स्वतःबद्दल उच्च प्रतिमा (High Self Esteem); बाल संस्कार या पुस्तकातील लेख

स्वतःबद्दल उच्च प्रतिमा (High Self Esteem)

एकदा एका कुटूंबामध्ये चर्चा सुरू होती. त्याकुटूंबातील सर्व सदस्यांसोबत एक चार वर्षांचा मुलगा अष्पाकही बसला होता. त्याबैठकीमध्ये त्यांच्या घरी नियोजीत असलेल्या लग्न- समारंभाविषयी चर्चा सुरू होती. चर्चेमध्ये कोणी कोणती जिम्मेदारी पार पाडायची हे ठरत होते. सर्वांनी आप-आपली कामे वाटून घेतल्यावर चर्चा संपली. त्याचवेळी अष्पाक ओरडून म्हणाला 'अब्बु मै भी हूँ ना ! मुझे कोई काम करने का मौका दो!'
वरील वाक्य ऐकून सर्वच्या सर्व आश्चर्यचकीत झाले. म्हणजेच त्या चार वर्षाच्या मुलाला सुध्दा अस्तित्व असते.
Remember- 'High Self Esteem is important to life as food is for live'
'कोणतीही व्यक्ती स्वतःला लायक आहे किंवा स्वतःचे अस्तित्व आहे असे समजते जेव्हा त्याची स्वतःच्या मनामध्ये स्वतःबद्दल उच्च प्रतिमा असते. '
स्वतःबद्दलची प्रतिमा ही आपण स्वतःबद्दल काय समजतो यावर अवलंबून असते. स्वतःबद्दलचा विश्वास, स्वतःबद्दलचा आदर, स्वातंत्र्य आणि स्वतःबद्दलची पूर्ण ओळख ही ज्याप्रमाणे असते त्याप्रमाणे आपली प्रतीमा आपल्या मनात तयार होते.
बहुतांशी पालकांना सुधा चंद्रा ह्या भरतनाट्य कलाकाराबद्दल माहितच असेल. “नाचे मयुरी" या हिंदी चित्रपटातील कहानी तिच्या जीवनावर आधारीत आहे. एक भरतनाट्य विषारद सुंदर मुलगी स्वतःच्या कलेमध्ये सुप्रसिध्द होती. एकादिवशी कार अपघातात तिला तिचा एक पाय गमवावा लागला. एक नर्तीका कितीही विषारद असली तरी पायाशिवाय नृत्य कसे करणार? पण सुधाची स्वप्रतिमा उच्च होती व मी करू शकते असा विश्वास तिच्या मनात होता. खुप प्रयत्न केल्यानंतर कृत्रिम बनावटीचा पाय (जयपूर फूट) तिला डॉक्टरांनी बसवून दिला. आपल्या मनातील विश्वासाने व उच्च प्रतिमेने एके दिवशी ती कृत्रीम पायाने परत भारतनाट्य करू शकत होती. पुर्वीप्रमाणेच ठिकठिकाणी कार्यक्रम व लोकप्रियता तिने स्वतः ये अस्तित्व निर्माण केले. त्याच मुलीला पुढे टिव्ही अभिनेत्री म्हणून सुप्रसिध्दी मिळाली.
Remember- If I had my child to raise over again, will build self esteem first & house latter '
-Abhraim Lincen (Ex. President of USA)
🔸 स्व-प्रतिमेवर परिणाम करणारे घटक :
स्वतःबद्दलच्या प्रतिमेवर खालील घटक वयानुसार काम करतात.
अ) वय वर्षे सहा पर्यंत - फक्त पालकांचा परिणाम असतो.
ब) वय वर्षे सहा ते बारा पर्यंत पालक, शिक्षक - व मित्रांचा परिणाम असतो.
क) वय वर्षे बारा नंतर पुढे पालकांपेक्षा मित्रांचा परिणाम अधिक असतो. -
जी मुले स्वतःबद्दल उच्च प्रतिमा विकसीत करतात अशी मुले जीवनामध्ये कोणतेही वाद व समस्या सहजपणे हाताळू शकतात व वाईट गोष्टीच्या दडपणाचा प्रतिकार करू शकतात. ही मुले जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहतात व कोणत्याही प्रकरणाला सकारात्मकपणे हाताळू शकतात. त्याचप्रमाणे जी मुले स्वतःबद्दल उच्च प्रतिमा विकसीत करू शकत नाहीत अशी मुले समोर येणाऱ्या समस्येमुळे चिंताग्रस्त होतात. त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोण नकारात्मक असतो. कोणतेही धाडस, स्पर्धा, आव्हान यापासून स्वतःला दुर ठेवून त्यांच्या बोलण्यामध्ये एक ठरावीक उत्तर असते 'आपल्याला शक्य नाही'.
🔸 स्व-प्रतिमा कमी करणारे घटक :
(१) अतिजास्त सरंक्षण
२) तुच्छतेची वागणूक
Remember- If a child believes he has high self confidence, it was parents who believed first.

🙏🏻🙏🏻🙏🏻 Please write your comment on your comment box and share with your near & dear.

 *If you wish to receive such articles or videos, send Hi message on WhatsApp number 8888126037* 
Join us on 
*Youtube- Dr Ashish Agrawal* 
*Instagram- drgunjan12* 
*Facebook- Ishwar multispecality* 

👍 Dr Ashish Agrawal, Child specialist & expert in parenting, education & behaviour problems.
👍 Dr Gunjan Agrawal, Dental surgeon.

Comments

Popular posts from this blog

मैंने खूब पढ़ाई की लेकिन रिजल्ट नहीं मिला (छात्रों के लिए उपयोगी)

हसत-खेळत बालविकास; पालकांची भूमिका

Life lesson; Stop comparing yourself with others