मुलांच्या मनाप्रमाणे वागणारे पालक; बाल संस्कार या पुस्तकातील लेख
मुलांच्या मनाप्रमाणे वागणारे पालक
मुलांच्या मनाप्रमाणे वागणारे पालक हे मुलांवर असलेल्या प्रेम व मोहामुळे त्यांच्याविरध्द जाणे पसंत करीत नाहीत. मुळतः अशा घरांमध्ये नियम व शिस्त याबद्दल मर्यादा निश्चीत नसतात. मुलांना भरपूर प्रेम हे पालक दाखवत असतात, परंतु चुकीच्या ठिकाणी व वाईट वर्तणुकीला थांबवत नसतात. अशाप्रकारच्या लाड व प्रेमामुळे मुलांना कठीण समस्या, प्रसंग, चुक किंवा बरोबर याचा अनुभव कधीच मिळत नाही. या प्रकारचे वातावरण सहसा एकत्रीत कुटूंब पध्दती असलेल्या घरांमध्ये असते.
अ) परिणाम :
i) अशा पालकांची मुले योग्य व अयोग्य कोणते या बद्दल अनभिज्ञ असतात.
ii) या वातावरणातील मुलांच्या इच्छा फार मोठ्या असतात तसेच मोठया वयामध्ये ही मुले इतरांकडून खुप जास्त अपेक्षा ठेवणारी होतात.
iii) अशा वातावरणातील मुले मोठी झाल्यावर स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी इतरांना उपद्रव देणारी होतात. तसेच वेळप्रसंगी स्वतःच्या इच्छेसाठी आई-वडिलांना दुर सुध्दा करू शकतात.
Remember- Just because we struggled in our childhood or have only child, it doesn't mean we offer things out of proportion to make them arrogant & careless.
ब) आपण काय करावे ?
i) अशाप्रकारचे वातावरण ज्या घरांमध्ये आहे तेथील पालकांनी मुलांना प्रेम देत रहावे. प्रेम देत असताना चुक झाल्यावर किंवा बेशीस्तपणाला कडकपणे वागावे. मुलांना योग्य व अयोग्य याबद्दल समजण्यासाठी नियमित चर्चा करावी.
ii) एकत्रित कुटुंब व्यवस्था ही मुलांच्या विकासासाठी महत्वपूर्ण बाब आहे. आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती आपले प्रेम त्यांच्या छोट्या-छोट्या नातवंडाना देण्याचा किंवा व्यक्त करण्याच्या प्रयत्न करीत असतात. आपल्या आयुष्याच्या अखेरच्या दिवसांमध्ये आनंदी व प्रेमळ वातावरणात राहण्याची त्यांची इच्छा असते. अशावेळी त्यांना कडक वागा (मुलांच्या शिस्तीसाठी) असे म्हणने चुकीचे आहे, परंतु आपण स्वतः आपल्या निर्णयावर ठाम असावे.
आपल्या निर्णयावर ठाम असताना आपण आपल्या आई-वडिलांसोबत चर्चा करावी. आजी-आजोबांनी लाड आवश्य करावा पण शिस्त लागणे है। सुद्धा महत्वाचे आहे असे सांगावे. ज्या मुद्यावर शिस्त लावायची आहे. त्या मुद्याला व शिस्तीला न खोडतासुद्धा प्रेम व्यक्त करता येते, हे पटवून द्यावे.. उदाहरणार्थ मुलाचा व आईचा शिस्तीसाठी तणाव असेल. अशावेळी मुलासोबत त्याविषयाव्यक्तिरिक्त इतर पद्धतीने प्रेम दर्शवता येते जसे बाहेर फिरायला नेणे, खेळणे इ. असे समजून सांगावे. आईला आपला निर्णय बदलण्यासाठी भाग पाडायला लावू नये अशी विनंती करावी उदा. एखादेवेळी मुलगा टिव्ही पाहण्यासाठी हट्ट करीत असेल व आई त्याला टिव्ही ऐवजी अभ्यासासाठी सांगत असेल तर काही घरांमध्ये आजोबा आईला रागवून मुलाला टिव्ही पाहण्यासाठी परवानगी देतात. यावेळी आजोबांचे प्रेम व मुलाचा हट्ट दोघांचा विजय होतो पण मुलावर वाईट परिणाम होऊन शिस्त लागत नाही. अशावेळी आजोबांनी इतर प्रकारे प्रेम दर्शवावे, अशी विनंती करावी.
Remember- Teach your child to know the difference between a Want & Need.
🙏🏻🙏🏻🙏🏻 Please write your comment on your comment box and share with your near & dear.
*If you wish to receive such articles or videos, send Hi message on WhatsApp number 8888126037*
Join us on
*Youtube- Dr Ashish Agrawal*
*Instagram- drgunjan12*
*Facebook- Ishwar multispecality*
👍 Dr Ashish Agrawal, Child specialist & expert in parenting, education & behaviour problems.
👍 Dr Gunjan Agrawal, Dental surgeon.
Comments
Post a Comment