मुलांची इतरांसोबत केलेली तुलन{Comparison between children}; बाल संस्कार या पुस्तकातील लेख

मुलांची इतरांसोबत केलेली तुलना 
-------------------------------------------

मुलांना अस्वीकृत वाटण्याचे एक कारण म्हणजे आई-वडिलांकडून मुलांना इतरांशी तुलना करुन कमी लेखणे होय.
Remember- Don't compare your child with others, That's the battle you can never win
मध्ये कोणतीही दोन मुले एकसारखी नसतात. त्या भिन्न मुलांना एकदुसऱ्याशी तुलना करणे म्हणजे त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे होईल. तुलना करणे हे आपल्याकडे फार लवकर व सामान्यपणे होत असते. जसे लहान मुल नऊ दहा महिन्याचे झाल्याबरोबर मित्राचा मुलगा तर चालत आहे मग आपला का चालत नाही? अशाप्रकारची चर्चा चालण्यावरून, खाण्यावरून, बोलण्यावरून आपल्या घरामध्ये सुरू होते. तुलना करताना ज्या व्यक्तीला कमी लेखले जाते त्या व्यक्तीवर त्याचे फार विपरीत परिणाम होतात.
▪️एक छोटेसे उदाहरण देतो... कल्पना करा की जेवण करीत सर्व जण बसले आहेत. तुमच्या पत्नीने अगदी मन लाऊन चांगला स्वयंपाक केला व जेवण करतांना तुम्ही म्हणालात, "देशपांडेच्या घरी वांग्याची भाजी होते तशी तुला जमतच नाही...!" तुमच्या पत्नीची काय प्रतिक्रिया मिळेल याची कल्पनाच न केलेली बरी! स्वभावानुसार बोलणी, शिव्या किंवा मार खावा लागेल. तुमची पत्नी तुलना केलेली सहन करीत नाही तर मुलांना कसे सहन होईल ? फक्त ते उलट उत्तर देत नाहीत म्हणून आपल्यापर्यंत त्यांच्या भावना पोहचत नाहीत. परंतु त्याचे विपरीत परिणाम म्हणजे पालकांपासून मुलांच्या मनात अस्वीकृती निर्माण होते. आपल्या पाहण्यात असेल की, निकालाच्या दिवशी मुलांसोबत वडील शाळेत जातात. मुले निकाल मिळाल्यानंतर वडिलांना गुणपत्रिका दाखवतात. वडील त्याच्या गुणपत्रिकेत असलेल्या चांगल्या गुणाबद्दल चर्चा न करता इतरांच्या मुलांना जास्त गुण कसे मिळाले यासाठी मुलांवर रागावतात.
Remember- Constant comparing with others children is like emotions torcher.
🔺 आपण काय करावे 
i) आपण आपल्या मुलाला एकमेव व्यक्तीमत्व म्हणुन समजावे. प्रत्येक व्यक्तीमत्वाला त्याचे स्वतःचे वेगळे गुणधर्म असतात. त्यामुळे लहान मुलाला सुध्दा इतरांपेक्षा वेगळे समजुन त्यानुसार त्याचे संगोपन व विकास करावा. एकदा एका पालकांनी (त्यांच्या मुलाच्या तक्रारीसंबंधी दरम्यान) मला प्रश्न विचारला होता. दिनेश कांबळे हे त्यांचे नाव व ते एक शिक्षक होते. त्यांनी विचारले की मी माझ्या दोन्ही मुलांना तंतोतंत एकसारखी वागणुक व सुविधा दिल्या असतांना माझा लहान मुलगा मागे का राहतो? मी तर काही तुलना किंवा कमी जास्त देत नाही? मुलाखती त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मी त्यांना सांगीतले की एकसारखी वागणुक देणे हीच आपली चुक झाली आहे. त्याचे कारण प्रत्येक मुलाचे स्वतंत्र व्यक्तीमत्व असते. आपण त्याला त्यानुसार वागणुक दिल्यास त्याचा योग्यपणे 'विकास होऊ शकतो.
ii) जगामध्ये कोणीही पुर्णपणे सर्वगुण संपन्न नसतो. इतराशी तुलना करण्याशिवाय जे चांगले आहे त्याचे कोतुक करुन प्रोत्साहन द्यावे. ज्या ठिकाणी आपला मुलगा कमी पडत आहे त्याठिकाणी चुका निदर्शनात आणून पुढच्यावेळी कशाप्रकारे 'सुधारणा करता येईल याबद्दल मार्गदर्शन करावे.
iii) पालकांना कितीही सांगितले तरी वेळप्रसंगी तुलना करण्याचा मोह आवरत नाही. अशा पालकानी तुलना करावी पण ती तुलना मुलाला प्रोत्साहन देणारी असावी.
▪️उदा. समजा आपल्या मुलाला इंग्रजीमध्ये ६० गुण व गणितामध्ये ८५ गुण मिळाले असतील व त्याच्या मित्राला इंग्रजीमध्ये ८८ व गणितामध्ये ६२ गुण मिळाले असतील तर आपल्या मुलाला सांगाताना असे सांगावे की तुला गणित विषय चांगला अभ्यास करता येतो व इंग्रजी तुझ्या मित्राची चांगली आहे. दोघेही एक दुसऱ्या सोबत चर्चा करुन आपापल्या उणीवा समजून घ्या. एकदुसऱ्याच्या मदतीने जर असे शक्य झाले तर तुम्ही दोघेही दोन्ही विषयात पुढच्या वेळी चांगले गुण मिळवु शकता. याप्रमाणे चर्चा केल्यास मुलगा पुढच्यावेळी सुधारणा करण्यासाठी निश्चित तयार होईल. म्हणून तुलना करणे टाळावे व केल्यास ती प्रोत्साहन देणारी असावी.
Remember- Self comparison is the best form of motivating your child.

🙏🏻🙏🏻🙏🏻 Please write your comment on your comment box and share with your near & dear.

 *If you wish to receive such articles or videos, send Hi message on WhatsApp number 8888126037* 
Join us on 
*Youtube- Dr Ashish Agrawal* 
*Instagram- drgunjan12* 
*Facebook- Ishwar multispecality* 

👍 Dr Ashish Agrawal, Child specialist & expert in parenting, education & behaviour problems.
👍 Dr Gunjan Agrawal, Dental surgeon.

Comments

Popular posts from this blog

मैंने खूब पढ़ाई की लेकिन रिजल्ट नहीं मिला (छात्रों के लिए उपयोगी)

हसत-खेळत बालविकास; पालकांची भूमिका

Life lesson; Stop comparing yourself with others