पैशांचे महत्व (Importance of Money); बाल संस्कार या पुस्तकातील लेख

पैशांचे महत्व (Importance of Money)
----------------------------------------------------------

या घटकाचे नाव वाचताच आपल्या मनात विचार येतो की सर्वांनाच याचे महत्व असते. हे महत्व ज्या व्यक्तीला नसते त्या व्यक्तीची व्यवहारीक निर्णयक्षमता, पैशांची सांगड घालून जीवन जगण्याची शैली आपोआपच कमी होते. या व्यक्तीचे बनलेले पैशांबाबतचे सर्व अंदाज व हिशोब चुक ठरत असतात. तर उलट पक्षी ज्या व्यक्तीला पैशांचे महत्व आहे, अशा व्यक्ती आपले व्यवहारीक पाऊल पूर्ण विचार करुन व आपल्या मागील/पुढील बजेटचा योग्य अंदाज लावूनच टाकतात. हे असे अर्थतज्ञ आपल्या मुलाला पहायचे असेल तर त्याला लहान वयापासूनच रुपये-पैशांचे महत्व शिकवावे. असे महत्व शिकविण्यासाठी आपल्या मुलाचे वय ४ वर्षे पूर्ण असावे. योग्यवेळी व ठिकाणी दिलेला उपदेश मुलांना जास्त चांगल्याप्रकारे लक्षात राहील. 
Remember- Money move from those who do not manage to those who do.
यासाठी खालील प्रकारचे उपक्रम मुलांसोबत करत रहावेत.
अ) पैशांची उणीव दाखवणे :
आपण जेव्हा मुलांसोबत बाहेर फिरायला जातो किंवा काही खो करण्यासाठी एखाद्या दुकानात जातो त्यावेळी प्रत्येक खरेदी केलेल्या वस्तुची किंमत मुलांना सांगावी. त्यांच्या समोर पैसे द्यावेत असे केल्याने मुलांना आपल्याला काही पाहिजे तर पैसे द्यावे लागतात असे समजते. खरेदी करतांना एखादी वस्तु महाग असेल तर आपल्याकडे पैसे नाहीत किंवा पुढच्या महिन्यात घेऊ वा असे सांगून विकत न घेता घरी परत आणावे. म्हणजे पैसे नसल्यावेळची जाणीव होऊन त्याबद्दलचे महत्व मुलांना कळते.
ब ) पैसे मिळण्याबद्दल स्पष्टीकरण :
खरेदी करत असतांना मुले बऱ्याचदा पैसे का द्यायचे असे प्रश्न विचारतान त्यावेळी मुलांना त्याबद्दल माहिती द्यावी.
▪️उदा. : समजा आपण भाजी विकत घेत आहोत आणि मुलांने विचारले पैसे का द्यायचे ? त्यावेळी त्याला स्पष्ट करावे की आपल्याला दिलेली भाजी तयार करण्यासाठी त्याला बियाणे, लागवड आणि वेळ द्यावा लागतो. हे तयार करतांना त्याला काही पैसे खर्चही करावे लागतात. त्यासोबतच केलेल्या मेहनतीचाही मोबदला त्याला मिळायला हवा. या सर्व प्रक्रियेला त्याला काही पैसे उरतात त्यातून त्याचे व त्यांच्या कुटुंबाचे खर्च भागवले जातात. पैसे कमावण्यासाठी खुप मेहनत करावी लागते. म्हणून पैशांची अनावश्यक उपक करु नये.
क) पालकांचे अनुकरण :
मुलांसमोर पैशांची उधळपटी करु नये आणि प्रत्येक गोष्टीचा विचार करुनच खर्च करावा. मुले याचे निरीक्षण करीत असतात व त्याप्रमाणे स्वतः वागत असतात.
ड) बजेटप्रमाणे वाटाघाटी शिकवणे
वरील सांगितलेल्या मुद्यानुसार आपण स्वतः वागणे जेवढे आवश्यक आहे. तेवढेच मुलांसोबत चर्चा करणे व थोडी जवाबदारी टाकणे आवश्यक प्रत्येक मोठ्या बजेटची आहे. चर्चा मुलांसोबत करावी. 
▪️उदा. समजा आपल्याला एकत्रितपणे बाहेर एका ट्रिपसाठी जायचे. आहे. त्यावेळी मुलाला स्पष्ट करावे की आपल्याकडे फक्त रु.१०,०००/- आहेत त्यातील रु.३,०००/- तिकीट व तेथे राहण्याचा खर्च आहे. उरलेल्या रु. ७,०००/- रुपयामध्ये आपल्याला खाणे, पिणे इ. करावयाचे आहे. मम्मीच्या खरेदीसाठी रु.१,०००/- व तुझ्या खरेदीसाठी रु.५००/- पर्यंतचे ठरवले आहे.. अनावश्यक खर्च व महाग वस्तुंसाठी तु हट्ट करु नये असा उपदेश द्यावा. यातून मुलांना खर्च वाटावाटी करुन व बजेटप्रमाणे करायचा असतो हे शिकायला मिळते. तसेच दिवाळी, वाढदिवस, ईद, आंबेडकर जयंती या सारख्या प्रसंगी मुलांना वरीलप्रमाणे मार्गदर्शन करावे.
Remember- Budget is telling your money where to go instead of wondering where it went.
इ) वेळेनुसार पैशांचे महत्व शिकवणे :
मुलांना स्वतः असे शिकवावे की कोणत्या वेळी कोणता खर्च करावा व करु नये. वेळ व आपले बजेट याचा पूर्ण विचार करुन आपले निर्णय घ्यावेत हे विचार रुजविण्यासाठी खालील प्रकारच्या उदाहरणांचा उपयोग आपल्याला करता येतो जसे :
i) समजा एप्रिल मे महिन्यामध्ये फळांच्या दुकानात फळे निवडताना मुल सफरचंद घेण्याची इच्छा दाखवत असेल तर त्याला समजुन सांगावे की या दिवसात सफरचंद रु.१५०/- किलो असतात. या दिवसामध्ये आंबे व टरबुज योग्य दरात मिळतात. सफरचंद ज्यावेळी स्वस्त असतात त्यावेळी ती घ्यायला हवी. यामुळे आपण पैशांची बचत करु शकतो आणि वेगवेगळ्या दिवसामध्ये वेगवेगळ्या फळांचा आस्वाद आपल्याला मिळतो.
ii) आपण एकत्रितपणे बाहेरगावी जाताना नेहमी जर एसी गाडीतून प्रवास करण्याची सवय असेल तर काही वेळा साध्या सेकंडक्लासची तिकीटे घ्यावी. मुलांना तसे स्पष्टीकरण करावे आपल्याकडे कमी पैसे आहेत एसी चे तिकीट महाग असते. नेहमी कारने जात असाल तर काही वेळा मोटार सायकलने जावे. कारने पेट्रोलचा खर्च वाढतो म्हणून गाडीवर जात आहोत अशाप्रकारचे स्पष्टीकरण दिल्यास मुलांना आपल्या बजेटचा विचार करुन आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची सवय लागते.
Remember- Being smart 
ई) बचत करण्याचे महत्व
पैशांची बचत कशी करावी याचे महत्व मुलांना या वयापासूनच द्यावे. यासाठी मुलांना एक पैशांचा गल्ला घेऊन द्यावा. या मध्ये पैसे जमा करुन जेव्हा खुप पैसे जमा होतील तेव्हा तुला एखादी मोठी वस्तु घेऊया असे सांगुन बचतीची प्रेरणा द्यावी.
यासाठी मुलांना नेहमी त्याप्रकारे मार्गदर्शन करावे जसे-तुला खर्च करण्यासाठी जर १०/- रु. दिले तर त्यातील ३/- रु. वाचवल्यास गल्यात पैसे जमा होतील. कोणी मोठ्या व्यक्तीने दिलेले पैसे गल्यामध्ये जमा केल्यास मोठी रक्कम जमा होईल. जमा झालेल्या रक्कमेतून तुला एखादी वस्तु घेऊया असे सांगून त्याप्रमाणे त्याला घेऊन द्यावी. यातून मुलांना बचत केल्याने काय फायदा होतो याचे महत्व कळते.
उ) मेहनत केल्याने पैसे मिळतात :
मेहनत केल्यावर पैसे मिळतात ही संकल्पना मुलांच्या मनामध्ये रुजवावी. पैसे मिळविण्यासाठी मुलांना स्वतः मेहनत करु द्यावी असे केल्याने मुलांना पैशांचे महत्व समजते. पैसे कमविणे किती अवघड असते हे मुलांना वारंवार स्पष्ट करावे व काही उदाहरणातून दाखवावे.
▪️जसे : समजा रविवारचा दिवस असून कार धुवायची आहे. त्यावेळी मुलाला धुण्यास सांगावे व कार धुतल्यास ५०/- रु. देईन असे सांगावे. त्याप्रमाणे त्याला द्यावे सुद्धा असे केल्याने मुलांना पैशांचे महत्व समजते.
Remember- Financial education is the foundation of success.

🙏🏻🙏🏻🙏🏻 Please write your comment on your comment box and share with your near & dear.

 *If you wish to receive such articles or videos, send Hi message on WhatsApp number 8888126037* 
Join us on 
*Youtube- Dr Ashish Agrawal* 
*Instagram- drgunjan12* 
*Facebook- Ishwar multispecality* 

👍 Dr Ashish Agrawal, Child specialist & expert in parenting, education & behaviour problems.
👍 Dr Gunjan Agrawal, Dental surgeon.

Comments

Popular posts from this blog

मैंने खूब पढ़ाई की लेकिन रिजल्ट नहीं मिला (छात्रों के लिए उपयोगी)

हसत-खेळत बालविकास; पालकांची भूमिका

Life lesson; Stop comparing yourself with others