शालेय जीवनात खेळामुळे मुलांना एकूण व्यक्तिमत्त्व विकसित होण्यास आणि उच्च शिक्षणात चांगली कामगिरी करण्यास मदत होते
शालेय जीवनात खेळामुळे मुलांना एकूण व्यक्तिमत्त्व विकसित होण्यास आणि उच्च शिक्षणात चांगली कामगिरी करण्यास मदत होते.
दोन जुन्या मित्रांच्या चर्चेमध्ये लहानपणीच्या आठवणी निघाल्या तर खेळलेल्या खेळाचा, आनंदाचा किंवा भांडणाचा विषय हामखास चर्चीला जातो. चिरकाळ आठवण ठेवण्याची व इतरांसमोर चर्चा करण्याची शक्ती खेळामध्ये आहे. खेळ हे एक उत्तम प्रकारचे टॉनीक आहे, ज्यामुळे तात्पूर्ती चेतना व अनुभवातून आयुष्यभरासाठी शिकवण मिळत असते. एखादा लहान मुलगा जर उदास, खिन्न झाला असेल तर दोन तासाच्या खेळानंतर तो अगदी आनंदी होऊ शकतो. एका विशिष्ट प्रकारचा खेळ शिकणे व सराव करणे उत्तम आहे पण त्यासोबत आपल्या कॉलनीमध्ये खेळलेल्या खेळांचे सुध्दा खुप महत्व आहे. मुले खेळत असलेल्या खेळामुळे त्यांना भरपूर विकास होत असतो. आपल्याकडे नेहमी खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट या खेळाबद्दल चर्चा करून होणारे सर्वप्रकारचे विकास स्पष्ट करण्याचा मी प्रयत्न केला आहे.
Remember- Playing during childhood makes a person mentally more stronger than who play little.
अ) शारीरीक विकास : क्रिकेट खेळत असताना बटींग, बोलींग, फिल्डींग या तिनही प्रक्रियांमधून मुलांचा व्यायाम होतो. मुलांच्या प्रत्येक स्नायुचा भरपुर व्यायाम झाल्यामुळे त्याची सुदृढता वाढते व मुले निरोगी राहतात. मुलाचा शारीरीक विकास योग्यपणे झाल्यामुळे पुढील आयुष्यात निरोगी व आकर्षक शरीर प्रकृती असलेले व्यक्तीमत्व ठरते.
ब) सामाजीक विकास क्रिकेट खेळताना मुलांना त्यांच्या व इतरांच्या टिममधील मुलांशी जुळवुण घेणे, वाटाघाटी करून बॅटींग बॉलींग करणे, टिम तयार करणे, टिमची एकता टिकवणे इ. उपक्रम करावे लागतात. हे सर्व करत असताना वेगवेगळया स्वभावाच्या व्यक्तींना कसे हाताळावे व आपले संबंध इतरांशी कशाप्रकारे चांगले ठेवावे हे मुले शिकत असतात.
क) वैचारीक क्षमता : मुले क्रिकेट खेळत असताना त्यांच्यासमोर नेहमी निरनिराळी परिस्थीती निर्माण होत असते. या परिस्थीतीवर मात करण्यासाठी मुलांना खुप विचार करावा लागतो जसे- समोरील टिम जिंकण्याच्या परिस्थीतीत असेल तर त्यांच्यावर विजय मिळविण्यासाठी त्याच्या उणीवांचा विचार करून खेळणे (उदा. वेगात बॉलींग टाकणे).
ड) सकारात्मक दृष्टीकोन: नेहमी खेळणाऱ्या मुलांमध्ये सकारात्मक दृष्टीकोन वाढतो. मुले खेळामध्ये हारत असताना थोडयाशा प्रयत्नाने जर जिंकले तर कोणत्याही वेळी आपल्या मनाप्रमाणे परिस्थीती बदलु शकते याबद्दल मुलांचा विश्वास वाढतो. अशा नेहमी मिळणाऱ्या विविध अनुभवातुन मुलांमध्ये सकारात्मक दृष्टीकोन म्हणजेच 'हारी बाजी को जितने का दम' वाढतो.
इ) मनोबल वाढते : खेळ खेळताना मुलांमध्ये कधी कधी हारण्याची सुध्दा वेळ येते. हारल्यानंतर आपली हार स्वीकार करण्याचा अनुभव मुलांना मिळतो. वारंवार मिळालेल्या या अनुभवातुन मुले हार पचवून परत नव्या जोमाने खेळायला शिकतात. जीवनामध्ये हार पचवून परत वाटचाल करता येणे वाला अनन्य साधारण महत्त्व आहे.
ई) भावनीक संस्कार मुले खेळ खेळतात म्हणजे नैसर्गीकरित्या हसता हसता एक युध्द खेळत असतात. या युध्दामध्ये विविध प्रकारचे भावनीक प्रसंग मुलांच्या समोर येतात. सर्व प्रकारच्या भावना म्हणजे दुःख, आनंद, रोग, भीती, चिंता यांचा अनुभव मुले स्वतः घेतात. त्याचप्रमाणे इतरांच्या या भावना कशा हाताळाव्यात हे सुध्दा मुले इथेच शिकतात. थोडक्यात खेळामुळे सर्वप्रकारचे भावनीक संस्कार मुलांमध्ये होत असतात.
उ) नैतिक विकास :- - मुले खेळ खेळत असताना त्याना विविध प्रकारचे अनुभव येत असतात. खेळ कोणताही असो त्याचे नियम ठरलेले असतातच. नियम असून सुध्दा एखादा मुलगा नियम तोडून खेळायला पाहतो. त्याला त्यावेळी इतरांकडून विरोधही केला जातो. या घटनेतुन नियमबध्द पध्दतीने काम करायला हवे अशी शिकवण मिळते व नैतीक नियमांचे महत्व मुलांना समजते.
ऊ) खेळाचा औषधी उपयोग कोणत्याही वयामध्ये खेळ औषधाप्रमाणे काम करते. मानसीक आजार, तणाव दूर करण्यासाठी व शारीरीक चपळता संपादन करण्यासाठी औषध म्हणुन उपयोगात येते.
ए) शैक्षणीक विकास मुले खेळत असताना खेळणीच्या विविध रंग, आकार, वजन, पोत याबद्दलचे ज्ञान मिळते. मुलांमध्ये खेळताना होत असलेल्या चर्चेमुळे सामान्यज्ञान वाढते. खेळामध्ये कल्पना शक्तीला चालना मिळते. खेळ जर बौध्दीक कोडयांचे असतील तर बौध्दीक विकास होतो. खेळामध्ये दिसत असलेल्या सामान्य भौतीक नियमांचा अभ्यास व माहिती मुलांना होते जसे चेंडू खेळताना गुरूत्वाकर्षणाचे महत्व (न्युटनचा नियम) मुलांना शिकायला मिळते.
Remember- Play time is not only recreational activity or fun time, actually it is time to think, learn problem solving skill & increase memory"
🙏🏻🙏🏻🙏🏻 Please write your comment on your comment box and share with your near & dear.
*If you wish to receive such articles or videos, send Hi message on WhatsApp number 8888126037*
Join us on
*Youtube- Dr Ashish Agrawal*
*Instagram- drgunjan12*
*Facebook- Ishwar multispecality*
👍 Dr Ashish Agrawal, Child specialist & expert in parenting, education & behaviour problems.
👍 Dr Gunjan Agrawal, Dental surgeon.
Comments
Post a Comment