टेलिव्हिजनच्या व्यसनावर मात कशी करावी; article from book Bal Sanskar
टेलिव्हिजनच्या व्यसनावर मात कशी करावी
-------------------------------------------------------
प्रश्न : मुलांचा टिव्ही मुळे आभ्यास होत नाही ? मुले टिव्हीला सोडतच नाहीत ?
हयाला टिव्हीचं खुपच वेड आहे काय करावं?
उत्तर : आपण नेहमी पाहतो आजुबाजुला नातेवाईक किंवा मित्रमंडळी यांच्या घरी टि.व्ही हा काहीना काही कारणाने सतत सुरूच असतो.
▪️जसे : सकाळी- कुठे धार्मीक कार्यक्रमासाठी Sanskar, Astha सारखे.
कुठे हास्य विनोद कार्यक्रम Sab, कुठे राशी भविष्यासाठी तर कुठे बातम्यांसाठी T.V. सतत चालूच असतो.
दुपारी घरातील स्त्रियांची करमणुक Star, Sony किंवा Zee करते तर शाळेतुन आलेल्या मुलाला Cartoon Network हवे असते.
रात्री थकून आलेल्या बाबांना तर टिव्ही हवाच. जेवतांना बातम्या तर झोपतांना क्राईम पेट्रोल पाहीले नाही तर चुकल्यासारखे वाटते.
असा आहे घरातला मुख्य सदस्य टिव्ही! असे वातावरण सर्व घरांमध्ये सर्रास सुरू असते. त्यामुळे मुलांना दोष कसा देणार? त्यासाठी आपण स्वतः टिव्ही पाहणे बंद किंवा कमी करावे व त्या नंतर मुलांकडे बोट दाखवावे. असे केल्यावर सुध्दा मुले अतिरेक करतात तेव्हा काय करावे? यासाठी खालील गोष्टी लक्षपूर्वक अभ्यासा.
Remember- Television is an 'IDIOT BOX'
🔸 T.V. मुळे होणारे दुष्परिणाम :
i) पहिला होणारा परिणाम अभ्यासाकडे दुर्लक्ष.
ii) सोबतच खेळांवर परिणाम होणे, वेळ अपूरा पडल्यामुळे मुले Ground वर खेळत नाहीत.
iii) खेळ व्यायामाच्या अभावाने मुलांमध्ये स्थुलता निर्माण होते.
iv) मुलांची एकाग्रता कमी होते.
v) टि.व्ही. च्या काही कार्यक्रमांमधून वाईट संस्कार तसेच वाईट कृत्यांकडे आवड निर्माण होते.
vi) वरील सर्व गोष्टींचा परिणाम त्यांचा भावनांक कमी होऊन ते एकाकी वर्तन शिकतात.
Remember- Television has changed childhood from valcono to immovable object.
🔸 T.V. फायद्याची असू शकते to
i) भाषा व संभाषण सुधारण्यासाठी मदत होऊ शकते.
ii) काही ज्ञान वाढवणारे Channels (Discovery) मुळे मुलांच्या ज्ञानामध्ये भर पडते.
iii) News channels मुळे जनरल नॉलेज व नविन माहिती सतत मिळत असते.
(iv) सर्वश्रुत असलेले उत्तम करमणुकीचे साधन आहे. टि.व्ही. चे फायदे आहेत परंतु तुलना केल्यास लक्षात येईल की फायदयापेक्षा तोटे जास्त आहेत.
Remember- Television is like a coin which has two sides, use positive side.
🔸 आपण काय करावे :
i) शक्य असेल तर टिव्ही पाहूच नये.
ii) जर शक्य नसेल तर टिव्ही फक्त उन्हाळी सुट्यांमध्ये तो ही मर्यादित वेळेमध्ये पहावा.
iii) आठवडयात अखेरीस नाही तर सुट्टीच्या दिवशी २-४ तास पहावा.
(iv) दररोज पहायचा असेल तर जास्तीत जास्त एक ते दिड तास पाहु शकतो. आपले घर एकत्रित कुटुंब पद्धतीचे ज्यामध्ये दोन तीन भावांचा परिवार असेल तर वैयक्तीक कुटुंबासाठी वैयक्तीक रित्या टीव्ही ची सोय करुन आपल्या मुलांना आपल्या मनाप्रमाणे शिस्त लावता येते. वैयक्तीक रित्या वेगळी टि.व्ही करणे शक्य नसेल तर सर्व कुटुंबियांनी एकत्रितपणे टिव्हीचे वेळापत्रक निश्चित करुन काटेकोर पालन करावे.
✅ आपल्या घरातील काही व्यक्तींना (आजी-आजोबा) टिव्ही हे एकमेव करमणुकीचे साधन असेल तर त्यांनी टिव्ही मुले शाळेत गेल्यावर किंवा झोपल्यावर पहावा.
Remember- To implement the rules in family, the main person has to follow first.
🔸 T.V. पहावयाचे नियम
i) प्रथम मुलांना ठामपणे सांगावे की टिव्ही हा अधिकार नसुन त्याने केलेल्या चांगल्या कामाचे बक्षीस आहे.
ii) त्याचप्रमाणे एखादया दिवशी तो व्यवस्थीत वागला नाही किंवा चुकीचे वर्तन केल्यास त्या दिवशी टिव्ही बंद ठेवावा.
iii) टिव्ही पाहताना परिवारातील सर्व सदस्य एकत्र येऊन टि व्ही पहावा.
(iv) टिव्ही पाहताना एखादी धाडसी किंवा असामान्य कृत्य असलेली कृती असल्यास त्याबद्दल सविस्तर चर्चा करावी व मुलांना योग्य मार्गदर्शन करावे. उदा.: सुपर मॅनची घरांवरून उड्या मारण्याची कृती..
v) टिव्ही पाहताना मुलांसोबत सुरू असलेल्या कार्यक्रमाच्या पार्श्व भाग व वर्तमान भाग यावर प्रश्नोत्तरात्मक चर्चा करावी (Recall memory)
vi) टिव्ही चा करमणुक म्हणून वापर करताना शैक्षणिक चॅनलचा जास्तीत जास्त वापर करावा.
vii) उपलब्ध असलेली कार्यक्रमांची Rating system चा वापर करून कार्यक्रम निवडावे.
Remember- If everyone follows the rules then children will learn to follow without enforcement
🙏🏻🙏🏻🙏🏻 Please write your comment on your comment box and share with your near & dear.
*If you wish to receive such articles or videos, send Hi message on WhatsApp number 8888126037*
Join us on
*Youtube- Dr Ashish Agrawal*
*Instagram- drgunjan12*
*Facebook- Ishwar multispecality*
👍 Dr Ashish Agrawal, Child specialist & expert in parenting, education & behaviour problems.
👍 Dr Gunjan Agrawal, Dental surgeon.
Comments
Post a Comment