प्रशंसा व प्रोत्साहन; प्रत्येक पालकाने ते करायलाच हवे {बाल संस्कार पुस्तकातील लेख}
प्रशंसा व प्रोत्साहन; पालकत्वाचे सार
---------------------------------------------
श्री रमेश बॅनर्जी कोलकाता येथील एक सुप्रसिध्द चित्रकार यांची रेल्वमध्ये अचानक भेट झाली होती. त्यांच्यासोबत त्यांना चित्रकलेची आवड कशी निर्माण झाली यावर चर्चा सुरू होती, त्यावेळी त्यांनी एक घटना सांगीतली ती ऐकून मला आश्चर्य वाटले.
▪️घटना : ते जेव्हा अंदाजे आठ वर्षांचे असतील तेव्हा एका दिवशी त्यांची आई त्यांना मोठ्या बहिणीसोबत घरी सोडुन बाहेर गेली. अभ्यासामध्ये व्यस्त असताना छोट्या रमेशला काही रंगाच्या बाटल्या त्याठिकाणी आढळल्या. त्या रंगाच्या बाटलीतुन त्याने पुर्ण स्वयंपाकघराच्या भिंती वेड्यावाकड्या रेषा काडून रंगवून टाकल्या. थोड्यावेळाने आई घरी परत आली तेव्हा रमेशचा आवतार व भिंती पाहून स्तब्ध झाली. काही क्षण विचार करताना रमेश मात्र फार घाबरून गेला होता. पण लगेच आईने रमेशला मिठी मारून " Oh beta.excellent painting " असे उदगार काढले. रमेशची खूप प्रशंसा करून प्रोत्साहन दिले.
आईच्या आशा प्रोत्साहनामुळे वारंवार दिलेल्या प्रेरणेमु एक श्रेष्ठ चित्रकार म्हणून प्रसिद्ध झाले.
Remember- If child Lives with praise & encouragement, his self confidence will be high"
प्रत्येक व्यक्तीला प्रशंसा ही प्रिय असते. प्रशंसा केल्याने कामाचा उत्साह व यापेक्षा चांगले करण्याची जिद्द वाढत जाते. अशा प्रकारच्या प्रशंसा करण्याऱ्या पालकांची संख्या फार कमी आहे तर प्रशंसा न करता मुलाच्या चुकांवर टिका करणे, ओरडणे, सतत बोलणे अशा प्रकारचे पालक मोठ्या संख्येमध्ये उपलब्ध आहेत. ऑस्ट्रेलिया मध्ये झालेल्या एका सर्वेक्षणात पालकांना त्यांनी मुलांवर केलेल्या टिका व केलेली प्रशंसा मोजण्यासाठी सांगितले. सर्वेक्षणाचा कालावधी पुर्ण झाल्यावर असे निदर्शनास आले की, पालक मुलांची प्रशंसा करतात, पण त्यापेक्षा दहापटीने जास्त मुलांच्या चुका शोधणे, टिका करणे, रागावणे, ओरडणे करतात.
... कोणत्याही संबंधामध्ये चार वेळा केलेल्या प्रशंसेचे परिणाम
घालवण्यासाठी एक वेळची टिका पुरेशी आहे."
दैनंदिन जीवनामध्ये आपण पाहतो की कोणत्याही व्यक्तीला एखादेवेळी चुक दाखवली किंवा टिका केली तर ती व्यक्ती दुःखावते. हे दुःख काही वेळा आपसातले संबंध दुरावण्यास देखील कारणीभुत ठरते. आपण स्वतःचा विचार केल्यास आपल्या लक्षात येईल की एखाद्या नेहमी प्रशंसा करणाऱ्या मित्राने जर आपली चुक काढून रागावले तर आपण त्याने केलेल्या प्रशंसा विसरुन रागावलेले ब टिका केलेले लक्षात ठेवतो. एक दोन वेळा झाले तर त्या मित्राबद्दलचा आपला दृष्टीकोनही बदलतो. आपल्या बाबतीत जर असे होत असेल तर मुलांनी आपल्या वारंवार केलेल्या टिका व बोलणी कशा सहन कराव्यात? काही पालक असेही म्हणतात की 'वाह वा केल्याने मुले बिघडतात' पण मी म्हणतो की कोणत्याही मुलामध्ये हवी असलेली चांगली शिस्त पहावयाची इच्छा असेल तर प्रशंसा करुन प्रोत्साहन द्यावे कारण मुलांच्या भावनीक विकासासाठी प्रोत्साहन हे टॉनीकचे काम करते.
अ) प्रशंसा करण्याची पद्धत मुलांना प्रशंसा करताना त्यांना आपण जवळ घेणे, मिठी मारणे, हसऱ्या चेहऱ्याने डोळयामध्ये आनंद दर्शवणे असे करता येते. अशा प्रकारच्या देहबोलीतून किंवा त्याचवेळी मुलांची शाब्दीक प्रशंसा करावी जसे- वॉव, सुपर, सही रे, खुप छान, काय मस्त केलयं, काहीतरी वेगळं आहे, एक्सलंट, गुड, वेल डन, क्या बात है, निश्चित सुपर, फन्टास्टीक, नाईस वर्क इ.
Remember- Praise & correction of mistakes, both are important; Use them wisely
🔸 प्रशंसा करण्याची योग्य वेळ व पध्दत
i) मेहनतीची प्रशंसा करावी: विविध प्रकारच्या सर्वेक्षणातून असे निदर्शणात आले आहे की पालक फक्त मुलांनी मिळवलेल्या यशाचीच किंवा यश मिळाले तरच मुलांची प्रशंसा करतात. असे केल्यामुळे पुढे यश मिळण्याची क्यता जास्त असते. काही पालक यश न मिळविल्यास त्याने कितीही चांलगी हुनत घेतली असेल तरी त्याबद्दल शब्द उच्चारत नाहीत. यामुळे मुलांमध्ये नगंड निर्माण होऊ शकतो. जर मुलाने मेहनत करुन ही यश मिळाले नाही तर त्याच्या मेहनतीची प्रशंसा करून पुढे यश मिळविण्यास प्रोत्साहन द्यावे. असे केल्यामुळे पुढच्या वेळी मुल निराश न होता पहिले पेक्षा जास्त मेहनत करेल.
Remember- 'Praise the effort not result '
ii) चर्चात्मक स्वरुपात प्रशंसा करावी : श्री कैलास भाटिया माझा एक आप्तेष्ट लहान असताना नेहमी गणिताची प्रश्न व कोडे सोडवत असत. कैलासचे वडील शिक्षक असल्यामुळे नेहमी चर्चात्मक स्वरूपात प्रशंसा करून प्रोत्साहन देत होते. चर्चात्मक म्हणजे प्रशंसा करताना नेहमी त्यानी केलेल्या चुकांवर तसेच पुढे यापेक्षा काय चांगले करता येईल याबद्दल बोलत होते. त्यांच्या अशाप्रकारच्या प्रशंसेमुळे कैलासला आय. आय. टी. मध्ये प्रवेश मिळाला. आज कैलास एका नामांकीत कंपनीमध्ये सिंगापूर येथे सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणुन काम करीत आहे. अशा प्रकारची केलेली प्रशंसा व चर्चा मुलांना जीवनामध्ये भरघोस यश संपादन करून देते.
(iii) प्रत्येक छोटया छोटया सुधारणांची प्रशंसा करावी आपले मुल मोठे होत असताना त्याच्या चुका आपण सांगीतल्याप्रमाणे हळूहळू सुधारत असतात. चुकांमध्ये सुधारणा होत असताना ती सुधारणा आपल्यासाठी खुप महत्वाची नसेल तरी प्रशंसा करून प्रोत्साहन द्यायला हवे,
▪️जसे : समजा आपल्या मुलाला शाळेतुन आल्यावर आपले शुजसॉक्स योग्य ठिकाणी ठेवण्याची सवय नसेल. आपण त्याला वारंवार त्याबद्दल सांगीतल्यावर समजा तो कधी स्वतः ठेवत असेल आणि कधी आपण सांगीतल्यावर ठेवत असेल. अशावेळी जेव्हा त्याने मनाने स्वतः शुजसॉक्स व्यवस्थीत ठेवले तर प्रशंसा करण्यास विसरू नये..
Remember- If you want your child to improve Let them hear the nice thing'
iv) प्रशंसा करताना महत्व स्पष्ट करावे : आपण जेव्हा मुलांची प्रशंसा करतो त्यावेळी मुलांना प्रशंसा कशाबद्दल केली जात आहे हे समजायला हवे. ह्या केलेल्या चांगल्या कामाचे काय महत्व आहे हे सुध्दा मुलांना स्पष्ट करायला हवे..
▪️उदा. आपल्या मुलाची दररोज सकाळी शाळेत जाताना बॅग तयार करण्यासाठी धावपळ होत आहे. एका दिवशी मुलाने रात्री झोपताना बॅग तयार केली तर आपण फक्त अरे वा छान एवढे बोलून थांबू नये. असे केल्यामुळे त्याचा सकाळचा वेळ वाचला आणि होणारी धावपळ दुर झाली असे महत्व स्पष्ट करावे.
v) बक्षीस देण्याच्या स्वरुपामध्ये प्रशंसा करावी : वरील सर्वप्रकारे प्रशंसा करताना कधी कधी मुलांना बक्षीस सुध्दा द्यावे. हे बक्षीस पहीले ठरवण्यापेक्षा त्याने चांगले काम केल्यावर अचानकपणे ठरवावे व लगेच द्यावे. जसे। मुलाला बागेत नेणे, प्राणिसंग्रहालयात घेऊन जाणे, त्याला क्रिकेट बॅट हवी असेल अंतर घेऊन देणे इ. तसेच आपण एखादेवेळी मुलाला एखादया चांगल्या कामासाठी बक्षीस देण्याचे वचन दिले असेल तर त्याने चांगले काम केल्यावर आवश्य द्यावे व देण्यासाठी टाळाटाळ करू नये.
vi) एखाद्या विशिष्ट गुणावर खुप प्रशंसा करावी : प्रत्येक मुल कोणत्यातरी 'एखादया कलेमध्ये, गुणांमध्ये किंवा खेळामध्ये उत्साही असते. त्याच्या हया गुणांवर लक्ष ठेऊन विकसीत करावे. ज्यावेळी तो उत्कृष्टता संपादन करेल त्यावेळी त्याची भरपुर प्रशंसा करावी. असे केल्यामुळे तो त्या कलेमध्ये किंवा खेळांमध्ये पुढे जाईल तसेच इतर कला विकसीत करण्याचा प्रयत्न करेल. नैसर्गीकरित्या प्रशंसेची भुक वाढल्यामुळे इतर गोष्टी विकसीत करण्याची धडपड करून सर्वगुण संपन्न होईल.
Remember- When you compliment your child for results as well as efforts then they strive for higher goals.
🔸 पालकांनी असे करणे टाळावे :
i) अनियमित प्रशंसा : जर आपला टि.व्ही. रिमोट चालत नसेल आणि आपल्या आठ वर्षाच्या मुलाने तो काहीतरी करून चालु केला तर आपण त्याची खुप प्रशंसा करतो. समजा एखादेवेळी मोबाईल नादुरूस्त असताना त्याने काही प्रयत्न केला व मोबाईल जास्तच बिघडला तर आपण त्याच्यावर भरपुर रागावतो. असे होणे हे नैसर्गीक आहे. अशाप्रकारे विसंगतपणे मुलांसोबत वागणे टाळावे. त्यापेक्षा पहिल्यावेळेस मुलाने रिमोट दुरूस्त केल्यावर प्रशंसेसोबत काय धोका किंवा नुकसान होऊ शकते ? या बद्दल सुचना दयावी. यामुळे पुढच्यावेळी अशाप्रकारच्या मोल्यवान वस्तुंना हात लावताना मुल काळजीपुर्वक हाताळेल. अशा प्रकारच्या विसंगत प्रतिक्रियेमुळे योग्य व अयोग्य मुले समजु शकत नाहीत. त्यापेक्षा योग्य वेळी योग्य प्रतिक्रिया व प्रशंसा केल्याने मुलांचा उत्साह कमी होणार नाही.
ii) शारीरिक प्रशंसा : पालकांनी अशाप्रकारची कोणतीही प्रशंसा करू नये ज्यामध्ये मुलाची प्रत्यक्ष भुमीका नाही.
▪️जसे : "किती छान दिसतोस!"
“माझ्या मुलाचा ड्रेस किती सुंदर आहे"
“दिसायला गोरा आहे आजोबांवर गेलाय " अशा प्रकारच्या वाक्यामुळे मुलांवर कोणतेही उपयुक्त परिणाम होत नाहीत तसेच स्वतः काही करून प्रशंसा मिळविण्यासाठी जिद्द निर्माण होत नाही.
iii) अति जास्त प्रशंसा : मुलांची केव्हाही इतरांसमोर सततपणे किंवा अतिजास्त प्रशंसा करू नये. आपल्या असे करण्यामुळे मुले आपण काहीही केले तरी मम्मी आपल्यावर खुष असते. असा गैरसमज करून घेतात. त्याचा परिणाम मुलांमध्ये पहिलेपेक्षा मोठी किंवा नवीन कला हस्तगत करण्याचा उत्साह निर्माण होत नाही.
(iv) फक्त प्रशंसा करु नये मुलांनी केलेल्या चांगल्या कामगीरीची फक्त प्रशंसा करू नये तर त्यासोबत त्यांना झालेल्या चुका सुध्दा लक्षात आणुन द्याव्यात. कारण याच वयामध्ये मुलांना त्यांच्या उणीवा दाखवल्या तर मुले त्यानुसार स्वतःमध्ये बदल घडवतील.
एकदा एका शाळेमध्ये झालेल्या स्पर्धेच्या बक्षीस वितरणामध्ये मी गेलो होतो. त्याठिकाणी बॅडमिंटन स्पर्धेमध्ये माझ्या मित्राचा मुलगा रितेश याला व्दितीय पारितोषिक मिळाले. कार्यक्रम संपल्यानंतर माझ्यासोबत त्याचे वडील चर्चा करीत होते. चर्चेदरम्यान त्यांनी त्यांच्या मुलाची प्रशंसा केली आणि त्यासोबत फायनल मॅचच्या वेळी मुलाने काय चुक केली हे सुध्दा सांगीतले. मुलगा प्रशंसेमुळे आनंदी उत्साही झालाच पण त्याला पुढच्यावेळी काय सुधारण करता येईल हे सुध्दा लक्षात आले. जर त्यांनी फक्त प्रशंसा केली असती तर पुढच्यावेळी मुलाने दुसऱ्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी प्रयत्न केले नसते.
Remember- 'Start prasing the child from today and inform me result after 10 years'
🙏🏻🙏🏻🙏🏻 Please write your comment on your comment box and share with your near & dear.
*If you wish to receive such articles or videos, send Hi message on WhatsApp number 8888126037*
Join us on
*Youtube- Dr Ashish Agrawal*
*Instagram- drgunjan12*
*Facebook- Ishwar multispecality*
👍 Dr Ashish Agrawal, Child specialist & expert in parenting, education & behaviour problems.
👍 Dr Gunjan Agrawal, Dental surgeon.
Comments
Post a Comment