तुमच्या मुलावर निःस्वार्थ प्रेम करा; बाल संस्कार या पुस्तकातील लेख
तुमच्या मुलावर निःस्वार्थ प्रेम करा
-----------------------------------------------------------
मी माझ्या बाहय रुग्णालयात लहान मुलांना तपासत असताना असे जानवले की २५% आई वडिलांची आपल्या बाळाला काहीतरी टॉनीक द्यावे अशी इच्छा असते. याप्रकारच्या टॉनीकमुळे फक्त शारीरीक विकास होत असतो. आज मी आपल्यासमोर या प्रकारच्या टॉनीकपेक्षा महत्वाचे टॉनीक ठेवत आहे. या टॉनीकमुळे भावनीक संस्कार व उच्च प्रतिमा निर्माण होण्यास मदत होईल. मी सांगीतलेले हे तिनप्रकारचे टॉनीक जर मुलांना सातत्याने दिल्यास त्याचे भावी जीवन सुखकारक होईल.
१. प्रेम
२. प्रशंसा व प्रोत्साहन
३. खेळ
🟡 प्रेम
मुलांच्या मुलभुत आवश्यकतेपैकी महत्वाची मागणी असते ती म्हणजे प्रेम. मुलांच्या वाहत जाणाऱ्या वयासोबत त्यांच्या विकासाला आवश्यक अशी उर्जा फक्त प्रेमामुळे मिळते.
आपल्या सभोवताली निराशावादी लोक आपल्याला नेहमी पहावयास मिळतात. त्या लोकांमध्ये आलेली ही उदासीनता जर सखोलपणे आभ्यासली तर त्यांच्या बालपणामध्ये प्रेमाचा अभाव हा मुख्य घटक आढळतो. कोणत्याही व्यक्तीला जीवनामध्ये येणारे यश-अपयश झेलण्यासाठी प्रेमाची आवश्यकता असते. यश मिळविलेल्या व्यक्तीवर जर प्रेम करणारे नातेवाईक, मित्रमंडळ असेल तर त्या व्यक्तीला प्रोत्साहन मिळते व ती त्यापेक्षा मोठ्या शिखराकडे वाटचाल करते. अपयश मिळालेल्या व्यक्तीला जर असे प्रेम करणारे वलय नसेल तर ती व्यक्ती मानसिकरित्या पुर्णपणे खचून जाते आणि प्रेम मिळाले तर मानसीकरित्या सावरण्यासाठी त्याला मदत होते. त्याचप्रमाणे लहान मुलांना सुद्धा त्यांच्या विकासाच्या वेळी समोर येणाऱ्या विविध प्रश्नांसाठी आई- वडिल व इतरांच्या प्रेमाची फार आवश्यकता असते.
Remember- If child learn to live with approval!
He learn to like himself
एका संस्थेने प्रेम या विषयावर केलेल्या सर्वेक्षणात वेगवेगळ्या अनाथ श्रमातील लहान मुलांची तपासणी केली. त्या तपासणीत असे आढळून जारी की ज्या अनाथलयात मुलांना खुप प्रेम देऊन संगोपन केले जाते अशा ठिकाणची मुले अतिशय उत्साही, निरोगी, उत्तम विकास झालेली व 'हुशार होती तर ज्या अनाथलयात प्रेम कमी दिसून आले अशा ठिकाणी तुलनात्मक दृष्टीने मुले कमी विकसीत होती. हे सर्वेक्षण अनाथालयातील आहे म्हणजे आई- वडीलांच्या किंवा कोणत्याही प्रेमाचा परिणाम मुलांच्या वाढीवर होतो. त्याचप्रमाणे घरामध्ये आई-वडिलांकडून खुप प्रेम मिळणारी मुले चांगल्या प्रकारे विकसीत राहणार नाहीत का?
Remember- 'The best happiness of life is the conviction that we are loved'
प्रेम दर्शवण्याच्या पद्धती
i) मुलांबद्दलचे प्रेम बोलून व्यक्त करावे सर्वच आई-वडिल आपल्या मुलांवर प्रेम करीत असतात परंतु सर्वांकडे ती व्यक्त करण्याची किंवा बोलून दाखवण्याची कला नसते. मुलांना तुम्ही प्रेम करीत आहात हे समजणार कसे? आज सर्व पालक स्पर्धेमुळे किंवा मुलांकडून असणाऱ्या अपेक्षांमुळे त्यांच्यावर दडपणे टाकतात. त्यामुळे मुलांना त्यांचे दडपण लक्षात येते परंतु प्रेम दिसत नाही. एका सर्वेक्षणात एका शाळेतील मुलांच्या १५ पालकांच्या व त्यांच्या मुलांची वेगवेगळी भेट घेतली.
प्रत्येक पालकांनी आम्ही आमच्या मुलांवर प्रेम करतो असेच सांगितले. परंतू मूलांची जेव्हा मुलाखत झाली तेंव्हा फक्त ५ मुलांनी स्वतःला प्रेम मिळत असल्याचे मान्य केले. म्हणजेच प्रेम करण्यापेक्षा मुलांना ते जाणवले पाहिजे असे पालकांनी वागावे. असे व्यक्त करण्यासाठी पालकांनी मुलांसोबत खेळकरपणे वागावे, मृदु व प्रेमळ आवाजात संभाषण करावे, I love you, kiss me या प्रकारच्या शब्दाचा उपयोग करावा तसेच न बोलता अलिंगण देणे, जवळ घेणे, चुंबन घेणे, डोळ्यांमध्ये पाहणे, हसणे, घट्ट पकडणे अशा प्रकारामधुनही प्रेम व्यक्त करता येते. मुलांच्या मानसिक विकासासाठी प्रेम हे मुख्य खाद्य आहे..
Remember- 'Always give your children a good night kiss, Even if they are already sleeping."
ii) मुलांवर विश्वास दाखवावा मुलांवर पालकांनी विश्वास दाखवल्यास मुलांना त्यातुन आपुलकीची व प्रेमाची जाणीव होते. छोटे छोटे त्याला जमण्यासारखी कामे असतात ती त्यांच्यावर विश्वासाने सोपवावीत..
नवीन शिकत असेल किंवा एखादी चांगल्याप्रकारे केलेली कला असेल तर त्यासाठी प्रोत्साहन द्यावे व तुला हे जमेल अशी वाक्ये बोलून विश्वास दाखवावा. यामुळे मुलांना प्रेमाची जाणीव होते.
▪️उदा. एक लहान मुलगा स्केटींग शिकत असताना त्याला आठ दिवस होऊनही विशेष अवगत झाले नाही. त्यावेळी पालकांनी फक्त प्रेमाने दिलेल्या विश्वासाने म्हणजेच 'तु करु शकतोस.' 'तुला थोड्या प्रयत्नांची आवश्यकता आहे.' 'आम्ही तुला मदत करू.' अशा वाक्यांचा वापर केल्यास पुढील, दिवसात तो भरपूर सुधारणा करु शकतो. म्हणजेच विश्वास दर्शवण्यातून प्रेम व्यक्त करता येते.
Remember- Behind every child's self confidence, there is a parent who trusted them in early childhood
iii) सहकुटूंब एकत्रीतपणे वेळ घालवावा एकदा एका कार्यशाळेमध्ये तेथे उपस्थीत पालकांना मी एक प्रश्न विचारला. प्रश्न असा होता- तुमच्या लहानपणीच्या आठवणीपैकी सर्वात आवडीची घटना कोणती? या प्रश्नाला बहुतेक पालकांनी स्वतः आई-वडीलांसोबत गेलेल्या सहलीचा उल्लेख केला. जसे- तिरूपती दर्शन, मुंबई सहल इ. या पालकांकडून मिळालेल्या उत्तरांचा अर्थ असा आहे की ज्याठिकाणी आपल्याला प्रेमाने एकत्रीत येण्याची संधी भेटते तसेच देवाण-घेवाण करत आनंद मिळविण्याचा प्रसंग येतो तेच जीवनातील अविस्मरणीय ठरतात.
कोणत्याही व्यक्तीला जीवनामध्ये स्थिरता व सुलभता जाणवण्यासाठी प्रेमाची व देवाण घेवाणीची अनुभुती होणे आवश्यक आहे. त्यामुळे जेवताना, झोपताना, काम करताना, खेळताना, टिव्ही पाहताना, बाहेर जाताना आपल्या मुलांसोबत (सहकुटूंब ) आनंद मिळविण्याचा व आनंद देण्याचा प्रयत्न करावा.
▪️नोट : पालकांसाठी सांगण्याचा अखेरचा व महत्वाचा मुद्दा असा आहे की मुलांवर प्रेम करणे व दर्शवणे अत्यंत गरजेचे आहे. पण याचा अर्थ शिस्त कमी करणे नव्हे तर वेळप्रसंगी मुलांना शिस्त लावण्यासाठी कडकपणे वागणे किंवा आवश्यकतेनुसार शिक्षा करणे आवश्यक असते.
Remember- The best gift a parent can give is quality time.
🙏🏻🙏🏻🙏🏻 Please write your comment on your comment box and share with your near & dear.
*If you wish to receive such articles or videos, send Hi message on WhatsApp number 8888126037*
Join us on
*Youtube- Dr Ashish Agrawal*
*Instagram- drgunjan12*
*Facebook- Ishwar multispecality*
👍 Dr Ashish Agrawal, Child specialist & expert in parenting, education & behaviour problems.
👍 Dr Gunjan Agrawal, Dental surgeon.
Comments
Post a Comment