अधिक आत्मविश्वास कसा वाढवायचा? काम करणाऱ्या टिप्स ..... तरुण पिढीसाठी उपयुक्त (मराठी में)

*आत्मविश्वास*
 (कमतरता / कसा वाढवावा) 
 आपण स्वतबद्दल जसे विचार करतो, त्याप्रमाणे आपली प्रतिमा आपल्या मनामध्ये तयार होत असते. ही स्वप्रतिमा (स्वत तयार केलेली) आपल्या प्रत्येक कृतीमध्ये, निर्णयामध्ये व जे काही आपण कार्य करतो त्यामध्ये त्याचा परिणाम हा आपल्याला जाणवत असतो. ज्यावेळी आपण काही समस्या किंवा आव्हान स्वीकारतो त्यावेळी आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होते. तसेच आपला आत्मविश्वास कमी असेल तर निराशा किंवा भित्रेपणाचा अनुभव आपल्याला जाणवतो. असे वाटते की आपण पर्याप्त नाहीत, आपले व्यक्तीमत्व चांगले नाही (कमी दर्जाचे आहे) आपल्याने शक्य नाही असा भास होतो. 

*आत्मविश्वास कमी असल्याची लक्षणे*  
1) कठीण प्रसंग टाळणे 
 *उदा* सगळेजण करत असतील पण आपल्याने जमणार नाही 
2) इतरांच्या मतांचा प्रभाव असणे 
 *उदा* असे केल्याने लोक काय म्हणतील किंवा कोणी काही म्हणेल का? 
3) स्वतला दोष देणे. 
4) इतरांपासून स्वतला दूर ठेवणे. 
 उदा ः समजा मित्र एकत्रीत रित्या फिरायला जात असतील तर स्वत:जायचे टाळणे. 
5) नकारात्म भावना वाढणे (वाईट चिंतन करणे) 
 *उदा* माझ्याने होणार नाही, जगात कोणीही चांगले नाही. 

 अशाप्रकारचे विद्यार्थी नेहमी नकारात्मक गोष्टींचा विचार करून मुख्य ध्येय साध्य करण्यापासून स्वतला दूर ठेवतात. 

*आत्मविश्वासाचे फायदे* 
1) योग्य निर्णयक्षमता, आत्मविश्वास चांगला असणाऱया व्यक्तीचे ध्येय हे नेहमी योग्य असतात. तसेच त्यांच्या मेंदूची निवडक्षमता सकारात्मक पद्धतीची असते. 
*2) मेहनत करण्यासाठी तत्परता:* अशाप्रकारचे लोक आपले ध्येय साध्य करण्यासाठी स्वतच्या दैनंदिन कामामध्ये सकारात्मक बदल घडवतात. काही वेळी अडथळा निर्माण झाल्यास त्यातून स्वतला प्रोत्साहीत स्वतच करतात. 
*3) चुकांपासून शिकण्याची कला* ः अशाप्रकारचे लोक नेहमी नविन काही करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे स्वाभाविकपणे चुका होतच असतात. परंतु त्या चुकांपासून शिकत शिकत पुढे वाटचाल करण्याची कला यांच्याकडे असते. 
4) *सामाजिक संबंध वाढतात ः* अशा लोकांकडे इतरांसोबत आपले संबंध चांगले ठेवण्याची व वाढवण्याची कला असते. 
5) *कठीण परिस्थिती हाताळणे ः* अशी व्यक्ती कसल्याही परिस्थितीत योग्य विचार करून मार्ग काढू शकते. 
*आत्मविश्वास कसा वाढवावा?* 
 आलेल्या प्रत्येक संधीचा विचार सकारात्मक करून, आव्हान स्विकारल्याप्रमाणे मेहनत करत राहणे हा एकमेव आत्मविश्वास वाढवण्याचा उपाय आहे. ``आपल्याला सर्वकाही शक्य असते आत्मविश्वास सुद्धा वाढवता येतो'' ही बाब आपण नेहमी लक्षात ठेवावी. 

1) *आत्मपरिक्षण करावे ः* अपुरा आत्मविश्वास हा आपला शत्रु असतो. आपण आपले आत्मपरिक्षण म्हणजे स्वतच्या चांगल्या व वाईट गुणांची यादी तयार करावी. त्यामध्ये आपल्या वाईट गुणांबद्दल ते खरोखर आहेत का? किंवा आपल्याला असे का वाटते याचे कारण नमुद करावे. तसेच आपल्या चांगल्या गुणांचा विचार करून त्यांची सुधारणा कशी करता येईल यावर लक्ष केंद्रीत करावे. 
 *थोडक्यात* : Knowing Yourself is the wisdom.

*2) स्वतशी संवाद ः* आपले मत आपल्या स्वतबद्दल काय आहे याचा परिणाम आपल्या पूर्ण कार्यासाठी महत्त्वाचा असतो. आपली इच्छा असो किंवा नसो आपण स्वतशी नेहमी चर्चा करीत असतो. या चर्चेचा साठा व निकष आपल्या अंतमनात साठून आपल्या व्यक्तीमत्वाचा विकास होतो. आपल्याला आलेले प्रश्न, विचार, विश्वास किंवा स्वभाव हे त्यातूनच निर्माण होतो. सर्वेक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार आपल्या स्वतशी केलेला संवाद सकारात्मक असेल किंवा नकारात्मक असेल तो आपल्या प्रत्येक कृतीमध्ये आपल्याला जशास तसा पहावयाला मिळतो. 
 *उदाहरण ः* समजा एका वर्गामध्ये सर्व मुलांना काहीतरी बोलण्यासाठी संधी दिली तर त्या वर्गातील मुलांमध्ये दोन प्रकारचे विचार करणारी मुले पहावयास मिळतात. 
 i) आपण यापूर्वी काहीही किंवा कधीही बोललेलो नाहीत जर आज बोललो तर मुले हसतील. 
 ii) वा काय छान संधी आहे! आज मी माझे विचार सर्वांपर्यंत पोहचू शकेल. 
  वरील पैकी पहिल्या विचारांची मुले पुढे येणारच नाहीत तर दुसऱया विचारांची मुले काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतील. 

 *आत्मसंवाद केव्हा करावा ः* 
 i) कोणत्याही परिस्थीतीचा अंतिम निकष हाती आल्यानंतर. 
  *उदा:* एखाद्या छोठ्या परिक्षेत मार्क्स अपेक्षेपेक्षा कमी पडले तर. 
 ii) वाईट वेळप्रसंगी मनासारखे घडत नसेल व तेथून बाहेर पडावे किंवा सोडून द्यावे असे  
  विचार येत असेल तर. 
 iii) शुल्लक आव्हाणांसाठी नैराश्य येत असेल तर. 
 iv) कोणी आपला अपमान केला तर. 
 *लक्षात ठेवा* ः Be careful how you talking yourself because you are only listener.
 *नकारात्मक आत्मसंवाद कसा थांबवावा* ः 
i) आपल्या मनात जर नकारात्मक आत्मसंवाद सुरू होत असेल तर तो वेळीच ओळखावा. विचार करत असताना असेच आपल्याला जाणवले की नकारात्मकता सुरू झाली आहे की स्वतला जोरात ``थांबा / STOP / बस्स... '' अशाप्रकारच्या सुचना द्याव्यात. सुचना देताना वेळीच जोरात ओरडून बोलावे. ही एक प्रभावी उपाय पद्धत आहे. 
ii) स्वतला इतरांच्या ठिकाणी ठेउढन विचार करावा. जसे समजा तुमचा मित्र नकारात्मक विचार करत असेल तर तुम्ही त्याला सकारात्मक दिशा दाखवाल किंवा त्याकडे प्रोत्साहीत कराल. त्याप्रमाणे स्वतला समजावण्याचा प्रयत्न करावा. 
 *थोडक्यात* - If we can talk and encourage our friend. Then why we can't talk ourself.

*3) छोट्या छोट्या ध्येयातून मार्गक्रमण करावे ः*
 जर आपल्याला 60% मार्क मिळत असतील तर सुरुवातील फक्त 5% वाढविण्याचे ध्येय ठेऊन अभ्यास करावा म्हणजे निराशेपासून आपण लांब राहू शकतो. त्यांनतर आपले ध्येय 65% वरून 75% पर्यंत आणि त्यानंतर हळूहळू 95% पर्यंत आपण जाऊ शकतो. 
  अशाप्रकारे आपण थोड्या-थोड्याने प्रयत्न केल्यास आपला उत्साह आपोआप वाढत जातो. तसेच आत्मविश्वास निर्माण होतो.  
 *थोडक्यात ः* Arriving at one goal is starting point of another.

*4) सवयी बदलणे ः* 
 काही वेळा आपण आपली एखादी छोटीशी सवय बदलण्याचा प्रयत्न करीत असतो (जसे-जेवणार्वी हात धुणे किंवा झोपण्यापूर्वी दात घासणे.) परंतु काही केल्या बदलणे अशक्य होते किंवा खुप कठीण जाते. अशावेळी एखादी नविन सवय लावण्याचा किंवा वेगळी चुकीची सवय बदलण्याचा प्रयत्न करावा. यामध्ये यश आल्यास त्यावेळी आपला आत्मविश्वास वाढतो. 
 *थोडक्यात ः* The secret of change is to foucs your energy not on old but on building new.

*5) नविन शिकण्याचा प्रयत्न करावा* ः 
 आपण काहीतरी नविन करण्याचा नेहमी प्रयत्न करावा ज्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो.  
 *उदाहरण ः* समजा सुट्टीची वेळ आहे किंवा आपल्या रिकाम्या वेळी एखादा गायनाचा क्लास सुरू करावा ज्यामुळे उत्साह निर्माण होतो. 
 *थोडक्यात ः* Learn something new, convince yourself that you have no limit.
*6) क्षमता वाढविणे* ः 
 आपल्याला ज्या गोष्टी चांगल्या करता येतात त्यामध्ये आपले सामर्थ्य आणि क्षमता आपल्याला दिसते. त्या क्षमतेलाच वाढविण्यासाठी काटेकोर व व्यवस्थितपणे सराव केल्यास आपण त्यामध्ये सुधारणा करू शकतो. 
 *थोडक्यात ः* To be competitive build your compentence.

*7) मार्ग काढण्याकडे लक्ष वेधणे : *
 आपण नेहमी समस्यांवर विचार न करता त्याचा मार्ग कसा काढता येईल याकडे लक्ष केंद्रीत करावे. 
 *उदा ः* i) मला Physics समजत नाही तर मग जमेल कसे? अशावेळी सोप्या व सहज समजनाऱया topics वर लक्ष केंद्रीत करून मार्ग सुलभ करावा. 
 ii) मला सर्वांसमोर डॉन्स करता येत नसेल तर त्यासाठी उपाय करावा की आपल्या घरी T.V. पाहत असताना डॉन्स करावा. 
 थोडक्यात ः प्रत्येक समस्येसाठी उपाय असताना आपण उपाय न शोधता समस्येला महत्व का देतो? 

*8) स्वतहून सहभाग घ्यावा ः *
 समजा एखाद्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी आपल्याला मिळाली तर त्याठिकाणी आपण सहभाग घ्यावा. जर मुख्य भुमिका आपल्या ऐवजी इतरांना मिळाली तरी सुद्धा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सहभाग घेऊन आनंद मिळवावा. 
 *थोडक्यात ः* I Shall participate, I shall contribute and doing in so I will be the gainer.
*9) रहाणीमान उंच करावा ः* आपण स्वच्छ निट-नेटके (म्हणजे आपले केस, दाढी, चेहरा स्वच्छ ठेवावा) रहावे. आपले कपडे स्वच्छ आणि व्यवस्थित असल्यास आपला आत्मविश्वास आपोआप उंचावतो. 
 *थोडक्यात ः* Looking good improves your self-image.
*10) इतरांची मदत करावी ः* 
 आपल्याला इतरांसाठी काही करण्याची किंवा इतरांना मदत करण्याची संधी मिळाल्यास आपण आवश्य करायला हवी. यातून आपल्याला आनंद व समाधान प्राप्त होते. यातून सकारात्मक उर्जा निर्माण होते.  
 *थोडक्यात *: We rise by helping others.

Comments

Popular posts from this blog

मैंने खूब पढ़ाई की लेकिन रिजल्ट नहीं मिला (छात्रों के लिए उपयोगी)

हसत-खेळत बालविकास; पालकांची भूमिका

Life lesson; Stop comparing yourself with others