शिस्त मुलांमध्ये (Discipline); बाल संस्कार पुस्तक से लेख

शिस्त मुलांमध्ये  (Discipline)
---------------------------------------

आपल्या मुलाने विद्यार्थी जीवनात तसेच पुढील आयुष्यात यश मिळवावे अशी प्रत्येक पालकांची ठाम इच्छा असते. हे यश पूर्ण करण्यासाठी इतर सर्व मुद्यांसोबत शिस्त हा फार महत्वाचा मुद्दा आहे. मी सांगत असलेली शिस्त ही आपल्या सर्वांना ज्ञात आहे. त्याचे महत्व सुद्धा फार चांगल्या प्रकारे आपण समजू शकतो, फक्त गरज असते ती योग्य प्रकारे 23  शिकवण्याची किंवा शिस्त लावण्याची. शिस्त पाळणारे मूल हे स्वतःच्या मर्यादा राखून जगण्यास शिकते जसे-खेळ, अभ्यास, टीव्ही, स्वतःची कुवत या सर्वाविषयी मर्यादा ओळखणे व त्यानुसार आपली कृती करणे हे सहज शक्य होते. शिस्तप्रिय मुलांचे प्रत्येक गोष्टींवर नियंत्रण असते. जसे टीव्ही पाहणे म्हणजेच टिव्ही पहात असतांना जर ठराविक एक तास दिलेला असेल तर शिस्तप्रिय मुल एक तासानंतर टिव्ही पाहण्याची इच्छा दाखवणार नाही. जरी एखादेवेळी हट्ट केला तरी होणाऱ्या नुकसानाबद्दल लक्षात आणून दिल्यास हट्ट सोडतील. त्याचप्रमाणे अशी मुले मोठी झाल्यावर सुद्धा वाईट मार्गाकडे केव्हाही वळणार तर नाहीतच उलट सर्व स्वतःच्या कृती व जबाबदारी याबद्दल काटाक्ष ठेवून शिस्तबद्ध वागतील. कोणत्या कामाला किती वेळ द्यायचा याचे संतुलन मुले शिकतील. वेळेचे महत्व या मुलांना आल्यामुळे खेळ, गंमत, मजा, गप्पा, बडबड, फिरणे करीत असतांना यावर स्वतःचे व वेळेचे नियंत्रण कशाप्रकारे करता येईल हे शिकतील. '
Remember- Lack of discipline lead to failure & Frustration'
अशा प्रकारचे महत्व जरी आपल्या सर्वांना मान्य असतील तरी शिस्त कशी लावावी या बद्दलची योग्य पद्धत माहित नसते. आपल्याकडे बरेच पालक मुलांना जोरात ओरडणे, रागावणे, शिव्या देणे असे प्रकार करतात. काही सुजाण पालक तर शिस्त लागावी म्हणून घरातील एखाद्या रुममध्ये कोंडून ठेवणे किंवा मारणे पसंत करतात. हाताची ताकद कमी पडते म्हणून की काय काही पालक छडी किंवा काठीचा वापर करतात. काही पालकांना इतरांसमोर असे प्रकार करण्याची किंवा तुच्छतेने बोलण्याची सवयच असते, ते यातून इतरांना काय दाखवण्याचा प्रयत्न करतात ते देव जाणे!

🔸 शारीरीक शिक्षेचे दुष्परिणाम 
i) मारणे, तुच्छतेने बोलणे किंवा इतरांसमोर अपमानीत करणे यामुळे मुलाला फक्त आपल्याबद्दल भीती निर्माण होते.

(ii) अशा प्रकारामुळे मुलांवर तात्पुरता सुधार किंवा बदल होतो परंतु हवी असलेली शिस्त किंवा चिरकाल टिकणारा चांगला परिणाम मिळत नाही.

iii) अशा प्रकारची वागणुक घरामध्ये पाहून, मुलेही मनाप्रमाणे रागावणे,
इतरांवर चिडणे व मारणे शिकतात. त्यांना अशी जाणीव होते की कोणावरह ओरडल्याने व मारण्याने मनासारखे साध्य करता येते. (iv) मुलांमध्ये द्विधा मनस्थिती, भित्रेपणा, लाजाळूपणा किंवा चिडही निर्माण होऊ शकते.

v) काही लहान मुले तर पालकांच्या अशा वागण्याने नैराश्य उदासिनतेला बळी पडतात व आत्मविश्वासही हरवून बसतात.
Remember- If child does not follow rules of discipline, there is something wrong with sets of rules not child'

🔸 पालकांनी काय करावे ?
पालकांनी मुलांना शिस्त लावण्यासाठी वारंवार स्वतःच्या कृतीतून दाखवावे आणि फक्त मार्गदर्शन किंवा त्याचे महत्व सांगत रहावे. शिस्त लावण्याची घाई किंवा जबरदस्ती करु नये. 
Remember- The role of discipline is not punishment, but helps to learn how to overcome the problem & become self disciplined.

🔸 यासाठी आपण खालील लिहलेल्या पद्धतीचा अवलंब करावा.
(i) योग्य दिनचर्या तयार करावी आपल्या घरातील सर्व व्यक्तीसाठी एक योग्य असा दिनक्रम असावा व त्यानुसार सर्वांनी पालन करावे. घरातील सर्व व्यक्तींच्या वागणुकीत काही मुख्य नियम असावेत व सर्वांकडून काटेकोर पालन व्हावे. 
▪️जसे उठण्याची वेळ व झोपण्याची वेळ ठराविक करुन त्याचे पालन करावे. एखादेवेळी नियम भंग झाला तर दुर्लक्ष करावे परंतु वारंवार होत असेल तर चर्चा करुन दुरूस्ती करावी. काही नियमांसाठी कडक राहणे व सक्ती करणे आवश्यक असते 
▪️जसे: जेवणापुर्वी हात धुणे.

ii) प्रोत्साहन देणे : घरामध्ये वरिल प्रमाणे नियमबध्द व व्यवस्थ चालू असतांना लहान मुले आपले पाहून अनुकरण करीत असतात. यावेळी मुलांनी जे योग्य असे अनुकरण केले किंवा वारंवार शिकवल्यानंतर पालन केले तर त्याची आवर्जुन प्रशंसा करावी भरपुर 
▪️उदा. रोज सांगितल्यावरही मुलगा जेवणापूर्वी हात धुत नसेल आणि एके दिवशी अचानक आपले पाहुन तो हात धुवू लागला तर त्याची प्रशंसा करावी. कोणत्याही नवीन शिस्तीचे पालन केल्यावर इतरांसमोर कौतुक केल्याने मुलांचा उत्साह वाढेल व तो त्या सवयीला नेहमी करण्यासाठी तयार होईल.

iii) चर्चा करणे : आपल्याला अपेक्षित शिस्त मुलानी लवकरात लवकर आत्मसात करावी वाटते परंतु सांगितल्याबरोबर ऐकावे असा हट्ट पालकानी करु नये. तसेच मारणे, रागावणे व ओरडणे यामुळे मुलांवर तात्पुरता परिणाम होईल पण अपेक्षित उद्दीष्ट पूर्ण होणार नाही.
सर्व प्रथम प्रत्येक शिस्तीच्या किंवा नियमाच्या मागे काय कारण आहे. किंवा त्यांचे काय महत्व आहे हे स्पष्ट करावे. चर्चा करतांना आपल्याला जे योग्य कारण वाटते तेच मुलांसमोर ठेवावे. खोटी कारणे देऊन पटविण्याचा प्रयत्न करु नये. आपण स्पष्ट केले म्हणजे अमलात आलेच पाहीजे असे नाही. बऱ्याच वेळा मुले त्यांच्या सोयीनुसार नियम बदलतात किंवा पालन करीत नाहीत. फक्त शांतपणे सांगणे व त्यांचे जास्त शांतपणे ऐकूण घेणे हे आपले कर्तव्य आहे. मुलांचे शांतपणे ऐकल्यावर परत इतर प्रकारे योग्य ते समजून सांगावे यावरही त्याने ऐकले नाही तर आता आपली बाजू न बदलता शांत रहावे व आवश्यकते नुसार ठामपणे आपला नियम कायम करावा.
▪️उदा. एखादेवेळी बाजारात खेळणी विकत घेत असताना आपल्या मुलाने रिमोटची कार पसंत केली. समजा रिमोट असलेली कार महाग आहे व आपली इच्छा नसेल तर त्याला तसे स्पष्ट सांगावे की ती मोटार महाग आहे. आणि यामुळे तुझा शारीरीक व्यायाम होत नाही. असे सांगीतल्यावर तो रडेल व घेण्यासाठी हट्ट करेल. परत एकदा समजून सांगावे जर तो ऐकण्याच्या मनस्थीतीत नसेल किंवा हट्ट करीत असेल तर सरळ उचलून घरी घेऊन जावे परंतु त्यादिवशी आपले विचार बदलू नयेत. आपल्याला हट्ट पुरवण्याची खूपच इच्छा होत असेल तर काही दिवसानंतर ती मोटार घेऊन द्यावी.
Remember- The quickest way for parents to get child attention is to sit down & look comfortable

iv) नैसर्गीकपणे समजणे (Natural Consequence)  
आपल्या मुलाला बन्याच गोष्टी स्वतःहून अनुभवाने शिकायला मिळतात. नैसर्गीकपणे झालेल्या नुकसानामुळे किंवा त्रासामुळे मुले काही शिस्त शिकतात. स्वतःच्या अनुभवातून आलेली शिस्त नेहमीसाठी मुले पालन करतात.
▪️उदा. समजा आपल्या मुलांचे गृहपाठ पूर्ण करण्यासाठी किंवा अभ्यासासाठी आपल्याला नेहमी मदत करावी लागते. त्याने स्वतः करावे असे सांगून सुध्दा तो स्वतः करीत नसेल तर एका दिवशी गृहपाठाला थोडीही मदत न करता ठाम रहावे. फक्त एकदा सांगून मुलाशी रोज पेक्षा थोडेसे नाराजीने वागावे. दुसऱ्या दिवशी गृहपाठ न केल्यामुळे शाळेत शिक्षा होईल. त्याने घरी येऊन सांगितल्यावर सुध्दा विशेष चर्चा करू नये. असे केल्याने स्वतः अनुभव येऊन मुले शिस्तीप्रमाणे वागणे शिकतील. यातून त्यांना अभ्यासाचे व वेळेचे महत्व समजून त्याबद्दल शिस्त लागेल.
Remember- Children will learn that every action has equal & opposite reaction 

v) तर्क व परिणामांवरुन समजणे (Logical Consequence) :
Logical Consequence या प्रकारामध्ये मुलाला होणारी चूक समजते पण तो सुधारण्याच्या मनस्थितीत नसल्यास त्याला आपण हस्तक्षेप करून त्यानुसार अडथळा निर्माण करावा लागतो. म्हणजे मुल आपोआप त्यापासून दूर होऊन विचार करायला शिकेल किंवा पुढच्या वेळी असे केल्याने काय परिणाम होतो याची कल्पना त्याला असेल.
▪️उदा. ४ ते ६ वर्ष वय असलेल्या मुलाला एखादी खेळणी विकत घेतलेली असतांना ती सांभाळण्याची जवाबदारी द्यावी. हरवल्यास किंवा खराब केल्यास त्याला दुसरी खेळणी मिळणार नाही असे स्पष्ट सांगावे. यदा कदाचीत ती खेळणी तुटली तर त्यासारखी खेळणी त्याला किमान दोन महिने तरी देऊ नये. असे केल्याने त्याला जवाबदारी येईल व त्यानुसार शिस्त लागेल.
मोठा मुलगा (वय ७-८ वर्षे) घरामध्ये चेंडू खेळत आहे व त्याला वारंवार सांगून ही तो बाहेर खेळण्यास तयार होत नसेल आणि त्यांच्या खेळण्याने घरातील वस्तु तुटण्याचा धोका किंवा इतरांना त्रास होत असेल तर तो चेंडू उचलून ठेऊन द्यावा. कोणत्याही परिस्थीतीत ३-४ दिवस देऊ नये. अशाप्रकारे जेव्हा आपण मुलांसोबत वागतो तेव्हा मुलाला क्षणिक फार वाईट वाटते, राग येतो आणि आपल्याला देखील असे करताना वाईट वाटते पण असे केल्याने चांगली शिस्त मुलांना लागते.

vi) मौज मस्तीवर बंधन करणे (With hold Privilege) : वरील दोन्ही प्रकारामध्ये मुलांमध्ये बरीच सुधारणा होऊ शकते परंतु काही मुले बंड प्रकारची असतात. वरील प्रकारे जेव्हा आपण शिक्षा करतो त्यावेळी ते ओरडणे, रडणे, उलट बोलणे, इतर वस्तुंची तोडफोड करणे किंवा काहीतरी वेगळया प्रकारचे त्रास देऊन आपल्याला नमवण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी आपली भूमीका ठाम ठेवावी. मुलांना आनंद देणाऱ्या किंवा मौज मस्ती करणाऱ्या गोष्टींवर तात्पुरते बंधन करावे जसे टि.व्ही पाहणे, बाहेर खेळणे, फिरायला जाणे, बागेत जाणे इ.
▪️उदा. जर मुलगा आपले म्हणणे ऐकत नसेल किंवा जिद्द सोडत नसेल तर त्याला सांगावे, "तू जर शांत झालास तर ठिक आहे नाहीतर तुला आज टिव्ही पाहायला मिळणार नाही.” त्या प्रकारे ताकीद दिल्यानतर सुधारणा झाली नाही तर खरोखर त्याला त्यादिवशी ठरलेल्या वेळेत टिव्ही पाहण्यावर बंधन घालावे. अशाप्रकारची शिक्षा केल्यानंतर त्या दिवशी मुलांसोबत थोडेसे अंतर ठेऊन वागावे. ओरडणे व चिडणे टाळावे आणि कोणत्याही परिस्थितीत लाइ करू नये.

(vii) अखेरचा पर्याय शारीरीक शिक्षा (Physical Punishment) 
वरील सर्व प्रकारचा अवलंब वारंवार करीत रहावा. वारंवार वरील पध्दतीचा अवलंब केल्याने मुलांमध्ये सुधारणा होईल हे निश्चीत आहे. परंतु काही मुलांमध्ये आक्रमता किंवा काही आपल्या जुन्या चुकांचा परिणाम म्हणून जिद्दीपणा असतो. हे मूल सर्व समजून सुध्दा अतिलाडाने हट्टीपणा करते, ऐकत नाही किंवा आपल्या उणीवांचा फायदा घेत (ज्याप्रमाणे इतर व्यक्तीच्या समोर आपण रागावत नाहीत) बेशीस्तपणे वागते. त्यावेळी मुलांना शारीरीक शिक्षा करावी, ही शिक्षा म्हणजे हलक्या हाताने जास्त त्रास होणार नाही या प्रमाणे मारावे. अशा प्रकारच्या शिक्षा करण्याने मुलगा भितीयुक्त अज्ञा पाळण्याचे शिकेल... शारीरीक शिक्षा केल्यानंतर मुलांशी लगेच प्रेम, लाड करू नये. त्याच्याशी त्यादिवशी दूर दूर राहण्याचा किंवा कडक बोलण्याचा अवलंब करावा.

🙏🏻🙏🏻🙏🏻 Please write your comment on your comment box and share with your near & dear.

 *If you wish to receive such articles or videos, send Hi message on WhatsApp number 8888126037* 
Join us on 
*Youtube- Dr Ashish Agrawal* 
*Instagram- drgunjan12* 
*Facebook- Ishwar multispecality* 

👍 Dr Ashish Agrawal, Child specialist & expert in parenting, education & behaviour problems.
👍 Dr Gunjan Agrawal, Dental surgeon.

Comments

Popular posts from this blog

मैंने खूब पढ़ाई की लेकिन रिजल्ट नहीं मिला (छात्रों के लिए उपयोगी)

हसत-खेळत बालविकास; पालकांची भूमिका

Life lesson; Stop comparing yourself with others