भावंडातील भांडणे मुलांमध्ये ; पालकांची भूमिका{बाल संस्कार या पुस्तकातील लेख}
भावंडातील भांडणे मुलांमध्ये ; पालकांची भूमिका
--------------------------------------------------------------
दोन भावंडांमध्ये भांडणे होणे ही प्रत्येक घरातील सामान्यपणे आढळणारी घटना आहे. भावंडांतील भांडणे सख्या भावांमध्ये असतात त्याचप्रमाणे चुलत भावा-बहीनी मध्येही घडत असतात.
आम्ही राहत असलेल्या कॉलनीमध्ये आमच्या शेजारचे कुटूंब एकत्रीत पध्दतीचे आहे. मागच्या आuठवड्यामध्ये एक घटना त्यांच्या घरी झाली. दोन्ही भावांची मुले एकत्र खेळतात, भांडतात परत खेळतात पण त्यादिवशी थोडे जास्तच झाले. दोघा चुलत मुलांमध्ये एका कार (खेळणी) वरून भांडण जुंपले!, दोघेही एक दुसऱ्याला भांडू लागले व मारूही लागले. तेवढ्यात एका मुलाच्या आईने मध्यस्ती करून भांडणे सोडविली पण दुसऱ्या मुलावर ओरडू रागावू लागली. त्याचवेळी दुसऱ्या मुलाच्या आईने घाई-घाईने प्रवेश केला व आपल्या मुलाला जवळ घेऊन पहिल्यावर ओरडायला सुरूवात केली. पाहता पाहता मुलांना बाजुला ठेवून दोन्ही मातांमध्येच भांडणाचा रंग चढू लागला. या दोघींचे भांडण इतक्या कडाक्याचे होते की त्यांचे नवरेही भांडणात उतरले. शेजार धर्म म्हणुन आम्ही दोघे तिघे तिथे पोहचलो. वाद शांत केला त्यावेळी दोघी मातांचा राग शांत होण्याआधी ते दोघेही मुले कॅरम खेळू लागली. कोणाचे तरी मुलांकडे लक्ष गेले व तो म्हणाला, "पहा आपण भांडत आहोत व ती मुले मात्र मस्त खेळत आहेत" अशा वातावरणात सुध्दा हसण्यावर कोणालाही ताबा मिळवता आला नाही..
वरील घटनेमध्ये चुलत भावंडे होती. पण काही ठिकाणी सख्या भावंडाच्या भांडणामध्ये आई-वडिल भांडून घेतात. भावंडातील भांडणे हा फार सामान्य प्रकार आहे. आपण जसे मोठे होऊ तसे हा प्रकार कमी होत जातो.
आपल्या बहीण भावासोबत लहानपणीच्या गोष्टी केल्या तर आपल्याला अपसातील भांडणाची आठवण हमखास होते. त्यावेळची कारणे खेळणी, चॉकलेट इ. आठवले तर खूप हसु सुध्दा येते.... बोलताना इतक्या सहजपणे हसत हसत बोलण्याचा हा विषय असला तरी भांडणे होताना पाहणे, समजावणे, सोडवणे, थांबवणे अतिशय कठीण असते. कधी कधी तर चीड व निराशा येते.
Remember- Siblings fight in early childhood is good memories for their future.
🔸 भावंडातील भांडणाचा मुलांना उपयोग
• मुले दुसऱ्या मुलांसोबत जुळवून घ्यायला शिकतात.
• स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकतात.
• त्याचप्रमाणे भांडणाची परिस्थिती हाताळणेही शिकतात.
Remember- It is a sibling fight which teaches a person how to get along with anyone
🔸 भांडणाची कारणे
i) प्रत्येक व्यक्तीला सभोवतालच्या सर्व लोकांवर आपली हुकूमत असावी ही एक नैसर्गीकरित्या उत्पन्न झालेली इच्छा असते. त्याचप्रमाणे मुलाना सुध्दा आपल्या भावंडांवर स्वतःचे नियंत्रण आवडते. अशा नियंत्रणाने स्वतःला जास्तीत जास्त फायदा मिळावा अशी त्यांची इच्छा असते.
ii) दोन भावडांमध्ये भाडणे होण्याचे दुसरे कारण एखादा फारच हुशार असतो तर दुसरा मध्यम प्रकारचा असतो.
(iii) काही घरांमध्ये आई-वडील दोन मुलांमध्ये तुलनात्मक व्यवहार करतात. त्यांच्या केलेल्या तुलनेमुळे ज्या मुलाला जवळीकता मिळते. त्याच्याबद्दल दुसऱ्या मुलाला व्देष निर्माण होऊ शकतो. यामुळे सुध्दा दोघांमध्ये भांडणे होतात जाते.
(iv) काही घरामध्ये नैसर्गिक मुद्यांना पुढे ठेवून जवळीकता साधली
▪️जसे : लिंगभेद : सामान्यपणे मुलगा आईला व मुलगी वडीलांची लाडकी असते यामुळे बहिण-भाऊ भांडणे करू शकतात.
▪️वय : सामान्यपणे लहान मुलाला मोकळीक देऊन मोठया मुलाला रागावले जाते किंवा तडजोड करावी लागते. यामुळे दोघांमध्ये अंतर निर्माण होते.
v) पालकांचे अनुकरण : पालक ज्याप्रमाणे वागतात त्याचप्रमाणे मुलेही शिकतात. आई-वडील आपल्या समोरील समस्या, दोघांतील वाद, तडजोड कशी हाताळतात ते मुले सुध्दा अनुकरण करीत असतात.
Remember- "When you have first kid, you become parent and on second kid, you become umpire'
🔸 आपण काय करावे ?
i) दोघा भावडांमध्ये तुलना करू नये : "मला लक्ष्मीचं कळत नाही ती एवढी मागे कशी? प्रसन्ना तर तीच्या वयामध्ये स्वतः बुटांची लेस बांधत होता!" अशाप्रकारचे वाक्य नेहमी सर्व घरांमध्ये ऐकायला मिळतात. म्हणजे प्रत्येक आई-वडिल दोन्ही मुलांमध्ये नेहमी तुलना करीत असतात. पालकांचा तुलनात्मक दृष्टीकोण या विषयावर विस्तृत चर्चा याच पुस्तकात उपलब्ध आहे.
ii) वर्तणुकीबद्दलचे मुलभूत नियम ठरवावेत : आपल्या घरामध्ये मुलांसाठी काही मुलभूत नियम ठरवावेत. त्यांची ठामपणे अमलबजावणीसुध्दा करून घ्यावी. जसे मोठ्या भावाला नावाने न बोलणे, शिव्यांचा वापर न करणे, मारामारी न करणे इ. अशाप्रकारचे ठरवलेले नियम कोणत्याही परिस्थीतीत तोड़ नये याबद्दल ताकीद द्यावी. एखादेवेळी नियम तोडण्याबद्दल शिक्षा द्यावी. असे केल्यावर मुले गैरवर्तणुक न करता तडजोड करून मार्ग काढायला व भांडणे मिटवायला शिकतील.
iii) दोन्ही मुलांना सारखे योगदान देऊ नये : काही पालकांमध्ये दोन्ही मुलांना एक सारखे ठेवण्याची सवय असते. तेवढेच कपडे, तशीच खेळणी, एकसारखेच खेळाचे क्लासेस इ. परंतु दोन्ही मुलांची आवश्यकता ही वेगवेगळी असू शकते. दोन्ही मुलांच्या आवडी व अपेक्षा भिन्न असतात. त्यामुळे पालकांनी दोन्ही मुलांसोबत त्यांची आवश्यकता व आवड यांचा विचार करून निर्णय घ्यावेत. तसेच एखादेवेळी एखादयाला मिळणे व एखादयाला न मिळणे अशी परिस्थिती निर्माण झाली तर न मिळता कसे सहन करावे व निराशा कशी हाताळावी याचा अनुभव मुलांना मिळतो. आपण याकडे लक्ष ठेवावे की वर्षाअखेरीस दोघांनाही समान न्याय मिळावा.
▪️जसे दिवाळी सारख्या मोठ्या खरेदीच्या वेळी जर मोठ्या मुलाकडे चांगले तिन ड्रेस व लहानाकडे चांगले दोन ड्रेस असतील तर मोठयाला दोन व लहान मुलाला तीन ड्रेस विकत घ्यावेत
iv) देवाण-घेवाणीची शिकवण द्यावी : आपल्या मुलांना आपली वस्तु एक दुसऱ्याला देण्या-घेण्याची शिकवण द्यावी. एक दुसऱ्याला दिल्यामुळे काय आनंद मिळतो? व दुसऱ्यासांठी केलेल्या त्यागाबद्दल परमेश्वर कसे फळ देतो याबद्दल माहिती द्यावी.
▪️जसे टिव्ही पाहताना आपआपल्या आवडीचे चॅनल्स पाहण्यासाठी ठरलेली वेळ दोघांना वाटून द्यावी. तसेच दोघांच्या आवडीचे चॅनल्स ठरवून व त्यानुसार वेळ निश्चित करुन एकत्रितपणे पाहिल्यास किती आनंद याचा अनुभव मुलांना द्यावा.
v) भांडणामध्ये पडू नये आपली दोन मुले जेव्हा भांडत असतात : तेव्हा शक्य तेवढे त्यांच्या भांडणात पडू नये. त्यांची भांडणे त्यांना आपसातच सोडवू द्यावीत. वरील वाक्य ऐकताना छान वाटणारे आहे पण प्रत्यक्षीकरीत्या फार कठीण जाते. जोपर्यंत शारीरीक नुकसान होण्याची भीती नाही तोपर्यंत आपण दुरूनच निरीक्षण करावे. जर आपण वारंवार भांडणात पडू लागलो तर आई-वडिलांच्या मदतीने भांडण सोडविण्याची सवय मुलांना लागते. तसेच भांडणे मिटविण्याची कला मुलांना शिकता येत नाही. दुसरी एक शक्यता अशी असते की त्यापैकी एका मुलाची भावना अशी तयार होते की "मम्मी आपली बाजु घेत नाही तर दुसऱ्याचा लाड करते." वेळप्रसंगी जरी आपण मांडण सोडायला गेलो तरी आपण मार्ग काढू नये. आपल्या मुलाना त्यातुन मार्ग शोधण्यासाठी मदत करावी.
Remember- 'Do not solve problem for children, Help them to solve own problem"
vi) चुकीबद्दल चर्चा करू नये आपण मुलांचे भांडण झाल्यावर चुक कोणाची होती याबद्दल चर्चा करू नये. जेव्हा केव्हा भांडण होते तेव्हा चुक दोघांचीही असते. कोणी व काय चुक केली हे शोधण्यापेक्षा कोणी चुकीची वर्तणुक केली? या बद्दल बोलावे.
(vii) चुकीच्या वर्तणुकीबद्दल बोलावे : दोघा भावंडाच्या भांडणामुळे निर्माण झालेला राग दाबण्याचा प्रयत्न करु नये किंवा रागाबद्दल चिडू नये कारण भावनीक विचलन हे नैसर्गीक असते. यावेळी आपण त्याचा राग ओळखुन त्याला आपण सहमत असल्याचे दर्शवावे. 'मला माहीत आहे तू फार रागात आहेस. तुला तुझ्या भावाचा खुप राग आलेला आहे. पण यावेळी तू त्याला मारू शकत नाहीस' अशा प्रकारे चर्चा करून शांत करावे. असे केल्याने या भावनेला राग म्हणतात व त्याचे नियंत्रण कसे करावे हे शिकायला मिळते. राग व इतर भावनाविषयी व त्यांच्या नियंत्रणाविषयी विस्तृत माहिती आपल्या बालविकास-४ या पुस्तकात उपलब्ध आहे.
viii) सहकुटूंब चर्चासत्र घ्यावे : आपल्या घरामध्ये जर एखादेवेळी खुप मोठे भांडण किंवा अतिजास्त गैरवर्तणुक मुलाने केली असेल तर सर्व कुटूंबाची रविवारी बैठक घेऊन केलेल्या गैरवर्तणुकीबद्दल कडक सुचना द्यावी व निषेध व्यक्त करावा.
🙏🏻🙏🏻🙏🏻 Please write your comment on your comment box and share with your near & dear.
*If you wish to receive such articles or videos, send Hi message on WhatsApp number 8888126037*
Join us on
*Youtube- Dr Ashish Agrawal*
*Instagram- drgunjan12*
*Facebook- Ishwar multispecality*
👍 Dr Ashish Agrawal, Child specialist & expert in parenting, education & behaviour problems.
👍 Dr Gunjan Agrawal, Dental surgeon.
Comments
Post a Comment