चांगल्या सवयी {Creating good habits}; बाल संस्कार या पुस्तकातील लेख

चांगल्या सवयी {Creating good habits}

चांगल्या सवयी लावण्यासाठी काही शास्त्रीय पद्धती आहेत त्यांचा अवलंब करावा. खालील पद्धतीचे पालन केल्यास चांगल्या सवयी लावणे जास्त सोपे जाईल.
अ) वय
ज्या काही चांगल्या सवयी आपल्या मुलाला लावायच्या असतील त्या लहान वयापासूनच लावाव्यात, मुल छोटे असतांना आपण लाडामुळे किंवा छोटे आहे असे म्हणून टाळतो, बऱ्याच वेळा विनोदाचा प्रकार म्हणून हसण्यावर नेतो. परंतु वेळीच थोड्याशा खेळकर पद्धतीने व कमी वयापासून केलेले मार्गदर्शन फार उपयोगात येते. म्हणून चांगल्या सवयीची आवड मुलांना वय वर्ष २ पासून त्यांच्या परीने लावावी.

ब) पालकांचे अनुकरण 
चांगल्या सवयीचा आग्रह धरण्यापेक्षा आपल्या स्वतःमध्ये चांगल्या सवयी लावणे आवश्यक आहेत. कारण मुले हे पालकांचे अनुकरण करीत असतात.
Remember- Children Learn from your actions, not from speech.

क) काही नियम कडक करावेत :
आपण स्वतः पालन करुन काही नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करुन घ्यावी ते नियम खरोखर तेवढेच महत्वाचे असावेत. अशा नियमांचा सक्तीने आग्रह केल्यास मुले हळूहळू शिकु शकतात. उदा. दररोज दात घासणे, दररोज स्नान करणे, उलट न बोलणे 
Remember-Golden rule- Make sure your family follows the rules set for your children 

ड) स्वतः त्यांच्या सोबत करणे :
चांगल्या सवयी मुलांना लावण्यासाठी स्वतः त्यांच्या सोबत करावे व खेळता खेळता त्यांच्याकडून करुनही घ्यावे. मुलांना तसे करण्यात आनंद वाटेल व एक खेळ समजून आत्मसात करतील. उदा. स्नान करतांना आपल्या मुलाला आपल्या सोबत स्नान करण्यासाठी घ्यावे. रात्रीच्या वेळी कंटाळा येतो म्हणून स्वतः त्यांच्या सोबत ब्रश केल्यास मुलांना आनंद मिळतो.
Remember- Enjoy the parenting moment by giving quality time 

इ) प्रोत्साहन :
वरील प्रमाणे जेंव्हा आपण मुलांना चांगल्यासवयी लावतो, तेव्हा मुले ते आवलंब सुद्धा करतात. अवलंब करण्याच्या प्रयत्नापासून ते पूर्ण करेपर्यंत मुलांना सकारात्मक प्रोत्साहन द्यावे. प्रोत्साहन देतांना खोटी स्तुती करु नये किंवा न केलेले काम केले आहे असे सांगु नये.
Remember-Your words as parents are like Bhagwat Gita words in early childhood

🔸 चांगल्या सवयी 
i) आपल्या घरातील पूर्ण वेळापत्रकाचे योग्य नियोजन करावे. यामध्ये सकाळी उठण्याची वेळ, जेवणाच्या वेळा, खे वेळ, झोपण्याची वेळ नियोजीत करावी.
ii) दररोज सकाळी उठल्यावर व रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करणे.
iii) दररोज सकाळी नियोजित व्यायाम करणे.
iv) दररोज सकाळी स्नान करणे.
v) स्नान करण्यापुर्वी नास्ता, जेवण न करणे.
vi) प्रत्येक जेवणापुर्वी हात स्वच्छ धुणे.
vii) आठवड्यात एकदा नखे कापणे.
viii) नियमित अभ्यासाची व वाचनाची सवय लावणे.
ix) जेवणामध्ये विविध प्रकारचे अन्न सेवन करणे.
X) आपले संभाषण मधुर व नम्र असणे.
(xi) आपल्या आवाजामध्ये करण्याची सवय असणे. मधुरता, चेहऱ्यावर स्मित व अभिवादन
xii) झोपण्याची वेळ निश्चित करुन सहा ते आठ तास पूर्ण झोप घेणे. अशाप्रकारच्या चांगल्या सवयी मुलांना लावाव्यात. आपल्या घरातील जे वैयक्तिक नियम असतात त्यांचे सुद्ध मार्गदर्शन मुलांना या वयापासूनच करावे.
Remember- Good habits cultivated in early childhood are strong for the rest of their life.

🙏🏻🙏🏻🙏🏻 Please write your comment on your comment box and share with your near & dear.

 *If you wish to receive such articles or videos, send Hi message on WhatsApp number 8888126037* 
Join us on 
*Youtube- Dr Ashish Agrawal* 
*Instagram- drgunjan12* 
*Facebook- Ishwar multispecality* 

👍 Dr Ashish Agrawal, Child specialist & expert in parenting, education & behaviour problems.
👍 Dr Gunjan Agrawal, Dental surgeon.

Comments

Popular posts from this blog

मैंने खूब पढ़ाई की लेकिन रिजल्ट नहीं मिला (छात्रों के लिए उपयोगी)

हसत-खेळत बालविकास; पालकांची भूमिका

Life lesson; Stop comparing yourself with others