तुच्छतेची वागणुक; बाल संस्कार या पुस्तकातील लेख
तुच्छतेची वागणुक
------------------------
एकदा एक पालक माझ्याकडे त्यांच्या मुलाच्या समस्येबद्दल मुलाखतीसाठी आले होते. ते स्वतः पंजाबी परिवारीतील मोठया कुंटूबातील व सुशिक्षीत असे होते. त्यांच्या आठ वर्ष वयाच्या मुलाची समस्या होती की त्यांचा लहान मुलगा हरज्योतसिंग आभ्यासामध्ये हूशार पण तोंडी परिक्षेमध्ये कमकूवत तसेच घरामध्ये व शाळेमध्ये लाजाळूपणे वागतो. त्याला वर्गामध्ये इतर मुलांच्या समोर वाचन करणे सुध्दा जमत नव्हते.
मुलाखातीच्या नियमीत पध्दतीनुसार आई-वडिलांचे प्रश्न आम्ही सोडवून घेतले. मला थोडी शंका आल्यामुळे शिक्षकांशी फोनवर चर्चा केली. तेव्हा शिक्षकाने अशी माहिती दिली की हरज्योतला त्याच्या उच्चारांवर इतर मुले हसतील अशी मनात भीती आहे. शिक्षकांकडून मिळालेल्या माहितीवरून पालकांशी परत मुलाखतीमध्ये सविस्तर चौकशी केली असता असे लक्षात आले की या गोष्टीचे कारण घरामध्येच दडलेले होते. आई-वडिल वाचत असताना त्याच्या उच्चारांवर नेहमी टिका करून हसत होते. अशाप्रकारे आपल्या उच्चारांना चिडवत हसल्यामुळे त्याची आपले उच्चार चांगले नाहीत ही भावना तयार झाली. तेव्हापासूनच तो इतरांसमोर वाचन करणे टाळू लागला. त्याला वारंवार आपले बोलणे, हसणे व त्यांच्या सोबतचा व्यवहार हा फार महत्त्वाचा असतो. आपण त्याला कसे बोलतो यावर त्याचा स्वतःचा आत्मविश्वाचा वाढतो किंवा कमी होतो. आपण त्यांना जसे संबोधतो तसे ते स्वतःला लागतात. समजू जसे आपण आपल्या मुलाला नेहमी मुर्ख, नालायक, गाढव, बुध्द् असे शब्द वापरून बोलत असल्यास मुलांचा स्वतःचा आत्मविश्वास कम होऊन त्याच प्रमाणे वागतील. आपण आपल्या मुलाला मुर्ख समजत असल्यास एका दिवशी तो आपल्याला मुर्ख होऊन हामखास दाखवेल याची खात्री मी देऊ शकतो. त्याचप्रमाणे आपण जर आपल्यामुलासोबत त्याला प्रोत्साहन देणारे, विश्वासणारे चर्या संभाषण केले तर तो एक वेळ सवपिक्षा वेगळा व यशस्वी होऊन दाखवेल.
Remember- Your children may forget if you dont give anything but they will never forget what you said'
नेहमी सेमीनारमध्ये पालक असे का वागतात? हा प्रश्न मी विचारत असतो तर काही पालकांचे हे ठरलेले उत्तर असते की शिस्त लावण्यासाठी हे आवश्यक आहे. पण माझे म्हणने असे आहे की मुलांना अशाप्रकारे तुच्छतेने बोलणे हे अमानुष कृत्य आहे. अशाप्रकारे बोलण्याचा आपल्या मुलांवर नेहमीसाठी वाईट परिणाम होतो.
Remember- A child cannot grow if he thinks "Parents hate me.”
🔸 आपण काय करावे :
j) स्वतःचे वर्चस्व दाखवणारी विधाने टाळावी आपण आपल्या मुलांसोबत आपल्या मनाप्रमाणे राहण्यासाठी कडकपणे वर्तणूक करु नये. जसे मी म्हणतो ना खेळ बंद कर आणि आभ्यास कर! अशाप्रकारे स्वतःचे वर्चस्व गाजविण्याची किंवा दिखावा करण्याची आवश्यकता नसते. त्यापेक्षा "बेटा परिक्षेला एकच आठवडा शिल्लक आहे तू आता तुझे पूर्ण लक्ष अभ्यासामध्ये द्यायला हवे" अशाप्रकारच्या सुचना मुलांना द्यावी.. कधी कधी आपल्या मनासारखे होण्यासाठी भीतीदायक व कडकपणे बोलणे आवश्यक असते पण त्यासाठी ती परिस्थीती तेवढी अत्यावश्यक असावी. जसे मुलगा इलेक्ट्रीक सॉकेटला हात लावत असेल तर त्यावेळी अशाप्रकारे कडकपणे बोलावे.
ii) सततपणे टिका करणे टाळावे आपण मुलांना एकसारखे किंवा एकाच गोष्टीसाठी वारंवार सुचना देणे टाळावे. त्यापेक्षा स्वतः कृती करावी अन्यथा मुलाला त्यापासून परावृत्त करण्यासाठी इतर मार्ग पाहावा.
▪️जसे : समजा मुलगा टिव्ही पाहत आहे. तर काही पालक परत परत फक्त सांगत राहतात, 'अरे टिव्ही बंद कर' किंवा 'किती टिव्ही पाहतो रे.' एकवेळ अशी येते की मुले काहीही न ऐकता आपले कान बंद करतात आणि आपण लाकडी ढोकळयाला बोलल्याप्रमाणे परिस्थीती निर्माण होते. त्यापेक्षा मुलांना टिव्ही बंद कर म्हणुन एकदा दोनदा सुचना द्यावी व न केल्यास स्वतः बंद करावी.
iii) मुलांना लज्जास्पद वाटेल असे बोलु नये : आपण आपल्या मुलांसोबत बोलताना, एकटयामध्ये किंवा इतरांसमोर त्याला लज्जास्पद किंवा अपमान वाटेल असे बोलू नये. जसे सर्वांसमोर 'अंथरूणात सू करतो, ' 'आळशी आहे', 'जा! खा काय पाहीजे ते!" "यानंतर तुला डान्ससाठी कधी म्हणणार नाही. 'काठीने जास्तीत जास्त मार लागतो पण लज्जास्पद वागणुकीने मुल स्वतःचे अस्तित्व, स्व-प्रतिष्ठा व आत्मविश्वास नेहमीसाठी हरवून बसतो म्हणुन अशी वागणूक मुलांना देऊ नये.
Remember- Life affords no greater responsibility, no greater privilege than raising of the next generation.
🙏🏻🙏🏻🙏🏻 Please write your comment on your comment box and share with your near & dear.
*If you wish to receive such articles or videos, send Hi message on WhatsApp number 8888126037*
Join us on
*Youtube- Dr Ashish Agrawal*
*Instagram- drgunjan12*
*Facebook- Ishwar multispecality*
👍 Dr Ashish Agrawal, Child specialist & expert in parenting, education & behaviour problems.
👍 Dr Gunjan Agrawal, Dental surgeon.
Comments
Post a Comment