भावनीक संस्कार (Emotional Development); बाल संस्कार या पुस्तकातील लेख
भावनीक संस्कार (Emotional Development)
------------------------------------------------------------
विविध प्रकारचे संस्कार आपण अभ्यासत आहोत. इतर ठिकाणीही आपल्याला विकासाचे मुद्दे ऐकायला किंवा वाचायला मिळतात. या सर्व मुद्दयांच्या शेवटी किंवा मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे भावनात्मक दृष्टीकोनातुन झालेले संस्कार याबद्दल फार क्वचितच वाचायला मिळते.
‘भावनीक संस्कार (Emotional Development) म्हणजे त्या व्यक्तीच्या समोर आलेल्या परिस्थितीचे योग्य निरीक्षण, आकलन आणि स्वतःसाठी व इतरांसाठी योग्य असलेले प्रत्युत्तर देणे किंवा ती परिस्थिती हाताळणे.'
आपण नेहमी बोलताना फक्त बुध्यांकाचा विचार करीत असतो. मुलाला पुढे काय व्हायचे असे विचारले तर प्रत्येक पालकांच्या तोंडून निघेल की डॉक्टर, इंजिनीअर, वकील, पायलट, कलेक्टर इ. म्हणजे ज्यांचा बंध्यांक (IQ) उच्च असतो. पण फार क्वचितपणे ऐकायला मिळेल की माझ्या मुलाला मी सेवाभावी वृत्तीचा उत्कृष्ट व्यक्तीमत्व असलेला नागरीक किंवा आकर्षक व्यक्तीमत्वाचा व्यावसायिक बनवेल.
Remember- Even with high IQ-Success is not guaranted
आपल्याला पहायला मिळतं की एखादया उच्चविद्याविभुषीत डॉक्टर त्याच्या जीवनामध्ये अपयशी असतो किंवा एखादया शास्त्रज्ञाला कोणी बोलायला सुध्दा तयार होत नाही. याचे कारण फक्त त्यांचा बौध्दीक विकास झालेला असतो पण भावनीक विकास मात्र फार कमी झालेला असतो.
अ) थोडक्यात महत्वाचे :
बुध्दीचा विकास, हा बुध्यांक IQ (Intelligence Quotient) या नुसार तर भावनेचा विकास EQ (Emotional Quotient) या परिमाणाने मोजतात.
माणसाच्या यशस्वीतेसाठी अंशतः विचार केल्यास ८०% EQ तर फक्त २०% IQ ची आवश्यकता
〰️ अपयश
EQ कमी IQ कमी
〰️ यशस्वी परंतु आनंद व समाधान नाही
EQ कमी IQ जास्त
〰️ कमी यश, आनंदी व सर्वांच्या आवडीचा
EQ जास्त IQ कमी
〰️ पुर्णपणे यशस्वी, स्वतःसाठी आणि इतरांसाठी समाधानी व सुखकारक
EQ जास्त IQ जास्त
Remember- Success depends more on EQ compared to IQ.
वरील टेबलचे आकलन केल्यास असे लक्षात येईल की
i) EQ कमी असलेल्या लोकांचा विचार केल्यास ज्यांचा EQ व IQ दोन्हीही कमी आहेत अशा व्यक्ती जीवनामध्ये पूर्णपणे अपयशी असतात.
ii) ज्यांचा EQ कमी परंतू IQ जास्त आहे अशा व्यक्ती त्यांच्या व्यवसायामध्ये काहीवेळा यशस्वी असतात किंवा काही वेळा नसतात. जर यशस्वी असल्या तर त्यांना कोणीही पसंत करीत नाही किंवा त्यांची सामाजिक किंमत कमी असते. अशा व्यक्ती स्वतः सुखी किंवा समाधानकारक राहू शकत नाहीत.
▪️उदा. जर एखादा डॉक्टर अत्युच्च शिक्षण संपादन केलेला असेल पण त्याला रागावर नियंत्रण नसेल तर त्याची प्रॅक्टीस चालणे कंठीण आहे. जर नशीबाने चाललीच तर तो स्वतः आनंदी राहू शकणार नाही व त्याच्यावर कोणीही प्रेम करणार नाही.
iii) ज्या व्यक्तींचा EQ जास्त आहे अशा व्यक्तीचा IQ कमी असला तरी यशस्वी होऊ शकतात. अशा व्यक्ती स्वतः सुखी राहून सर्वांच्या आवडीच्या असतात.
▪️उदा. कामगार जर EQ जास्त असलेला असेल व IQ कमी असेल तर तो सर्वांच्या आवडीचा व स्वतः आनंदी असतो.
iv) ज्या व्यक्तीचा EQ आणि IQ दोन्हीही जास्त असतात या व्यक्ती पूर्णपणे यशस्वी असतात.
▪️उदा. एखादा नेता हशार बुध्दीवादी असेल आणि सोबत मधुर भाषी, सुस्वभावी किंवा सामाजिक मुल्य जपणारा असेल तर तो मुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतो.
Remember- Having a high IQ is nice But having a high EQ is even better
ब) EQ चे महत्व :
i) ज्या व्यक्तीचा EQ जास्त असतो अशा व्यक्ती जीवनात येणारे सर्व बदल सहजपणे हाताळू शकतात. दैनंदिन जीवनात आलेली निराशा, चिडचिड, चिंता, अस्वस्थता ही त्यांच्या लक्षात येते. त्यावर नियंत्रण ठेऊन ते समोरील व्यक्तीस व परिस्थितीस योग्य प्रकारे हाताळू शकतात.
▪️उदा. माझे स्वतःचे उदाहरण येथे आवर्जून सांगावेसे वाटते की ज्यादिवशी भरपूर पेशंट पाहून सुध्दा जर एखाद्या कंपाऊंडर किंवा स्टाफवर चिडलो तर मी मला बैचेनी व अस्वस्थ वाटतं. तर स्वतःवर नियंत्रण ठेऊन पूर्ण काम व्यवस्थीत पार पाडले व त्यादिवशी पेशंट जरी कमी असले तरी मी फार प्रसन्न राहू शकतो. हे फक्त EQ जास्त असेल तर शक्य होते.
ii) EQ चांगला असणाऱ्या व्यक्ती या स्वतःवर नियंत्रण ठेऊन शांतपणे आपले काम करू शकतात.
▪️उदा. रस्त्यावर गाडीला कोणाचा धक्का लागल्यास EQ कमी असलेले लोक भांडणे करून वेळ घालवतात तर EQ चांगला असलेल्या व्यक्ती काही नुकसान न झाल्याचे पाहून शांतपणे वाद मिटवतात. जर त्यावेळी काही दुखापत अथवा नुकसान झाल्यास प्रेमाने भरपाई करून घेतात किंवा कायद्याचे सहकार्य घेऊन न्याय मिळवतात.
(iii) निर्णय क्षमता : सक्षम निर्णय, योग्य वाटचाल, रेंगाळत न राहण्याची प्रवृत्ती ही EQ जास्त असलेल्या लोकांमध्ये असते. सदरील चित्रात दाखविल्याप्रमाणे शांत राहून, विचार करुन योग्य निर्णय क्षमता निर्माण होते.
▪️उदा. एखाद्या व्यक्तीला जागा खरेदी करावयाची असल्यास ती व्यक्ती त्याबद्दलची माहिती घेते व स्वतः जाऊन पाहते. आपल्या आवाक्यातील असल्यास पूर्ण चौकशी करून विकत घेते त्या व्यक्तीचा EQ कमी असेल तर काही तरी कारण काढते, शंका घेते, घेऊ की नको या व्दिधावस्थेत राहते व तो पर्यंत ती जागा हातची निघून जाते.
iv) EQ जास्त असणाऱ्या व्यक्ती जीवनात घडत असलेल्या प्रत्येक बदलांना सकारात्मकपणे स्विकारतात, स्विकारून समोर आलेल्या परिस्थितीनुसार स्वतःला बदलतात व जीवनात आनंदी राहू शकतात.
▪️उदा. प्रत्येक घरामधील चाललेले वाद-विवाद हे EQ कमी असल्याकारणाने होतात. ज्याप्रमाणे सासूला सुनेची आधुनिकता स्विकारता येत नाही, तर सुनेला त्यांचे म्हणने किंवा महत्व कळत नाही. उलट पक्षी EQ जास्त चांगला असणाऱ्या सासू-सुना सोबत खरेदीही करू शकतात किंवा दोघी मिळून घर आनंदाने चालवू शकतात.
इतरांच्या भावनांचा आदर.
५) (Empathy) EQ जास्त असणाऱ्या व्यक्ती इतरांचे विचार काय आहेत? का असा विचार करत आहेत? याबद्दल पूर्णपणे विचार करून व भावनांचा आदर करुन आपली प्रतिक्रिया देतात. वेळप्रसंगी कठोर होणे, मृदभाषेत उत्तर देणे तसेच दया दाखवून माफ करणे अशा लोकांना शक्य असते. व्यवहारीक जीवनात न्यायप्रिय व्यक्तीमत्व म्हणून यांची प्रसिद्धी होते.
▪️उदा. मुलांच्या बाबतीत द्यावयाचे उदाहरण हे खेळामध्ये नेहमी घडणारी घटना येथे सांगता येते. क्रिकेट खेळत असताना समजा ते दोनच मुले असतील. एकाची बॅटींग पूर्ण झाल्यावर तो बॉलींग करीत असताना समजा मध्येच त्याच्या आईने बोलावले. त्यावेळी चॅटींग करीत असलेला दुसरा मुलगा बॅटींग पूर्ण करुन जाण्यासाठी पहिल्या मुद्यावर दबाव टाकत असतो. असे नेहमी होते पण बॅटींग करणाऱ्या मुलाचा EQ जास्त असेल तर त्याला तो जाऊ देईल व पुढच्या वेळी माझी बॅटींग पूर्ण करून द्यावी असे सांगून मार्ग काढेल.
Remember- Empathy does not mean we agree with another person, But rather we attempt to understand other Person's point of view.
थोडक्यात सांगायचे म्हणजे भावनीक संस्कारामुळे कोणतीही व्यक्ती स्वतःच्या भावना नियंत्रीत करणे तसेच इतरांच्या भावना समजून घेणे सहजपणे करू शकते.
मुल जसे मोठे होते त्याप्रमाणे त्याला विविध प्रकारच्या भावनांचा अनुभव होत असतो. पालक त्याला प्रत्येक गोष्टीसाठी ज्याप्रमाणे हाताळतात, उत्तर देतात किंवा त्याच्यासमोर इतरांशी वागतात त्याप्रमाणे मुलांवर भावनीक संस्कार घडत असतात. भावनीक संस्कार अनुवंशीक नसुन ते जन्म झाल्यानंतर अनुभवातुनच व आई-वडिलांच्या शिकवणीतुनच घडत असतात.
Remember- HI EQ = HI Happiness
🔸 भावनिक संस्कार कसे करावेत?
i) मुलांकडून पालकांचे अनुकरण : मुले जगात येतात तेव्हा पूर्णपणे शून्य असतात, ते जे काही या जगात शिकतात ते आजुबाजुला घडणान्या घडामोडीतुनच. प्रामुख्याने ते पालकांचे अनुकरण करीत असतात.
म्हणून पालकांनी मुलांसमोर एक आदर्श प्रतिमा तयार करावी.
▪️उदा. तुमची कार गर्दीमध्ये अडकली आहे व तुम्ही फार परेशान आहात. त्यावेळी मुलाला सांगावे की मला फार राग येत आहे पण आपल्याला शांत राहण्याशिवाय काही पर्याय नाही. चिडून रागावून काही होणार नाही, त्यापेक्षा तोपर्यंत मी तुला एखादी गोष्ट सांगतो किंवा तू एखादे गाणं म्हणुन दाखव. मुलांसमोर आम्ही भावना कशा प्रकारे हाताळाव्यात किंवा इतर गोष्टीकडे फिरवाव्यात हे यासारख्या प्रसंगातूनच दाखवावे. त्याप्रमाणे मुलांना शिकायला मिळते.
Remember- 'Children are a natural mimic, inspite of every attempt to teach, they act like their parent
ii) संभाषण : एक मुलगा अंदाजे ५ वर्षाचा रडत रडत आपल्या आईकडे आला. बाबाही तेथे उभेच होते. मुलगा रडताना म्हणु लागला, मी बाहेर खेळताना पडलो, मला पायाला लागलं आहे." त्यावेळी आई मुलाचे लक्षपूर्वक पूर्ण न ऐकता लगेच जोरात म्हणाली 'मुर्खा, नेहमी निष्काळजीपणे काय वागतो रे ? कसं होईल हो याचं?' वडील त्यावर लगेच बोलले, "पहीलेच किती कटकट चालू असते त्यावर हा एक उपद्रवी असल्यासारखा वागतो.”
वरील प्रकारचे संभाषण हे योग्य संभाषण नव्हे. आपल्या अशा प्रकारच्या प्रतिउत्तरामुळे मुलांच्या भावनीकतेवर दुष्परीणाम होतात. भावनीकता विकसीत होण्यासाठी याचा उपयोग न होता भावनीक असंतुलनाकडे मुले वळतात. अशावेळी पालकांनी मुलासोबत “हो बेटा, तुला लागले दाखव कुठे लागले.... ? खुप दुखत असेल” अशा प्रकारचे वाक्य बोलून भरपूर सहानुभूती व प्रेम द्यावे. ती मार लागलेली जागा पाहून काही जास्त लागले का? याची खात्री करावी. जास्त लागले असेल तर डॉक्टरकडे जावे व कमी असेल तर मुलाला थोडे दुखेल, असे समजून सांगावे तसेच सहन करण्यासाठी प्रेरणा द्यावी. याप्रमाणे होणारे संभाषण उत्कृष्ट संभाषण ठरते. काही पालक असा विचार करतात की मुलांसोबत जास्त बोलले तर
- मुले आपला आदर करणार नाहीत
मुले आपला अनावश्यक फायदा घेतील मुलांना आपली थोडी देखील भीती राहणार नाही. पण सत्य परिस्थिीती अशी आहे की कोणत्याही नाते संबंधात उत्कृष्ट संभाषण होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे पालक व मुल यांच्या संबंधात सुध्दा उत्कृष्ट संभाषण झाले तर मुलांवर चांगले भावनीक संस्कार होतात.
Remember- The best way to understand child is to listen to him.
उत्कृष्ट संभाषण :
■ पूर्णपणे लक्ष देऊन ऐकणे ज्या व्यक्ती इतरांचे बोलणे पूर्णपणे ऐकत नाहीत अशा व्यक्तीना इतरांच्या भावना समजून घेण्याची कुवत नसते. आपण जर मुलांसोबत वरीलप्रकारे वागत असलो तर त्यांच्या भावनांचा अनादर होतो. मुले आपल्याशी सविस्तर पणे संभाषण न करू शकल्यामुळे त्यांचा भावनिक विकास कमी होतो. आपले पाहून शिकण्याच्या प्रवृत्तीमुळे मुलेही त्याप्रमाणे वागायला शिकतात. या सर्व गोष्टीचा परिणाम म्हणजे मुलांचा EQ कमी होतो. EQ कमी असलेल्या व्यक्तींना मित्र कमी व शत्रु जास्त होण्याची शक्यता असते. त्यामुळे मुलांकडे पूर्णपणे लक्ष देऊन ऐकावे. त्याचप्रमाणे लक्षपूर्वक ऐकण्याची शिकवण मुलांना द्यावी.
■ आपण स्वतः कमी बोलुन मुलांना जास्तीत जास्त बोलु द्यावे.
■ मुलांचे बोलणे मनःपुर्वक ऐकावे व पूर्ण विचार करून उत्तर द्यावे.
■ उत्तर शोधण्यास शिकविणे : मुलांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यापेक्षा स्वतः शोधण्यास सांगावे व प्रेरणा द्यावी. जमत नसेल तर उत्तर शोधण्याचा मार्ग दाखवावा तरीही होत नसेल तर पर्याय द्यावेत. यासर्व प्रयत्नानंतर अखेरीस उत्तर सांगावे.
▪️उदा. समजा आपल्या मुलाची जनरल नॉलेजची परीक्षा तीन दिवसावर असून ती परीक्षा अभ्यासक्रमाव्यतीरीक्त इतर ऐच्छीक स्वरूपाची आहे. अशा परिस्थीतीत मुलगा फार भीत असेल आणि परिक्षेबद्दल दडपण बाळगत असेल, तर मुलाला भावनीकता हाताळण्यासाठी याप्रकारची चर्चा करावी.
मुल- "पप्पा माझा आभ्यास पूर्ण झाला नाही मला फार भीती वाटते"
पप्पा - "भीती कशासाठी ?”
मुल "मला कमी मार्क्स मिळतील याबद्दल....
पप्पा “आणि कमी मार्क्स मिळाले तर काय होइल?"
मुल "मला सर्वजण 'ढ' समजतील'
पप्पा - "मग मला सांग तू काय करु शकतोस ?"
मुल - “काय करावे, हेच सुचत नाही"
पप्पा - तुझ्यासमोर आता फक्त दोनच पर्याय शिल्लक आहेत. एकतर शांत रहाणे किंवा अभ्यास करणे.
मुल मी अभ्यासच करीत आहे.
पप्पा अभ्यासाला आणखी तीन दिवस आहेत त्यात पूर्ण होणार नाही का?
मुल होऊ शकतो पण नाही झाला तर......
पप्पा " आभ्यास पूर्ण न झाल्यास तुझ्या मुख्य मार्कावर परिणाम होईल का ?"
मुल “नाही ह्या परिक्षेचा व त्या परिक्षेचा काहीही संबंध नसतो. "
पप्पा "मग अशी काळजी करण्यामध्ये मन व्यस्त करण्यापेक्षा आभ्यासाचा प्रयत्न केला तर चांगले मार्क्स मिळणार नाहीत का? नाही जरी मिळाले तरी आपले नुकसान होईल का ?" "हो पप्पा मी प्रयत्न करेन यावेळी न झाले तरी पुढच्या मुल
परिक्षेत पहीला नंबर मिळवेल. "
(iii) मुलांच्या भावनांचा आदर करावा : नेहमी पालक मुलांच्या भावना जागेवर दाबण्याचा प्रयत्न करतात. कधी कधी मुलांच्या भावनीकतेवर हसून चेष्टा करतात. प्रत्येक दिवशी प्रत्येक प्रसंगात आपल्या समोर विविध प्रकारच्या भावनीक समस्या निर्माण होत असतात. त्या भावना आपल्याला समजता आल्या पाहीजेत जसे : आनंद, दुःख, चिंता, भीती, निराशा, राग इ. या भावना समजु शकलो तरच आपण आपले जीवन योग्यप्रकारे जगु शकतो. त्याचप्रमाणे मुलेसुध्दा विविध भावनीक प्रसंगाचा अनुभव घेत असतात. आपण त्याबद्दल सविस्तर माहिती देऊन योग्यप्रकारे निर्णय कसे घ्यावेत याबद्दल शिकवावे.
Remember- The first step of emotional development is to be aware of what we feel
▪️उदा. समजा आपला चार वर्षाचा मुलगा घरासमोरील ओटयावरून उडी मारण्यासाठी घाबरत आहे. त्यावेळी आपण मुलाला हसण्या किंवा चिडविण्या ऐवजी तू उडी मारू शकतोस व घाबरू नको अशाप्रकारे प्रोत्साहन द्यावे. तरी सुध्दा शक्य झाले नाही तर स्वतः उडी मारून दाखवावी. नंतर त्याचा हात धरून उडी मारण्याचा सराव करावा. असे केल्यावर भीती कमी झाली तर उडी मारण्यासाठी प्रोत्साहन द्यावे.
iv) विविध वर्तणुकीबद्दल चर्चा आपण आपल्या मुलासोबत कोणत्याही ठिकाणी घडत असणाऱ्या विविध प्रकारच्या प्रसंगावर चर्चा करावी. त्याप्रसंगामध्ये घडत असलेल्या व्यक्तीच्या वर्तणुकीबद्दल स्पष्टीकरण द्यावे.
▪️उदा. समजा एका मंदीरात किंवा दर्ग्यात कोणी व्यक्ती अन्नदान करीत असेल तर त्यावेळी मुलाला काय वाटते हे विचारावे. त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती त्याच्या ड्रायव्हरला रागवत असेल किंवा एखादी व्यक्ती स्वतःच्य आईला रागवत असेल तर त्यावेळी मुलाला त्याबद्दल काय वाटते हे विचारावे. मुलासोबत चर्चा करत असताना त्याला काय वाटते? चांगले आहे का वाईट ? तू त्या ठिकाणी असता तर काय केले असते? अशाप्रकारच्या प्रश्न- उत्तर स्वरूपात चर्चा करावी.
v) इतरांच्या भावना समजणे : समजा मुलाने त्याच्या भावाला मारले अथवा त्याच्या मित्राची खेळणी घेऊन पळून गेला. त्यावेळी पालकांनी मुलावर ओरडू नये आणि फक्त, "बेटा असे केल्यामुळे इतरांना शारीरीक अथवा मानसीक वेदना होत असतात" असे स्पष्टीकरण द्यावे. यामुळे काही मुले पूर्णपणे समजु शकणार नाहीत. मुलांना लक्षात न आल्यास जर तुला कोणी मारले तर तुला काय वाटेल? तुझी खेळणी खेळताना कोणी हिसाकाहुन घेतली तर तू काय करशील? अशाप्रकारचे प्रश्न विचारून मुलांना इतरांच्या भावना समजण्यासाठी शिकवावे.
vi) देवाण-घेवाणीची शिकवण द्यावी आपले मुल लहान असतानाच जीवनामध्ये एक दुसऱ्याशी देवाण घेवाण करून वाटचाल केल्यास त्याचा कसा फायदा होतो, हे शिकवावे. आपण जेव्हा आपल्या जवळील एखादी वस्तु, खाद्यपदार्थ दुसन्याला देतो तेव्हा त्याचा आनंद कसा मिळतो. वाचा अनुभव मुलांना स्पष्टीकरणासह द्यावा.
▪️जसे दिवाळी, ईद, अंबेडकर जयंती यासारख्या मोठया सणाला गरीब मुलांमध्ये मिठाई व फटाके वाटणे.
Remember- The child's future will be bright if he learns to sacrifice for other'
(vii) भावनिकता हाताळण्यासाठी मुलांना मदत करणे : मुलगा जेंव्हा भावनिक असंतुलनाच्या परिस्थितीत असतो त्या वेळी त्याला त्याचा पूर्ण वेळ भावना जुळवण्यासाठी द्यावा. जर मुलगा तुमच्याकडे भाऊ-बहीणीचे भांडण घेऊन आला आणि तो रडत असेल तर त्याला काही पालक, 'काय मुर्खासारखा रडतो ?' 'अरे ती लहान आहे,' 'चल गप्प बस' 'वेडा कुठला...' वगैरे बोलून गप्प करतात. काही पालक तर 'जाऊ दे, तुला मी चॉकलेट देतो. "फिरायला नेतो' म्हणून त्याचे लक्ष घालवतात आणि त्याच्या मनात उमटलेले चित्र तसेच थोपवून टाकतात. काही पालक एखादी खेळणी तुटल्याने रडणाऱ्या मुलाला, ‘उगीच रडण्याचे नाटक करून वेळ घालू नको' उद्या दुसरी आणूया.. असे सांगुन शांत करतात. अशा प्रकारच्या पालकांच्या वर्त त्या भावनेला कशा प्रकारे हाताळावे हे शिकण्याऐवजी मानसिकरित्या खचून जातात. त्यांचा या घटनांचा अनुभव शुन्य ठरतो. केंव्हाही मुलाला त्याच्या मनातले पूर्णपणे बोलू द्यावे व नीट ऐकुन घ्यावे म्हणजे तो थोडासा स्थिर होईल. त्याचा राग शांत झाल्यावर घडलेल्या घटनेबद्दल चर्चा करून येणाऱ्या समस्येला हाताळण्याची प्रेरणा द्यावी. खालील दिलेल्या उदाहरणातुन या गोष्टी स्पष्ट करण्याचा मी प्रयत्न केला आहे.
▪️उदा. समजा एखादेवेळी मुलगा सर्व मित्रांसोबत क्रिकेट खेळत आहे व चांगले खेळता खेळता वाद झाला, भांडणे वाढली हे तुम्ही स्वतः पहात असला तरी मध्ये पडू नये. त्यांची मारामारी फार जास्त प्रमाणात वाढली तर जाऊन फक्त आपल्या मुलाला न रागावता घरी आणावे व दुसऱ्याला प्रेमाने घरी जाण्यास सांगावे. घरी आणल्यानंतर काहीही बोलू नये, जर मुलगा सांगत असेल तर फक्त शांतपणे ऐकावे किंवा त्याचा राग शांत झाल्यावर स्वतः विचारावे व सविस्तर चर्चा करावी.
▪️चर्चा
मम्मी "काय रे राजु तेव्हा एवढा का रागावला होता?' रे
राजु 'अगं मम्मी, मला राग होता त्या विक्कीवर!'
मम्मी "का?"
राजु 'अगं स्वतः खोटं बोलून मलाच चिडवत होता. दिले दणके बेट्याला.'
आई "अरे राजु पण मारणे योग्य आहे का?"
राजू 'हो! त्याशिवाय पर्यायच नव्हता.'
मम्मी "काय म्हणतोस राजु ? असे त्याने काय केले होते?"
राजु *हे पहा मम्मी, माझी बॅटींग चालू होती व विक्की' किपर होता. '
मम्मी तर '
राजू 'बंटीने बॉल टाकला, माझ्या बॅटला टच न होता तो बॉल मागे गेला व विक्कीने कॅच केली. '
आई 'मग एवढं काय तू त्याला कट नव्हती असं सांगायचं ना.'
राजू ‘हो! मी म्हणतोय त्याला पण तो न ऐकता ओरडू लागला व आऊट आऊट म्हणून हसून चिडवू लागला.' आई 'आणि त्यावेळी इतर मुले काय म्हणत होती.'
राजू मम्मी"काय माहित मी पाहिले नाही. याचा चिडवण्याचा राग आला व मी त्याला त्याची जागा दाखवली.
मम्मी 'अरे राजु हे बरोबर नाही. त्यापेक्षा इतर मुले काय म्हणत आहेत याकडे तू शांतपणे ऐकायला हवे होते. तो चुक आहे हे इतर मुलांना सांगून पहायचे होते. त्याच्या वाक्याला विरोध करुन बॅटींग सोडायची नव्हती. '
राजु 'अगं आई तुला माहित नाही नेहमी तो असाच करतो.'
मम्मी 'अरे तो नेहमी असाच करतो, तर इतर मुले त्याला कशी प्रतिक्रिया देतात? याचा विचार करायला हवा होतास. समजा तुझ्या जागी सचिन असता तर त्याने काय केले असते याची आठवण करुन प्रतिक्रिया दिली असती तर मारामारी झालीच नसती. समजा तो कोणत्याही पद्धतीने चुप झाला नसता तर मी खेळणार नाही पण मी आऊट नाही म्हणून निघून आला असता तर काय झाले असते ?'
राजु अरे हो मम्मी तसे केले असते तर तो स्वतःच मला बॅटींग देऊन खेळायला बोलवत होता खरं तर मारल्यानंतर मलाच खूप वाईट वाटले.
अशा घटना घडणे ही चांगली बाब आहे यामुळे मुलांना शिकण्यास व पालकांना योग्य मार्गदर्शन करण्यास संधी मिळते. या प्रसंगाकडे दुर्लक्ष करून मुलांना सहकार्य न केल्यास त्यांचा भावनांक कधीच वाढणार नाही.
Remember- Every problem has a solution, it may sometimes need another perspective
🔸 आपण काय करावे ?
■ मुलांच्या भावनांना महत्व देऊन योग्यप्रकारे संवाद करावा. रागावून किंवा दुर्लक्ष करून थोपवू नये.
■ शांतपणे त्यांचे ऐकून घेणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. यामुळे मुलांना सांत्वन मिळते व आपल्याला सल्ला देण्यास योग्य पर्याय शोधता येतो.
■ त्यांच्याशी बोलताना मृदु, शांत व एक उत्तम सल्लागार असल्याप्रमाणे संभाषण करावे.
■ वार्तालाप करत असतांना मुलांना स्वतः पर्याय शोधण्यास सांगावे तसेच याशिवाय काय करता आले असते याचा शोध घ्यायला शिकवावे.
■ विविध प्रकारची उदाहरणे देऊन किंवा स्वतः सोबत घडलेले प्रसंग सांगून मुलांना मार्ग दाखवावा, उतावीळपणे बडबड करून स्वतः महान असल्याचे नाटक करू नये.
■ मुलांना समजावताना काही इतर उदाहरणांचा वापर करून त्या सारखी परिस्थिती निर्माण करून सांगावे. तरी समजत नसेल तर मित्रांच्या किंवा शेजाऱ्यांच्या मुलाने या वेळी काय केले असते असे प्रश्न विचारून उत्तर शोधण्यास मदत करावी.
■ प्रत्येक वेळी आपण जाऊन मदत करण्याची आवश्यकता नसते. जर आपल्याला वाटत असेल की तो स्वतः यातून सावरत आहे तर दुर्लक्ष करावे. कधी मदत तर कधी दुर्लक्ष असे केल्याने तो भावना सांभाळण्यासाठी इतरांवर पूर्णपणे अवलंबून राहणार नाही.
viii) काही वेळा ठामपणे नकार देणे : मुलांचा जिद्दीपणा नैसर्गीक असून त्यांनी केलेला हट्ट पुरवणे हे प्रेम दर्शवणे असते तसेच त्यांना वेळप्रसंगी ठामपणे नकार देणे हेही तेवढेच आवश्यक असते. अनावश्यक किंवा आपल्या नियमाबाहेर जर मुले काही हट्ट करीत असतील तर त्यांचा कोणत्याही परिस्थितीत हट्ट पूरवू नये.
▪️उदा. सकाळपासून तिळमात्रही अभ्यास नाही, बाहेरून खेळून आलाय होमवर्क शिल्लक आहे व व्हिडीओ गेम खेळू दे म्हणून रडतोय तर त्याला कोणत्याही परिस्थितीत देऊ नये. असे केल्याने प्रथम मुलांना अयोग्य गोष्टीला ना असते हे तर कळतेच सोबत त्याच्या निर्माण झालेल्या भावना स्वतः सावरण्यास शिकतो. जीवनामध्ये माणसाला प्रत्येक गोष्ट मनासारखी मिळत नाही, ने मिळाल्यास कशाप्रकारे स्वतःला सांभाळावे व पुढील वाटचाल करावी हे शिकता येते.
Remember- No means No, used in parenting your child
ix) महान व्यक्तींचे उदाहरण देणे : महान व्यक्तीची उदाहरणे देऊन मुलांना प्रोत्साहन द्यावे. वाईट परिस्थितीतूनसुद्धा व्यक्तीला भरघोस यश संपादन करता येते हे वारंवार सांगावे.
▪️जसे : गांधीजीचे स्वातंत्र्य कार्य, देशासाठी केलेले जीवनार्पण याचे महत्व समजवावे.
• एका मागासलेल्या खेड्यात जन्म झालेले अब्दुल कलाम हे मोठे वैज्ञानिक आहेत. त्यांची ओळख करून द्यावी.
• अतिशय गरीब कुटूंबात जन्म घेतलेल्या डॉ. आंबेडकरांनी केलेले सामाजिक कार्य व घटना लिहण्याएवढे मोठे काम हे अतुलनीय आहे हे पटवून द्यावे.
• धिरूभाई अंबानी सारख्या गरीब व्यक्तीने मिळवलेले व्यवसायातील. यश कसे मोठे आहे ते स्पष्ट करावे.
यासारख्या लोकांच्या जीवनातील घटना व त्यांच्याकडून घेण्याची प्रेरणा मुलांना वारंवार द्यावी. यामुळे मुलांमध्ये आव्हान स्वीकारून पुढे जाण्याची प्रवृत्ती तयार होते.
Remember- Study the past if you would define future
x) एकत्र कुटूंब पध्दती (Joint Family): एकत्र कुटूंब पध्दती या काळात फार कमी प्रमाणात दिसून येते परंतु या कुटूंब व्यवस्थेचा आपल्या मुलांसाठी फार उपयोग होतो. या पध्दतीत विविध व्यक्तीमत्व मुलांसमोर येतात. त्यांच्याशी बोलणे, खेळणे, लाड, कौतुक, प्रेम, राग, व्देष, अहंकार या विविध गुणांचाही जवळून अभ्यास मुलांना होतो. दोन-तीन भावांचे कुटूंब सोबत असल्यामुळे मुलांना एकत्रित तयार मित्र परिवार मिळतो. मुले त्यांच्या सोबत खेळताना किंवा भांडताना सर्व काही (भावनांकाबद्दलचे) विषय शिकू शकतात. आई वडिलांनी जर शिस्त लावण्यासाठी काही कडक शासन केले किंवा रागावले तर आजी आजोबांकडून किंवा इतरांकडून प्रेम मिळते. ज्याप्रमाणे कुंभार एका हाताने थापडतो व एका हाताने सांभाळतो तेव्हा एक सुंदर मडके तयार होते त्याप्रमाणे मुलांचे छान संघोपन होऊ शकते. या ठिकाणी याबद्दल लिहण्याचे कारण की तुम्ही जर एकत्र कुटुंब पध्दतीत रहात असाल तर त्याचा पूर्ण सदुपयोग करा. जर विभक्त पध्दतीकडे वाटचाल करीत असाल तर मुले मोठे होईपर्यंत वाट पहा. जर तुम्ही विभक्त कुटूंब पध्दतीत असाल तर आपल्या मुलांना नातेवाईकांकडे पाठवा किंवा नातेवाईकांच्या मुलांना आपल्या घरी आवर्जुन बोलवा. हा माझा सल्ला आपल्या मुलाच्या संघोपनासाठी व भावनांकाच्या दृष्टीने आत्मीक विकासासाठी मोलाचा राहील.
Remember- Hi EQ is Success of Life
🙏🏻🙏🏻🙏🏻 Please write your comment on your comment box and share with your near & dear.
Comments
Post a Comment