*पालकांकडून मिळणारा अपुरा वेळ* (Lack of Time): बाल संस्कार या पुस्तकातील लेख

*पालकांकडून मिळणारा अपुरा वेळ* (Lack of Time):

मुलांना असुरक्षितता वाटण्याचे आणखी एक कारण आहे ते म्हणजे आई-वडिलांकडून योग्य प्रकारे वेळ न मिळणे. मुलांना वेळ न दिल्याने त्यांना त्यांच्यामनात असलेल्या विविध भावना, प्रश्न तसेच त्यांच्या आवडी निवडी प्रकट करता येत नाहीत. त्यांना विविध गोष्टींची माहिती सुद्धा मिळत नाही. या सर्वांचा परिणाम म्हणजे मुले स्वतःला एकटे समजून इतरांपेक्षा असुरक्षित समजतात.
Remember- If you give time; you will be the child's favorite toy.
एका छोट्याशा गोष्टीवरुन हे स्पष्ट करण्याचा मी प्रयत्न केला आहे. एका श्रीमंत कुटुंबामध्ये आई-वडील व त्यांचा एक लहान मुलगा असतो. कुटुंब श्रीमंत आहे म्हणजेच व्यवसायही मोठा व त्यानुसार वडील नेहमी व्यस्त असत. मुलाची व बाबांची भेट कधी कधी तेही गडबडीत किंवा व्यस्त असतानाच होत होती. “आपले बाबा नेहमी उशिरा येतात व आपल्याला केव्हाही भेटत नाहीत त्यासाठी आपण काय करावे?" असा विचार मुलाला नेहमी येत होता. त्यानुसार बाबाला धावत्या भेटेत विनवणी केली की "बाबा मला तुमच्या सोबत गप्पा माराव्या व खेळावसं वाटतं पण तुम्ही मला भेटतच नाहीत!" असे ऐकल्यावर बाबा म्हणाले, “बेटा आपला फार मोठा व्यवसाय आहे, मला सतत काम करावं लागतं, मी रात्री येतो तेव्हा तू झोपलेला असतोस, ओ.के..... नंतर खेळूया हं.....! सॉरी बेटा, ओ.के. बाय" असे म्हणून बाबा निघून जातात. मुलगा दुःखी अंतःकरणाने विचार करून या विचारावर येतो की काहीही करायचे पण आज रात्री बाबा सोबत खेळायचे. तो दररोज रात्री बाबांची वाट पहायचा पण काळी वेळात त्याला झोप लागायची. बाबांची व त्याची भेट अखेरीस चार पाच दिवसाच्या प्रयत्नानंतर झाली.
त्यावेळी मुलगा काहीच बोलत नव्हता म्हणून बाबा म्हणाले, 'काय रे काय झाले झोपला नाहीस?'
मुलगा उत्तरला "नाही बाबा आज तुम्हाला भेटावे असे ठरवलेच होते".
बाबा, “हां. बोल काय म्हणतोस?"
मुलगा म्हणाला, "बाबा तुम्ही दर महिना किती रूपये कमावता..?" बाबा, "बेटा, ते निश्चित सांगता येणार नाही पण एक ते दीड लाख रूपये प्रति महिना....!"
मुलगा, "म्हणजे बाबा अंदाजे तीन हजार रूपये दररोज... ?” असे बोलत बोलत त्या मुलाने स्वतःचा पैसे भरलेला गल्ला बाबांच्या हातात दिला व बोलू लागला.....
"बाबा हे पैसे घ्या एवढे मोजून जेवढा वेळ होईल किंवा देता येईल तेवढा वेळ द्या. प्लीज माझ्या सोबत खेळा ना...!” आणि तो मुलगा रडू लागला...
Remember- Spending time with children is more important than spending money.
वरील गोष्ट वाचल्यावर असे लक्षात येईल की पालकांनी आपल्याला वेळ द्यावा ही इच्छा मुलांच्या मनात किती तीव्र असते. त्यामुळे काय परिणाम होतात हे ही आपण समजू शकतो.

आई-वडिलांची मते : मुलांच्या मानसीक समस्ये बद्दल पालकांची मुलाखत घेताना काही गोष्टी आमच्या निदर्शणात येतात. वेळ न देणे या प्रकारचे कारण जर आम्ही त्यांच्या मुलांच्या समस्येचे कारण आहे असे सांगीतले तर ते खालील प्रकारे प्रतिक्रिया देतात....
"आम्ही मुलांना हवे ते देतो जसे विविध प्रकारची पुस्तके, चांगली शाळा, चांगले क्लासेस, भारीचे कपडे इ. कोणत्याही गोष्टीची कमी पडू देत नाहीत. तरी अजुन यांना काय हवे असते?" असे विचारतात.
काही पालक तर स्वतः आदर्श पालक आहेत हे भासविण्यासाठी स्वतःच्या आई-वडिलांनी काहीही न करता फार यशस्वी आहोत असे म्हणतात. त्यासोबतच “आम्ही तर आमच्या मुलांसाठी किती करतो!” असे उद्गारतात.
वरिल पालकांना असे सांगावे वाटते की आपण दिलेल्या वेळेचे महत्व हे इतर सर्व गोष्टींपेक्षा खुप महत्वाचे आहे. आमच्या आई वडिलांनी काहीही केले नाही असे म्हणणाऱ्या पालकांना हे माहित नसते की आई वडीलांच्या योग्य संगोपण व संस्काराशिवाय जगामध्ये कोणीही यशस्वी होऊ शकत नाही. या पुर्वीच्या काळामध्ये एकत्रीत कुटूंब व्यवस्था असायची ज्यामुळे मुलांना आई-वडिलांनी वेळ दिला नाही तरी इतर व्यक्तीकडून भरपूर वेळ दिला जात असे. परंतु या काळामध्ये विभक्त कुटूंब पध्दती अस्तीत्वात आली असल्यामुळे आई-वडिलांना योग्य प्रकारे वेळ देणे अत्यावश्यक झाले आहे.
आई वडिलांच्या व इतर कुंटूबीयांच्या सहवासाने किंवा त्यांच्या चांगल्यागुणांच्या अनुकरणामुळेच प्रत्येक व्यक्ती सुसंस्कारीत होऊन यशस्वी जीवनाची वाटचाल करू शकतो. या काळामध्ये कुटूंब छोटी झाली आहेत त्यामुळे आजी, आजोबा, काका, काकू, इ. व्यक्तीचे संस्कार मुलांना लाभत नाहीत. तसेच सर्वजण आपल्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे मुलांना योग्य संस्कार घालण्याची जबाबदारी प्रत्यक्षपणे आई-वडिलांवरच आली आहे. आपल्या सहवासातुन, चर्चेतुन व अनुकरणातुनच मुलांना जीवन जगण्याची योग्य पध्दत शिकायला मिळते.
Remember- 'Kids love the word, Parent's quality time'
🔴 उत्कृष्ट दर्जेचा वेळ देणे (Quality Time) :
i) मुलांना वेळ देणे म्हणजे आपल्या व्यवहारीक जीवनामधील (जसे नोकरी इ.) वेळ कमी करणे नव्हे. आपली सर्व महत्वाची कामे पूर्ण व्यवसाय, करून मुलांना वेळ देणे होय.
ii) मुलांना खुप जास्त नाही फक्त एक ते दोन तास आपल्या दिवसभरातून देणे आवश्यक असते.
iii) आपल्याला एवढा वेळ शक्य नसेल तर तो वेळ आपण आपल्या कमी महत्वाच्या कामांमधून तयार करू शकतो जसे टि. व्ही. पाहणे, गप्पा करणे, मित्र परिवारातील वेळ, क्लब, भीसीपार्टी, पेपर वाचणे इ.
iv) मुलांना आपण जेव्हा वेळ देत असतो त्यावेळी आपले लक्ष टिव्ही, इतरांसोबतच्या गप्पा किंवा पत्नीशी सुध्दा चर्चा न करता पूर्णपणे मुलांमध्ये रममाण होऊन वेळ दयावा. या प्रकारच्या वेळ देण्यालाच उत्कृष्ट दर्जाचा वेळ (Quality time) असे म्हणतात.
v) वरिल चित्रात दाखविल्याप्रमाणे मुलांना वेळ देताना मुलांसोबत भरपुर खेळावे, आभ्यासाबद्दल, शाळेबद्दल, मित्रांबद्दल वारंवार चर्चा करावी. मुलांसोबत बाहेर कुठेतरी (जसे गार्डन) जावे.
vi) मुलांसोबत अशाप्रकारे पूर्ण वेळ देताना आपले विचार समजून सांगावेत त्यांना योग्य व चांगल्या विचारांसाठी प्रोत्साहन द्यावे व प्रश्न उत्तर स्वरूपातील चर्चा करून नेहमी मार्गदर्शन करत रहावे.
मुलांना देलेला उत्तम दर्जाचा वेळ आयुर्विम्याप्रमाणे 'जिदंगी के साथ भी जिंदगी के बाद भी' प्रमाणे काम करतो.
Remember- Children will not remember you for the material things you provided but for the feeling that you cherished with them.

Article from Bal Sanskar by Dr Ashish Agrawal 

🙏🏻🙏🏻🙏🏻 Please write your comment on your comment box and share with your near & dear.

 *If you wish to receive such articles or videos, send Hi message on WhatsApp number 8888126037* 
Join us on 
*Youtube- Dr Ashish Agrawal* 
*Instagram- drgunjan12* 
*Facebook- Ishwar multispecality* 

👍 Dr Ashish Agrawal, Child specialist & expert in parenting, education & behaviour problems.
👍 Dr Gunjan Agrawal, Dental surgeon.

Comments

Popular posts from this blog

मैंने खूब पढ़ाई की लेकिन रिजल्ट नहीं मिला (छात्रों के लिए उपयोगी)

हसत-खेळत बालविकास; पालकांची भूमिका

Life lesson; Stop comparing yourself with others