवन करू नये.
■ दररोज देवाची प्रार्थना, पुजा करावी. (आपल्या धर्मानूसार जे योग्य आहे ते)
■ स्वतःच्या कामाबद्दल शिस्त व सातत्य असावे.
■ विविध पुस्तकांचे वाचन नेहमी करावे.
Remember- Children Learn lot from observing their parents

🙏🏻🙏🏻🙏🏻 Please write your comment on your comment box and share with your near & dear.

 *If you wish to receive such articles or videos, send Hi message on WhatsApp number 8888126037* 
Join us on 
*Youtube- Dr Ashish Agrawal* 
*Instagram- drgunjan12* 
*Facebook- Ishwar multispecality* 

👍 Dr Ashish Agrawal, Child specialist & expert in parenting, education & behaviour problems.
👍 Dr Gunjan Agrawal, Dental surgeon.

Comments

Popular posts from this blog

मैंने खूब पढ़ाई की लेकिन रिजल्ट नहीं मिला (छात्रों के लिए उपयोगी)

हसत-खेळत बालविकास; पालकांची भूमिका

Life lesson; Stop comparing yourself with others